Anglo Hindi High School : अँग्लो हिंदी हायस्कूल यवतमाळच्या 8 गाइड्सनी तामिळनाडू येथे आयोजित राष्ट्रीय स्काऊट – ‘गाइड डायमंड ज्युबिली जांबुरी’ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
28 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या जांबोरीचे आयोजन करण्यात आले होते.अँग्लो हिंदी हायस्कूल स्काऊट गाईड, कॅप्टन अनिता प्रमोद सोळंके यांच्यासह 8 गाइड्स कु.आर्या प्रमोद कांबले, कु.खनक विजय चतुर्वेदी, कु.मैत्री प्रफुल्ल काळे, कु.वैदेही उमेश कवाडे, कु.श्रावणी राजू मराठे, कु.कार्तिका सुरेश शिवपुरिया,कु. लावण्या विलास बाढ़गुरे एवं कु. झील राजेश मराठे यांनी यामध्ये सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्याने 20 पारितोषिके जिंकून भारतामध्ये दुसरे स्थान पटकावले.
या राष्ट्रीय जांबोरीमध्ये 20000 हून अधिक स्काऊट-गाईड्सनी एकाच वेळी उजव्या हाताने हस्तांदोलन,हालचाल, रिफनोट,इंग्रजी भाषेत स्काऊटची प्रतिज्ञा घेऊन तीन नवे विश्वविक्रम रचले, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली..तामिळनाडू येथे झालेल्या या जांबोरीमध्ये महाराष्ट्र राज्याने 20 पारितोषिके जिंकून भारतामध्ये दुसरे स्थान पटकावले
भारत,सौदी अरेबिया, श्रीलंका, नेपाळ गाइड्सनी सहभाग घेतला.
या नॅशनल स्काऊट गाईड नॅशनल जांबोरीमध्ये सौदी अरेबिया, श्रीलंका, नेपाळ या देशांसह भारतातील सर्व राज्यांनी सहभाग घेतला.या जंबोरीमध्ये, गाइड्सनी विविध प्रकारचे मनोरंजक खेळ, साहसी उपक्रम, ग्लोबल व्हिला इत्यादींमध्ये भाग घेतला. यादरम्यान विविध राज्यांतील सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतींची देवाणघेवाण झाली.
या राष्ट्रीय जांबोरी येथे स्काऊट-गाईड जिल्हा संघटक गजानन गायकवाड व मनीषा तरडे यांनी संपूर्ण जिल्ह्यातून अँग्लो हिंदी हायस्कूलच्या गाईड्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन दिले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंशुल जैन, उपमुख्याध्यापक विशाल क्षीरसागर, पर्यवेक्षक आशिष गवई, डॉ.वि.स हिंदी प्रसारक मंडळ, बेरार. दर्डा, सचिव कीर्ती बाबू गांधी, उपाध्यक्ष अरुण भाई पोबारू, संचालक मंडळाचे सदस्य किशोर बाबू दर्डा, देवकिशन शर्मा, महेंद्र ओसवाल यांनी गाईड्सना प्रोत्साहन देऊन त्यांचे अभिनंदन केले.