पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – Aarif Ali Mansuri
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
पिंजारी मंसूरी नदाफ समाजातील विविध अडचणी,जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक सुविधा,गरीब कुटुंबाना कर्ज, घरकुल,मौलाना आझाद योजना अश्या अनेक योजनांतून पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्यावे असे मत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष Aarif Ali Mansuri यांनी नरसी येथील पिंजारी मन्सूरी नद्दाफ समाजाच्या जिल्हास्तरीय महामेळाव्यात व्यक्त केले.
दि.३ मार्च २०२४ रोजी नरसी येथे पहिल्यांदाच पिंजारी समाजाचा मेळावा पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आरीफ अली मन्सूरी हे होते तर व्यासपीठावर अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड जफर पिंजारी यांनी केले तर यावेळी अनेकांनी आपलो मनोगत मांडले, पुढे बोलताना आरीफ अली मन्सूरी म्हणाले की, राज्यात पिंजारी मन्सूरी नद्दाफ समाज मोठ्या प्रमाणात आहे.
शासनाने समाजाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे, आजही पिंजारी समाज अनेक योजनेपासून वंचित आहे मी कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करत नाही परंतु समाजातील कोणी राजकीय पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू असे समोरील जनसमुदायाला ठणकावून सांगितले यावेळी निहाल अहेमद मंसूरीह(जिल्हाध्यक्ष), हसीब नदाफ(प्रदेश उपाध्यक्ष), सिकंदर नदाफ (प्रदेश महासचिव).
महेबुबअब्बास पिंजारी, हाजी नवाब साब पिंजारी (माजी सरपंच नरसी), अॅड जफर पिंजारी,यादुल्ला सर पिंजारी,जैनोदीनसाब पिंजारी, हाबीब भाई पिंजारी, पाशाभाई परलीवाले, अनवरभाई, अब्दुल रऊफ पिंजारी, वाहेद भाई पिंजारी, हाफीज भाई पिंजारी,सलीमसाब पिंजारी,शे.नवाज पिंजारी, सलीमभाई कव्वाल, इम्रान भाई पिंजारी,यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे आयोजन मगदुमसाब नायगावकर व आरीफ नरसीकर यांनी केले सदर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन पत्रकार रियाजभाई पिंजारी यांनी केले तर आभार आरीफ नरसीकर यांनी मानले.
याच कार्यक्रमात निहाल अहेमद मन्सूरी यांची जिल्हाध्यक्ष, मगदुम अहेमदसाब नायगावकर यांची विधानसभा अध्यक्ष तर पत्रकार आरीफ रसूलसाब यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.