Aadhaar Face Authentication System : आता आपला चेहराच आपला आधार कार्ड ! आधार बायोमेट्रिक माहितीने होईल फेस ऑथेंटीफीकेशन !

Aadhaar Face Authentication System : सरकारने आता आधार कार्ड संबंधात नवा निर्णय घेतला आहे.संपूर्ण आधार कार्ड ऑथेंटीफीकेशन साठी आता प्रत्येक नागरिकाचा चेहराच त्याचा आधार कार्ड अर्थातच युनिक आयडेंटिटी कार्ड असेल.

याचा अर्थ सर्व व्यक्तिगत आणि शासकीय कामासह आता खासगी कंपन्यांची सेवा घेतानाही आधार कार्ड नव्हे तर तुमचा चेहराच आधार आयडी म्हणून परिचित होणार आहे.त्यामुळे आता आधाराची कागदी कारवाई संपुष्टात येईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आधार फेस ऑथेंटीकेशन मुळे आधार संबंधित सर्व सेवा जलद गतीने आणि सुरक्षितरित्या व्हेरिफाई होतील.सरकारच्या मते हे सर्व फेस ऑथेंटिफिकेशन द्वारे शक्य होणार आहे.

आधारवर आपला चेहरा,बायोमेट्रिक डाटा आयडेंटिटी वेरिफिकेशन करणार.

आधारवर आपला बायोमेट्रिक डाटा आणि त्यावरील चेहरा याद्वारेच सर्व शासकीय,व्यक्तिगत कामांसाठी व्यक्तिगत ओळख पटविली जाईल.शासकीय कामांसोबतच आता खाजगी कामात खाजगी कंपन्याही आधार वर असलेल्या माहितीनुसार तुमचा चेहरा दिसताच अर्थातच फेस स्कॅनिंग प्रोसेस होताच तुमची
आयडेंटिटी वेरिफिकेशन करू शकणार आहे.

यावर आधारित प्रणाली सुरू होत असल्याने आता शासकीय कामात वापर होणारा आधार आणि व्हेरिफिकेशन आता देशात हेल्थकेअर, ट्रॅव्हल्स बँकिंग आणि ई-कॉमर्स आधी खाजगी सेवांसाठी आधार आयडी म्हणून फेस ऑथेंटीकेशनवरूनच ओळख होईल.यासाठी अतिरिक्त आयडी प्रूफ दाखविण्याची गरज पुरणार नाही.

Aadhaar Face Authentication System मुळे होणार ओळख.

आता खाजगी शासकीय किंवा खाजगी कंपन्यांच्या सेवा साठी आपला आधार कार्ड आणि संबंधित कागदपत्रे प्रत्यक्ष आयडी म्हणून प्रत्यक्ष सादर करण्याची गरज नाही.

लवकरच आधार फेस ऑथेंटीकेशन मुळे खाजगी ओळखची डिजिटल,ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया होणार आहे.आणि ही जलद गतीने प्रक्रिया होणार असल्याने वेळेची बचत,सोबतच व्यक्तिगत माहिती सुरक्षेसंबंधी काही समस्या राहणार नाही.

खाजगी कंपन्यांनीही आता Aadhaar Face ऑथेंटीकेशन करणार.

सरकारकडून देण्यात येणारे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन आतापर्यंत सरकारी सेवांसाठी उपयोगात येत होता.आता खाजगी कंपन्यांनाही आधार आधारित फेस ऑथेंटिक सुविधा सुरू करावी लागणार आहे.

सर्व खाजगी क्षेत्रातील जसे बँकीग, ई-कॉमर्स ट्रॅव्हल्स हॉस्पिटल हेल्थकेअर इन्शुरन्स आयटी सारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत खाजगी कंपन्या आता ह्या सेवा देऊ शकतील.

नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी प्रयत्न.

विविध शासकीय व्यक्तिगत आणि खाजगी कंपन्यांच्या सेवा घेताना सर्वसामान्य नागरिकांना आपले काम पूर्ण करण्यासाठी सहज सुविधा मिळावी,त्यांचे जीवनमान सुलभ होईल, यासाठी सरकार ‘ईज ऑफ लिविंग’ ला प्रोत्साहन देत आहे.

यामुळेच सुलभ आणि जलद सेवेला चालना देण्यात येत आहे.सरकारचे असे मत आहे की,आधार फेस ऑथेंटिफिकेशन सेवेची व्याप्ती वाढल्यास नागरिकांचे जीवन सुलभ होणार आहे.यासाठी कागदपत्रे कमी लागतील,जलद सेवा आणि सुरक्षितता या सोबतच कामे सोयीस्कर होईल.

ऑथेंटीफिकेशन मुळे फसवणूक आणि बनावट कागदपत्रे समस्या मिटणार

आधार फेस ऑथेंटीकेशनमुळे बनावट कागदपत्रे बनविणे, वेळोवेळी सामाजिक तत्वांकडून आधार कार्ड आणि इतर व्यक्तिगत कागदपत्रांचा वापर करून फसवणूक आणि बनावट कामकाजात यांचा वापर होण्याचा धोकाही टळेल.

याचे प्रमुख कारण म्हणजे आता आधार कार्ड मधील बायोमेट्रिक माहिती आणि फेस ऑथेंटिफिकेशन हा सर्वात सुरक्षित मार्ग राहणार आहे. नागरिकांना यातून आपला सुरक्षित ऑथेंटिफिकेशन आणि अचूक काम करणे सुलभ होईल.

डाटा सुरक्षा ची गॅरंटी.

युनिक आयडेंटिटी फेस बेस्ट ऑथेंटीकेशन या प्रणालीला सरकारने लवकरच मान्यता देण्याचा विचार केला आहे.यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात येत आहे.यातून ऑथेंटिफिकेशनची ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असेल.

  • यामुळे व्यक्तिगत डिजिटल डाटा सुरक्षा गॅरंटी मिळेल.
  • उल्लेखनीय म्हणजे आतापासूनच देशात शासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये “यूआयडीफीकेशन”ची व्याप्ती वाढत आहे.
  • कुणाचाही व्यक्तिगत डाटा माहिती कुठेही वापरल जाणार नाही,अशी प्रणाली आहे.
  • यामुळे व्यक्तिगत माहितीची गोपनीयता सुरक्षित असेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.