Aadhar Seva Kendra : बेरोजगार उमेदवारांना आता सुरू करता येणार स्वतःचे आधार केंद्र!आधार केंद्र मिळविण्यासाठी जाणून घ्या…ही महत्त्वाची माहिती!!

Aadhar Seva Kendra : सरकारकडून नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यात येते यासाठी देशभरात आधार केंद्र स्थापित झालेली आहे.सुद्धा मोठ्या प्रमाणात आधार केंद्र आहेत,आता ज्या जिल्ह्यात ग्रामीण भागात अशी स्सेवा केंद्रे नाहीत त्यात सरकार वाढ करणार आहे,त्यमुळे आता ग्रामीण भागातही आधार केंद्र सुरू होणार आहे.

यासाठी नुकतेच आधार केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना याद्वारे आपले आधार केंद्र सुरू करण्यासाठी ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राज्यात ज्या महसूल मंडळात वर्तमान परिस्थितीत आधार केंद्र उपलब्ध नाहीत,त्या ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे.त्यामुळे आता आधार केंद्र सुरू करण्याकरिता जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

असे आधार केंद्र सुरु करण्यासाठी सरकारने पात्रता आणि निकष ठरवून दिलेले आहे.ही केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर अर्ज मागविण्यात आले आहे.शैक्षणिक पात्रता धारक आणि इतर निकष पूर्ण करणारे उमेदवार आधार केंद्र वाटप होणाऱ्या गावांची यादी आणि अधिकृत जाहिरात खालील लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकतात.

जाहिरात : https://jalgaon.gov.in/en/notice/advertisement-regarding-the-distribution-of-aadhaar-kits/

संबंधित जिल्ह्यात महसूल मंडळात आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे.यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर आधार केंद्र सुरू करण्याची मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

  • भरती विभाग.
    जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • आधार सेवा केंद्र
    आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक आणि निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आधार सेवा केंद्र सुरू करण्याची ही चांगली संधी या माध्यमातून मिळालेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता
    आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य.यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.यासाठी माहिती घेण्याकरिता उमेदवारांनी प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहावी.
    https://cdn.s3waas.gov.in/s3013d407166ec4fa56eb1e1f8cbe183b9/uploads/2025/03/2025032216.pdf
  • आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र चालकाला मिळणारे मासिक मानधन/वेतन

उमेदवारांनी या वेबसाईटवर क्लिक करून माहिती घ्यावी : https://cdn.s3waas.gov.in/s3013d407166ec4fa56eb1e1f8cbe183b9/uploads/2025/03/2025032216.pdf

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत.
    आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे.अर्जदारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जदारांकडून आधार केंद्र मिळविण्याकरिता करण्यात आलेले अर्ज प्रत्यक्षरीत्या कोणत्याही परिस्थितीत हार्ड कॉपी मध्ये स्वीकारले जाणार नाही.
  • शुल्क उमेदवारांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज भरताना कोणत्याही शुल्क भरावा लागणार नाही. प्रशासनाकडून यासाठी अर्जासोबत कोणतेही शुल्क आकारणी होत नाही.
  • एक उमेदवार फक्त एक आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतो.
  • विहित ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यासाठी उमेदवारांना आधार संच/ अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑपरेटर/ सुपरवायझर ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • सोबतच संबंधित उमेदवाराकडेUIDAI च्या मार्गदर्शक तत्वे नुसार सुपरवायझर साठी वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ज्या तालुक्यात अर्जदार आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी अर्ज करीत आहे, तो त्याच तालुक्याचा रहिवाशी असावा.
  • त्याच तालुक्यासाठी असे उमेदवार आपले अर्ज आधार केंद्र साठी सादर करू शकणार आहे.तालुका बाहेरील आलेले अर्ज बाद करण्यात येतील.

आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत उमेदवारांनी हे कागदपत्र सादर करावे.

  • विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज.
    अर्जदाराचे आधार कार्ड.
    पॅन कार्ड.
    आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र.
    शैक्षणिक पात्रता संबंधात प्रमाणपत्र,किमान बारावी{HSC}उत्तीर्ण प्रमाणपत्र.
    ज्या शासकीय कार्यालयाद्वारे आधार केंद्र चालविले जातील,त्या कार्यालयाकडून आधार केंद्र चालक साठी अर्ज करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र{NOC} घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
    अशी होईल निवड प्रक्रिया.

आधार केंद्र साठी अर्जदारांकडून अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक.

2 एप्रिल 2025 पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येईल.यातारखेनंतर कोणत्याही अर्जदाराचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.अधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदार वरील लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

Aadhar Seva Kendra : लकी ड्रॉ पद्धतीने निवड प्रक्रिया होणार

आधार केंद्र मंजूर करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून उमेदवारांची पात्रता आणि निकष पाहून निवड प्रक्रिया होणार आहे.ही निवड प्रक्रिया दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी होईल.पात्र अर्जदारांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड होईल.यानंतर मंजूर आधार केंद्रासाठी त्यांना आधार संच आणि यासाठी लागणारी किट उपलब्ध करण्यात येईल.

महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा.भरती संदर्भात तुमच्या कुठलाही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

ten − six =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.