सिंचन पंप बसविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू.
उमरखेड :- शेत सिंचनासाठी तलावात मोटर पंप बसविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि १४ ऑक्टोबर दुपारी २ वाजता घडली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळमुला गावातील अविनाश नारायण कनवाळे वय 32 वर्षे हा युवक शेतीचे सिंचन करण्यासाठी तलावावर मोटर पंप बसविण्यासाठी गावातीलच शिवाजी वांगे या व्यक्तीला सोबत घेऊन गेला असता तलावातील पाण्यात उतरल्यानंतर त्याला दम लागल्याने पोहता आले नाही.
यात सदर तरुणाचा बुडून जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे कळमुला गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतक अविनाश हा घरातील एकटाच करता व एकुलता एक मुलगा होता.मृतक अविनाश च्या मागे एक दोन वर्षाची मुलगी ,पत्नी व आई वडील असून कनवाळे कुटुंबावर दुःखाचा डोगर कोसळला असुन अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाच्या अविनाशच्या या दुर्दैवी घटनेची माहिती कळमुला गावासह परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पोफाळी यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे.