Ration Card e-KYC : भारतात केंद्र सरकारकडून अन्नसुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक अन्नपुरवठा प्रणाली कार्यरत आहे.यातून विविध प्रकारच्या आर्थिक दुर्बल घटक,गरजू कुटुंबांना शासकीय स्तरावर मोफत धान्य पुरविला जातो.यासाठी प्रत्येक राज्यात सार्वजनिक पुरवठा प्रणाली कार्यरत आहे.महाराष्ट्रात सार्वजनिक धान्य पुरवठा प्रणाली अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन कार्ड धारकांना पुरवठा केला जातो यासाठी सरकारने सरकारी धान्य दुकान माध्यमातून धान्य वाटपाची व्यवस्था केलेली आहे.
विविध प्रकारच्या राशन कार्ड धारकांना युनिट प्रमाणे येथून धान्य वाटप केला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली अंतर्गत धान्याचा तर महिने मोफत वाटप केल्या जातो. राशन कार्ड मध्ये कुटुंब सदस्यांच्या युनिट प्रमाणे धान्य मिळत केला जातो. सर्व राशन कार्ड आता आधार सोबत जोडणे अनिवार्य झाले आहे.
तात्काळ करा आधार प्रमाणीकरण आणि e-Kyc
वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पुरवठा विभागाच्या वतीने राशन कार्ड धारकांना धान्य पुरवठा अबाधीत राहावा,यासाठी एक E- KYC करण्याची सूचना दिली होती.यासाठी मार्च 2025 पर्यंत अवधी देण्यात आली होती.
आता मार्च अखेर पर्यंत रेशन कार्ड वर नमूद सदस्यांची केवायसी न झालेल्या सदस्यांची नावे व वरून राशन कार्ड वर धान्य पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे,मात्र सरकारने यासाठी आता आधार प्रमाणीकरण आणि e-KYC साठी राशन कार्ड धारकांसाठी अगदी सोपा उपाय उपलब्ध करू दिला आहे.
हा पर्याय वापरल्यास आधार प्रमाणीकरण आणि e-KYC तात्काळ होणार आहे.ते कसे तर आपण या माध्यमातून हे जाणून घेवू या.
40 हजार 953 अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना मिळणार नाही धान्य.
याबाबत आता कागल तालुक्यातून मोठी अपडेट समोर आली असून, या तालुक्यात तब्बल 40 हजार 953 अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब राशन कार्ड धारक लाभार्थ्यांनी आधार प्रामाणिकरण आणि केवायसी केली नसल्याने आता त्यांना धान्य पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
कागल तालुक्यातील 40 हजार 953 अंत्योदय आणि अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी आपला आधार प्रमाणीकरण आणि केवायसी केली नसल्याने मार्च अखेर पर्यंत आधार प्रामाणिकरण आणि केवायसी न केल्यास पुढे त्यांना अंत्योदय रेशन कार्ड वर मिळणारे धान्य बंद करण्यात येणार आहे,यामुळे आता सर्व रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि e-KYC करून घेणे गरजेचे झाले आहे.
Ration Card e-KYC : आधार प्रामाणिकरण आणि केवायसी प्रक्रिया अगदी सुलभ
राशन कार्ड धारकांनी प्रक्रिया पूर्ण केल्यास महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राशन कार्ड धारकां टप्प्याटप्प्याने धान्य पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे.
पण राशन कार्ड साठी लाभार्थी आधार प्रामाणिकरण आणि केवायसी प्रक्रिया अगदी सुलभ असून लाभार्थ्यांना आता मेरा E-KYC एप्लीकेशन द्वारे आपल्या मोबाईल वरून EKYC करता येणार आहे.
असे करा आपल्या राशन कार्ड वर धान्य सुरू राहण्यासाठी आधार प्रामाणिकरण आणि E-KYC.
रेशनकार्डधारकांना मोफत धान्य सुविधांचा लाभ अबाधितपणे घेता यावा यासाठी आधार ओळख पडताळणी आणि EKYC एक महत्त्वाचा भाग आहे.
मेरा ईकेवायसी अॅप आधार-आधारित फेस व्हेरिफिकेशनद्वारे ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित बनवते {Mera e-Kyc App}.विशेषतः अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी याला डिझाइन करण्यात आले आहे. हे App eKYC प्रक्रिया सोपी आणि विश्वासार्ह बनवते.जर तुम्ही देखील रेशन कार्डधारक असाल आणि तुमच्या रेशन कार्डमध्ये EKYC प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू इच्छित असाल,तर तुम्ही मोबाईलवरून रेशन कार्ड eKYC पूर्ण करू शकता.
आता अन्न विभागाने घरबसल्या रेशन कार्ड e-Kyc करण्यासाठी Mera e-Kyc App हा नवीन App लाँच केले आहे. यात रेशन कार्ड धारक आपल्या फेस व्हेरिफिकेशनद्वारे eKYC पूर्ण करू शकणार आहे.
मेरा e-Kyc 2.0 अॅप म्हणजे काय?
- राज्यात सर्व रेशनकार्डधारकांना लक्षात घेऊन,सरकारने मेरा ईकेवायसी अॅप बनविले आहे.,याद्वारे घरी बसून आपल्या मोबाईल फोनवरून मेरा ईकेवायसी अॅप डाउनलोड होऊन यात चेहरा दाखवून आपल्या रेशनकार्डचे ईकेवायसी पूर्ण होतो.
- माझे eKYC अॅप हे एक ऑनलाइन पोर्टल आहे,जे लोकांना त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित eKYC प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण करण्याची परवानगी देते.
- ही प्रक्रिया फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे,{FaceAuthntication Technology}.ज्याद्वारे पात्रलोक सरकारी अन्न सुरक्षा योजनांचे लाभ घेऊ शकतात.
असे करा मेरा ईकेवायसी अॅपवरून रेशन कार्ड ईकेवायसी?
मेरा ईकेवायसी अॅपद्वारे आधार-आधारित फेस व्हेरिफिकेशन वापरून रेशन कार्डसाठी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे खूप सोपे आहे.यासाठी सर्व रेशनकार्ड धारकांना यात दिलेल्या विविध टप्प्यांचे पालन करावे लागते.
- पहिला टप्पा
- मेरा eKYC App-20025 डाउनलोड करा.
- गुगल प्ले स्टोअरवर “Mera eKYC” सर्च करून हा अप्प इन्स्टॉल करा.
- यासोबतच आधार फेस आरडी App डाउनलोड करा:
- दुसरा टप्पा
- मेरा eKYC Application उघडा.
- हा इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला त्याला आवश्यक परवानगी द्यावी लागेल आणि नंतर ते इंस्टाल होईल.
- “राज्य निवडा” वर क्लिक करा आणि तुमचे राज्य निवडा.{Select State}
- जर तुमचे राज्य यादीत नसेल,तर तुम्ही कोणतेही वेगळे राज्य निवडू शकता आणि त्यानुसार तुमच्या फोनचे स्थान सेट करू शकता.
- टीप: सध्या या मेरा e-Kycअॅपवर फक्त 8 राज्ये सूचीबद्ध केले असून लवकरच येथे नवीन राज्ये जोडली जातील.
- तिसरा टप्पा
- आपला आधार तपशील यात प्रविष्ट करा.
- संबंधित क्षेत्रात तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- यानंतर जनरेट OTP या बटणावर क्लिक करा.
- यानंतर आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल.
- चौथा टप्पा
- ओटीपी पडताळणी पूर्ण करा
- मोबाईलवर आलेला OTP एंटर करा.
- स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड एंटर करा.{Captcha Code}
- यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- पाचवा टप्पा
- लाभार्थींची माहिती पडताळून पहा.
- OTP सबमिट केल्यानंतर, तुमची मूलभूत माहिती लाभार्थी तपशील विभागात दिसेल.
- सर्व माहितीची पुष्टी करा.
- सहावा टप्पा
- आपला फेस e-KYC करा.
- स्क्रीनच्या तळाशी असलेल्या फेस e-KYC बटणावर क्लिक करा.
- यात दिलेला कॅमेरा वापरून आपला चेहरा स्कॅन करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- यात चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
- सातवा टप्पा
- यशस्वी e-KYC झाल्यावर लाभार्थी माहिती असलेले एक पुष्टीकरण पृष्ठ प्रदर्शित जाईल.
कोण करू शकतो e-KYC ?
ज्यांच्याकडे सरकारी रेशन कार्ड आहे.ज्यांची आधार कार्डशी रेशन कार्डला लिंक केलेली माहिती अपूर्ण आहे.ज्यांना त्यांचे बोट माहित नाही.{Aadhar Biometric}.असे लोक याचा लाभ घेवू शकतात.
ही लागतात चेहरा पडताळणी e-KYC साठी आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड क्रमांक.
- रेशन कार्ड नंबर.
- आधारशी जोडलेला मोबाईल नंबर.
- स्मार्टफोन किंवा कॅमेरा डिव्हाइस.
- माझे e-KYC apk.
मेरा ईकेवायसी App वैशिष्ट्ये
- ओटीपी-आधारित आधार प्रमाणीकरण
- चेहरा पडताळणी तंत्रज्ञान{Face Authentication Technology}
- बायोमेट्रिक तंत्रज्ञानाद्वारे,वापरकर्ते फक्त आपलाच चेहरा यात स्कॅन आधार पडताळणी पूर्ण करू शकतात.
- वापरकर्त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP द्वारे अतिरिक्त सुरक्षा.
- मोफत आणि प्रवेशयोग्य
- मेरा e-KYC अॅप अगदी मोफत आहे.ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी खूप उपयुक्त.
- अगदी सोपी प्रक्रिया
- याचा वापर करून e-KYC प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करता येते.
यामुळे e-KYC आणी फेस पडताळणी अचूक आणि सुरक्षित होत असल्याने फसवणुकीची शक्यता कमी होते.
सोबतच कागदपत्रे जास्त लागत नाही,सर्व प्रक्रिया डिजिटल असल्याने, कागदपत्रे सादर करण्याचा त्रास कमी होतो.
सोबतच याची जलद सेवा मिळते सत्यापित वापरकर्ते आपल्या रेशन कार्डचे फायदे पूर्ववत सुरु ठेवू शकतात.
सोबतच हा अप्प वापरण्यास अगदी सोपा आहे.