यवतमाळ
Vidarbha News
डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे तर्फे दिला जाणारा तारू लालवानी पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2023 डॉक्टर राजू कसंबे यांना प्रदान करण्यात आला.डॉक्टर राजू कसंबे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी असून सध्या मुंबई येथील प्रख्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत.
गेल्या दोन दोन दशकात त्यांनी पर्यावरण संरक्षणासंदर्भात केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे .
मुंबई येथील प्रख्यात ताज Mahal हॉटेलमध्ये सदर पुरस्कार, मनोज पटोडीया, जगदीश मलकानी आणि मुदित जैन इ. मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. डॉक्टर राजू कसंबे यांनी नागपूर येथे असताना हॉर्नबिल म्हणजेच धनेश या पक्षावर पीएचडी मिळवली आहे.
डॉक्टर राजू कसंबे यांचे आतापर्यंत विविध पक्षी तथा फुलपाखरां विषयी माहिती देणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय त्यांनी आतापर्यंत, इंग्लंड, कॅनडा, तायवान, दक्षिण कोरिया आणि नेदरलॅंड येथील आंतरराष्ट्रीय पक्षी संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.