काय आहे महावितरण चे हे नवीन TOD Meter ! प्रीपेड पेक्षा TOD Meter मध्ये काय आहे वेगळं ?

TOD Meter : केंद्र सरकारचे अनुदान आणि वीज नियामक आयोगाच्या निर्देशावरून महावितरण कंपनीने आता आपल्या वीज ग्राहकांना प्रीपेड वीज मीटरच्या जागी नवीन असे टीओडी वीज मीटर बसवून देण्याची सुरूवात केली आहे.(Time Of Day Digital Electric Meters) महाराष्ट्रातील वीज ग्राहकांच्या घरात हे टीओडी मीटर लावण्याची पुण्यातुन सुरुवात झालेली आहे.

राज्यभरात वीज ग्राहकांना महावितरण करून बसविण्यात येत असलेले टीओडी TOD Digital Electric Unit Reading Meter.मीटर नेमके आहे तरी काय?आणि याचा काय फायदा होणार आहे?. असे प्रश्न पडलेले आहेत. तर चला जाणून घेऊया…प्रीपेड मीटर पेक्षा हे टीओडी मीटर नेमके कसे असणार आहे, आणि यामुळे वीज ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे…..?

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महाराष्ट्रात महावितरण कंपनीने आता प्रीपेड मीटरच्या जागी टीओडी मीटर बसविण्याची सुरुवात केलेली आहे. ही महाराष्ट्रात आणि देशात नवीन वीज वापर आणि युनिट रीडिंग डिजीटल प्रणाली आहे.मात्र महावितरणचे नेहमीच्या बिलिंग प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

महावितरणचे असे म्हणणे आहे की,जुने मीटर प्रीपेड मीटर किंवा सदोष नादुरुस्त मीटरच्या जागी आणि नवीन वीज जोडणी मध्ये टीओडी मीटर लावल्यास त्याचा खूप फायदा मिळणार आहे.

TOD Meter हे प्रीपेड राहणार नाहीत हे विशेष.

सध्याची जी वीज वापर प्रणाली आहे,त्यानुसारच आता टीओडी मीटर लावल्यानंतरही पोस्टपेड प्रणाली लागू राहणार आहे हे मीटर वापरताना त्यांचे दर महिने बिल पाठविण्यात येईल.

मात्र आपण दिवसात,रात्री आणि दुपारी म्हणजे एका दिवसात अर्थातच 24 तासात कीती युनिट वीज वापरले आहेत,हे वीज ग्राहकांना आपल्या स्मार्टफोन मध्ये असलेल्या महावितरणच्या विशेष एप्लीकेशन मधून मिळणार आहे.सोबतच, विज वापरताना वीज ग्राहकांना निर्धारीत वेळेत विज वापरताना युनिटमध्ये आर्थिक बचत आणि युनिट सवलत सुद्धा मिळणार आहे.

विज बिलिंग मध्ये कोणताही बदल होणार नाही

महावितरण करून बसविण्यात येत असलेल्या टीओडी मीटर मुळे आता दर महिना पुरवठा विभागाकडून पाठविण्यात येणाऱ्या बिल आणि याच्या प्रणालीमध्ये काही बदल होईल का असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलेला आहे.

तर या संदर्भात महावितरण ने आपल्या पत्रकात स्पष्ट केलेले आहे की, टीओडी मीटर लावल्यानंतर बिलिंग प्रणाली मध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्या जसे दर महिने विज बिल येते,तसेच ग्राहकांना ते मिळणार आहे.

“उल्लेखनीय म्हणजे महावितरण कंपनीकडून कागदी बिलापेक्षा ऑनलाईन बिलिंग ची सुरुवातही करण्यात आली आहे, त्यानुसार ग्राहक ऑनलाईनपणे आपला वीज बिल पाहून ते महावितरणच्या साईट वरून डाऊनलोड करून नंतर वीज बिलाची ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकतात.”

टीओडी मीटर म्हणजे नेमके आहे तरी काय.

महावितरण कंपनीकडून आता टीओडी मीटर अर्थातच टाईम ऑफ डे मीटर लावण्यात येत आहे.महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना हे डिजिटल वीज मीटर मोफत बसवून देण्यात येणार आहे,अशी प्राथमिक शक्यता आहे.

  • या मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांना वीज युनिट दरांमध्ये आता सवलत सुद्धा मिळणार आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे घरगुती स्वस्त वीज दर साठी असलेल्या स्लॅब साठी हे टीओडी मीटर उपयोगात येईल.
  • सोबतच सोलर पावर प्रकल्पांसाठी नेट मीटर सिस्टम आणि अचूक मीटर रिडींग या सर्वांची माहिती वीज ग्राहकांना टीओडी मीटर मुळे मिळेल.
  • ओटीडी मीटर लावल्यानंतर वीज वापर, युनिट खर्च,मीटर रीडिंग हे महावितरणकडून उपलब्ध करण्यात येत असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून थेट पाहता येणार आहे.
  • अगदी काही मिनिटांमध्ये वीज ग्राहकांना आपल्या टीओडी मीटर मध्ये किती युनिट वीज वापरण्यात आला आणि किती रीडिंग झाली याची माहिती कळेल.{TOD Meter Mobile Application.}

वीज महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना टीओडी मीटर मोफत?

भारतात वीजनियम आयोगाच्या निर्देशानुसार आता घरगुती आणि कमर्शियल वीज ग्राहकांना आर्थिक फायदा मिळेल यासाठी आधुनिक असे वीज पुरवठा तंत्रज्ञान वापरण्यत येत आहे,यातूनच आता नियामक आयोगाच्या निर्देशानेच वीज महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना टीओडी मीटर मोफत देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून महावितरणला यासाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांना हे टीओडी मीटर मोफत मिळू शकेल.महावितरणला टीओडी मीटर सरकारकडून निर्धारित ठेकेदारांकडून उपलब्ध करण्यात येणार आहे,आणि महावितरण कडून या टीओडी मीटरचे मेंटेनन्स आणि मरम्मत ठेकेदार एजेंसिजद्वारे करण्यात येणार आहे.

मात्र ठेकेदार कंपनीने एकदा महावितरणला या वीज मीटरचा पुरवठा केल्यानंतर हे सर्व टीओडी मीटर्स महावितरणच्या मालकीची असणार आहेत.{Mahavitran Company Owners For TOD Meters}त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना ठेकेदार कंपन्यांकडून कोणताही हस्तक्षेप सहन करावा लागणार नाही.

सध्या सुरू करण्यात येत असलेले हे टीओडी वीज मीटर ग्राहकांना अगदी मोफत मिळणार आहे.यासाठी आधी प्रीपेड चार्जिंगची गरज राहणार नाही.महावितरण कंपनीकडून आतापर्यंत वीज वापरासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक्स मीटर्स,आणि मेकॅनिकल मीटर नंतर आता हे आधुनिक असे टाईम ऑफ डे अर्थातच टी ओ डी मीटर डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आणली आहे.

महावितरण कडून पुरविण्यात येत असलेल्या जुन्या वीज मीटरची आता उपयुक्तता संपल्यानेच महावितरण नव्या तंत्रज्ञानातून हे टीओडी मीटर बसवून देत आहे.वीज उपलब्ध प्रणालीचा हा एक नवीन डिजिटल भाग असून,महावितरणद्वारे सध्या नवीन वीज कनेक्शन जोडणी देताना, सदोष आणि बिगाड असलेले वीज मीटरच्या जागी हे नवे मीटर लावून देण्यात येत आहे.{New And Old Electric Meter Connections}

टीओडी मीटर साठी महावितरण ला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

वीज ग्राहकांना नवीन टाईम ऑफ डे मीटर बसविण्यासाठी महावितरण वर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, असा केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.या नवीन मीटर मुळे वीज ग्राहकांना आर्थिक सवलत आणि आधुनिक तंत्रज्ञान आधारित वीज मीटर प्रणाली मिळावी,आणि महावितरणवर आर्थिक भार येवू नये,यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी अनुदान सिस्टम राबविली आहे.

महाराष्ट्रात आरडीएस योजनेतून हे आधुनिक डिजिटल मीटर राज्यात वीज ग्राहकांना बसवून देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार आहे.

{Subsidy By Union And State Government To Electricity Company}याशिवाय महावितरणला टीओडी मीटर सेवा पुरवठा करणाऱ्या आणि केंद्र सरकार द्वारा निर्धारित केलेल्या मीटर पुरवठा कंपन्यांना महावितरण ला TOD मीटरची सर्व रक्कम एकाच वेळी देण्याची कोणतीही सक्ती राहणार नाही.

यासाठी महावितरणकडून पुरवठादार कंपन्यांना पेमेंट अदा करण्यासाठी सरकारने टाईम टेबल निर्धारित केले आहे,त्यामुळे या कंपन्यांना एकाच वेळी सर्व रक्कम देण्याची महावितरणवर सक्ती राहणार नाही.

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या घरात आणि व्यवसायिक उद्योगांमध्ये टीओडी मीटर प्रत्यक्ष बसविल्यानंतर महावितरण ला वीज ग्राहकांना कोणताही शुल्क अदा करावा लागणार नाही.

तर दुसरीकडे या मीटर ची रक्कम महावितरण सेवा पुरवठादार कंपन्यांना 120 हप्त्यांमध्ये अर्थाचा 10 वर्षात अदा करणार आहे.यातील रक्कम राज्य सरकारला प्राप्त होणाऱ्या नेहमीच्या महसुलातून महावितरणला मिळेल आणि यातून ही रक्कम शासकीय अखत्यारीत असलेली वीज कंपनी महावितरण टीओडी मीटर पुरवठादाराना वरील अवधीत याची ही रकम अदा करेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.