Gold vs Share Market : आपल्या पैशांचा जास्त परतावा मिळावा यासाठी अनेक लोक ज्यात गुंतवणूकदार आणि सोने-चांदी ग्राहकांचा समावेश आहे.ते शेअर मार्केट मधील विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यात आणि सोन्याची खरेदी करण्यावर भर देतात,कारण Share आणि Gold मुळे आपल्या पैशांचा जास्त परतावा मिळतो,अशी सर्वसामान्य समजूत आहे.
मात्र गेल्या एका दशकात अर्थातच 10 वर्षात भारतातील गुंतवणूकदारांना शेअर किंवा सोने यापैकी कोणी सर्वाधिक जास्त परतावा दिलेला आहे, हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.सध्या सोने चांदी आणि शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक कुणाला आर्थिक लाभ रिटर्न स्वरूपात मिळाला,यापैकी विविध अंदाज बांधले जात आहे,तर चला जाणून घेऊया….
एका दशकात देशातील गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य लोकांना सोने किंवा शेअर यापैकी कोणी सर्वाधिक जास्त रिटर्न दिलेला आहे.
देशात एका दशकात सोन्याची किंमत खूप वाढली आहे,तर दुसरीकडे भारतातील शेअर मार्केट मधील सक्रिय कंपन्यांचे शेअर खालीच कोसळत गेलेले आहे.{BSE} अशा परिस्थितीत सोन्याचे गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर मध्ये स्पर्धा ही दिसून आली. यापैकी कोणी जास्त परतावा दिला, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
भारतात सध्या आपला पैसा बाजारात व्यवसायात आणि शेअर किंवा सोने खरेदीमध्ये पर्याय उपलब्ध आहेत.पैशांच्या गुंतवणुकीदरम्यान सोने आणि शेअर हे सर्वाधिक जास्त गुंतवणुकीचे साधन मानले जाते. खरंतर भारतात सोन्याचे दागिने आणि सोने खरेदी सुरक्षित गुंतवणूक असते. दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करताना शेअर मार्केट खाली कोसळून घेतलेल्या शेअर्समध्ये नुकसानीचे जोखीम असते.
एका दशकात भारतात सोन्याचे किमती झपाट्याने वाढले आहे,तर दुसरीकडे 2024 आणि त्यापूर्वीच्या काळातील भारतीय शेअर बाजारात विविध कंपन्यांचे शेअर्स आणि सेन्सेक्स घसरणे सुरूच आहे.यामुळे एकूणच भारतात सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची आर्थिक मौज झाली,तर शेअर बाजारात इन्वेस्टरची काहीशी झोप उडालेली आहे.खाली दिलेल्या आकडेवारीवरून 10 वर्षात सोने किंवा शेअर मध्ये कोणी जास्त परतावा दिल हे समजून येईल.
Gold vs Share Market : एकाच दशकात सोने किमतीत 57 हजाराची वाढ.
एका दशकापूर्वी देशात होण्याची किंमत फार कमी होती मात्र सुमारे 20015 नंतर देशात होण्याची किंमत वाढण्याची सुरुवात झाली. गोल्ड मार्केटमध्ये वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ही महत्त्वाची संस्था मानली जाते.
या सुवर्ण परिषदेचे आकडेवारीनुसार भारतात फेब्रुवारी 2015 दरम्यान सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 24 हजार 125 रुपये होता,यानंतर वेळोवेळी सोन्याच्या दरात वाढ होत गेली.
आता तर फक्त एकाच दशकात अर्थातच 10 वर्षांच्या काळात प्रति 10 ग्राम सोन्याची किमतीत तब्बल 57 हजार पेक्षा जास्त वाढ झाली.आहे.कारण 2025 मध्ये सोने दराच्या तुलनेत नुकतेच 10 फेब्रुवारी 2015 ला 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्राम किंमत थेट हजार 803 रुपये वर पोहोचली आहे.अर्थातच सोने किमतीवर 10 वर्षात 237.5 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे.
दुसरीकडे आपण जर शेअर मार्केटमधील शेअर बाजार बद्दल बोललो,तर स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स हा 19 फेब्रुवारी 2015 ला 29462.27 अंकांच्या सेन्सेक्स वर बंद झाला होता,तर 10 वर्षाच्या काळात आता 10 फेब्रुवारी 2025 ला शेअर बाजारातील सेन्सेक्स हा तब्बल 77 हजार 311.8 अंकांवर येऊन बंद झाला आहे.
सर्वाधिक फायदा आणि परतावा 10 वर्षात सोने गुंतवणुकीमुळे.
भारतात सोने-चांदी आणि शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या परताव्याकडे पाहिल्यास सर्वाधिक फायदा आणि परतावा 10 वर्षात सोने गुंतवणुकीमुळे मिळाल्याचे एकंदर स्पष्ट होत आहे.
सोने आणि सेन्सेक्समध्ये असलेल्या अंतर वरून सोने गुंतवणूकदारांना हा परतावा जास्त मिळालेला आहे. गेल्या दहा वर्षात सोन्यात गुंतवणूकदारांना 237.5% इतका परतावा मिळाला आहे.
तर दुसरीकडे 10 वर्षात शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने 162.40 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.{BSE Sensex FallsDown And Growth}याचा अर्थ या दशकात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 152.40% परतावा दिलेला आहे.
यामुळे एकंदरच आकडेवारीवरून गेल्या एक दशकात शेअर बाजारच्या तुलनेत सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त असा आर्थिक रिटर्न मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.