Maratha Aarakshan : आरक्षणासाठी मराठा समाज इरेला पेटला,विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन.

Maratha Aarakshan : आरक्षणासाठी मराठा समाज इरेला पेटला,विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन.

Maratha Aarakshan : विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन,धानोरा (साचलदेव ) , विडूळ येथे 3 तासांचा चक्काजाम

उमरखेड : मराठा आरक्षणावर विद्यमान सरकारकडून कुठलाही तोडगा निघत नसल्याने आंदोलक मराठा समाज बांधवांकडून दिवसेंदिवस आंदोलन अधिक तिव्र होत आहे.मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक झालेला आहे . तालुक्यात ठिकठिकाणी नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली आहे . शेकडो मराठा नेते मंडळी व पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र अवलंबिले आहे.

आज दुपारच्या सुमारास विदर्भ मराठवाडा सिमेवरील पैनगंगा नदीपात्रात 10 ते 12 तरुणांनी जलसमाधी आंदोलन केले आहे .उमरखेड , ढाणकी ,विडूळ येथे देवसरी मार्गावर तसेच उमरखेड मार्गावर रास्ता रोको मार्गावरील धानोरा (साचलदेव ) येथे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यन्त रस्त्यावर टायर जाळून 3 तासांचा रास्ता रोको केला .

धानोरा (सा.) येथील फाट्यावर मराठा समाजाकडून लावण्यात आलेले नेत्यांना गावबंदीचे बॅनर अज्ञात व्यक्तीने काल दि 30 ऑक्टोंबर रोजी फाडल्याने मराठा तरुणांनी आक्रमक भूमिका घेत तिव्र आंदोलन केल्याने रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .

रास्ता रोकोमुळे आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहुन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्या उमरखेड आगाराने बंद ठेवल्या त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड तारांबळ झाली . शेकडो महिला पुरुष तसेच प्रवाशी नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती . आक्रमक आंदोलकांपूढे पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसेस वर दगड फेक केली जात असल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून त्यामुळे नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले आहे .

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खा हेमत पाटील यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर जाणवावे म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा दिला आहे तसेच दिल्ली येथील महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता लक्षणीय उपोषण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + thirteen =