अमली पदार्थ विक्री थांबवा.

अमली पदार्थ विक्री थांबवा.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

रिसोड तालुक्यात व शहरांमध्ये अमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे .त्यावर कुठेतरी निर्बंध लावावा अशी मागणी समीर वानखेडे विचार मंच च्या वतीने 21 डिसेंबर रोजी ठाणे दाराकडे निवेदन देण्यात आले सद्यस्थितीमध्ये रिसोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज, कृषी, असे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रिसोड शहरांमध्ये आले आहेत.

ही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये तसेच तरुण पिढी देशाचे भविष्य आहे व यामध्ये काही अल्पवयीन मुले देखील व्यसनाधीन होतील व भविष्यात याचा वाईट परिणाम होईल असे लक्षात घेता अमली पदार्थ वापर विक्री व खरेदी करणाऱ्या विरोध कारवाई करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष प्राचार्य विजयकुमार तुरुक माने डॉ . विजय प्रसाद तिवारी ,अमोल नरवाडे ,गजाननराव निखाते ,विजय पंडित ,यांनी निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + thirteen =