AIMIM पदाधिकाऱ्यांचा Rashtrawadi Congressमध्ये प्रवेश.

AIMIM पदाधिकाऱ्यांचा Rashtrawadi Congressमध्ये प्रवेश.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत होऊन Rashtrawadi Congress पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांचे विकासात्मक विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात घर तेथे राष्ट्रवादी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने दिनांक-२३ जानेवारी रोजी रा.कॉ.पा. वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांचे हस्ते रा.कॉ.पा. पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा येथे AIMIMचे वाशिम शहराध्यक्ष आसिफ खान खुर्शीद खान,वाशिम तालुकाध्यक्ष सै.रशीद अली सै. मेहबूब अली, अजमत खान हसन खान वाशिम शहर उपाध्यक्ष, सै.असीम सै. सलीम एमआयएम युवक शहराध्यक्ष वाशिम,अ. रशीद,अ.हादी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी गोविंद वर्मा शहराध्यक्ष वाशिम, श्रीकृष्ण राठोड रा.कॉ.पा. प्रदेश सरचिटणीस, ताजुभाई ठेकेदार, सुनील पाटील तालुकाध्यक्ष वाशिम,रा.कॉ.पा. अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख, अमोल ठाकरे तालुकाध्यक्ष कारंजा, अजय श्रीवास शहराध्यक्ष कारंजा,डॉ अविष दरेकार, ॲड.फिरोज शेकूवाले,रहेमत भाई ठेकेदार, नदीम राज,नगरसेवक सलीम गारवे,सलीम प्यारेवाले, अ एजाज,युनूस खान पहेलवान, इर्शाद अली,अ रशीद,सै मुजाहिद,निसार खान,इरफान खान, राहीलफौजी, अलीमोद्दीन, रज्जाक खेतीवाले, रमजान बंदुकवाले, फारूक अली,शारीक शेख,इर्शाद फौजी, अ. रफिक भाई,युसुफखा मौलाना, हाफिज राज,फहिम शेख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 5 =