Mahavitaran Smart Meter : महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित T.O.D. (टाईम ऑफ डे)वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावल्या जाणार आहे. हे प्रीपेड मीटर नाहीत. या मीटर मुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही.
विशेष म्हणजे हे टीओडी मीटर वीज ग्राहकांच्या घरात मोफत लावला जाणार आहे.Mahavitarn Company New TOD meter Facilities To Customer.या T.O.D. मीटर मुळे वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणी साठी सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलविण्यासाठी आता हेलपाटे घ्यावी लागणार नाही.
महावितरण कंपनीकडून आता नवीन विज मीटर जोडणी साठी आणि सदोष तसेच नादुरुस्त वीज मीटर बदलताना आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टीओडी वीज मीटर ग्राहकांना मोफत दिल्या जाणार आहे.
विशेष म्हणजे हे हे मीटर प्रीपेड नाही तर सध्याच्या मीटर प्रमाणेच पोस्टपेड असे हे टीओड मीटर राहणार आहे. यातून वीज वापरानंतरच दर महिना वीज बिल अदा करावे लागणार आहे.
त्यामुळे वीज ग्राहकांसाठी सध्याच्या बिलिंग प्रणाली मध्ये कोणताही बदल केला नाही.या नव्या टी ओ डी मीटर मुळे वीज ग्राहकांना वीज वापर करताना नियमितपणे आपल्या मोबाईल फोनवर रीडिंग आणि युनिट समजणार,यामुळे महिन्याच्या शेवटी महावितरण कडून येणारा वीज बिल हा अचूक येईल.
त्यामुळे हा टीओडी मीटर बसवून वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा,असे आव्हान महावितरण कंपनीकडून करण्यात आलेले आहे.
प्रत्येक मिनिटाला मोबाईलवर वीज युनिट आणि रीडिंग ची माहिती मिळेल.
घरगुती वीज ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने आता स्वस्त वीजदर दर स्लॅब बनविले आहे.यात टीओडी अर्थातच टाईम ऑफ डे प्रणाली ही मीटर रीडिंग आणि युनिट साठी वापरले जात आहे .
यापूर्वी सौरऊर्जा प्रकल्पांसाठी युनिट मीटरिंग आणि ऑटोमॅटिक अचूक मीटर रिडीग तसेच वीज वापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला जशी माहिती मिळते, तशीच आता या टीओडी मीटर मध्ये प्रणाली असेल.
या सुविधेमुळे घरात लावलेल्या नव्या T.O.D. मीटर मध्ये प्रत्येक मिनिटाला किती युनिट वीज वापरात येत आहे,आणि याची रीडिंग किती आहे,ही माहिती लगेच आपल्या मोबाईलवरच वीज ग्राहकांना मिळू शकेल,असे आधुनिक तंत्रज्ञान या वीज मीटर मध्ये आहे.
महावितरणच्या या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व नवे आणि जुन्या आणि ग्राहकांना हे मीटर मोफत मिळणार आहे यासाठी कोणताही शुल्क महावितरण कंपनीला अदा करावा लागणार नाही.
हे आहेत टीओडी मीटर लावण्याचे फायदे.दिवसात या वेळेत वीज वापरल्यास सवलतही मिळणार.
महाराष्ट्रात वीज ग्राहकांसाठी पाठविण्यात आलेले बिल मध्ये विजेचे युनिट दर हे महावितरण कंपनीकडून नव्हे तर विद्युत नियामक आयोग यासाठी जन सुनावणी घेऊन निश्चित करते.
यात कमी वीज वापरणाऱ्यांना कमी विविध आणि अधिक वीज वापरणाऱ्या श्रीमंतांना अधिक दर असे वीज युनिट दर सूत्र पुढे कायम राहणार आहे.
एप्रिल 2025 महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना टाइम ऑफ डे वीज मीटर प्रमाणे लागू होणार आहे.या संदर्भात महावितरण कंपनीने नुकतेच विद्युत नियामक आयोगाकडे वीजदर निश्चिती संदर्भात प्रस्ताव सादर केला, आहे यात घरगुती ग्राहकांना प्रत्येक दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेदरम्यान वीज वापरल्यास सवलत देण्याचा मुख्य प्रस्ताव ठेवला आहे.
मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व वीज ग्राहकांना आपल्या घरात T.O.D.लावणे आवश्यक असेल असे महावितरण कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.
Mahavitaran Smart Meter : टाईम ऑफ डे मीटर मोफत मिळणार.
देशात मोठ्या विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार विविध वेळी वीज ग्राहकांना फायदा होईल, असा वीज पुरवठा आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळणार आहे.यासाठी प्रेपेड चार्जिंग करावी लागणार नाही.
महावितरण कंपनीकडून,मेकॅनिकल, इलेक्ट्रॉमेगनेटीक,इलेक्ट्रॉनिक्स मीटर नंतर आता हे नवे T.O.D. वीज मीटर डिजिटल तंत्रज्ञान आधारित मीटर आहे.जुन्या वीज मीटरची उपयुक्तता संपल्यानंतर महावितरण कडून नव्या तंत्रज्ञानाची मीटर लावण्यात येतात.
याच प्रणालीचा हा भाग आहे. सध्या नवीन वीज जोडणी सदोष आणि नादुरुस्त ठिकाणी हे नवे मीटर लावण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे केंद्र शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत अर्थातच आयडीएसएस महावितरण कडून आधुनिक वीज मीटर इन्फ्रास्ट्रक्चर साठी देशात सेवा पुरवठादारांची सेवा घेतल्या जात आहे.यात एनसीसी.Monte Carlo, Jenus, Adani या कंपनीची सेवा पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेतून निवड झालेली आहे.
देशात हे सेवा पुरवठादार कंपन्यांकडून पुरवठा होणारे हे टीओडी मीटर वीज ग्राहकांना मोफत बसवून दिल्या जाईल.यात प्रीपेडची सुविधा आहे, मात्र यासाठी कोणतीही सक्ती राहणार नाही.सध्या सुरू असलेल्या पोस्टपेड प्रमाणेच या नव्या वीज मीटर मधून रीडिंग,युनिट आणि बिलिंग सिस्टम सुरू राहील.
आरडीएसएस योजनेतून टीओडी मीटर लावण्यासाठी केंद्र सरकारचा अनुदानही मिळणार.
महत्त्वाचे म्हणजे हे नवीन टीओडी मीटर साठी महावितरण ला कोणताही आर्थिक भार पडणार नाही.राज्य सरकारांना आर डी एस एस योजनेतून हे आधुनिक डिजिटल मीटर आपल्या राज्यातील वीज ग्राहकांना बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.सोबतच महावितरणला सेवा पुरवठा कंपन्यांना सर्व रक्कम एकाच वेळी देण्याची सक्ती राहणार नाही.
राज्यातील वीज ग्राहकांच्या घरात प्रत्यक्ष लावलेल्या तेवढी मीटरची रक्कम महावितरण कडून सेवा पुरवठादार कंपन्यांना एकूण 120 हप्त्यात अर्थातच 10 वर्षात अदा करावी लागणार आहे.काही रक्कम राज्य सरकार त्याला प्राप्त होणाऱ्या नेहमीच्या महसुलांमधून देईल.
महत्त्वाचे म्हणजे टीओडी मीटर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर महावितरणचे पुढे 10 वर्ष नियंत्रण राहील,यामुळे सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलण्याची जबाबदारी सेवा पुरवठादार कंपन्यांवर राहणार आहे.या प्रणालीमुळे या आधुनिक टीओडी मीटरचा कोणताही आर्थिक भार महावितरण किंवा वीज ग्राहकांवर स्वतंत्रपणे पडणार नाही.
विज ग्राहकांना टीओडी मीटर देण्यासाठी महावितरण व कोणताही आर्थिक भार आलेला नाही.सोबतच यामुळे वीज ग्राहकांकडून अतिरिक्त वीदर सुद्धा आकारण्यात येणार नाही.त्यामुळे नव्या टीओडी मीटर मुळे वीज दरवाढीवर परिणाम होणार नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे या मीटरचे मुख्य पुरवठादार कंपन्या ह्या फक्त मीटर पुरवठा करणारे ठेकेदार श्रेणीत आहे. या मीटरची संपूर्ण मालकी आणि वीज ग्राहकांची वीजसेवा पुरवठ्याचे सर्व अधिकार हे सरकारी कंपनी महावितरणकडेच कायम राहणार आहे.
ऑटोमॅटिक मीटर रिडींग मुळे विज बिल येणार अचूक
- या नव्या टीओडी डिजिटल वीज मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक आणि ऑटोमॅटिक युनिट रीडिंग होणार आहे.
- सर्व वीज ग्राहकांना आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर विजेचे मीटर रिडींग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सुविधा या मीटरमध्ये असेल.
- यामुळे दरमहा वीज बिल प्रक्रिया आणखी अचूक होईल.
- यातून वीज मीटरचा अस्पष्ट फोटो घेणे
- विविध कारणांमुळे मीटर रिडींग घेता न येणे
- नादुरुस्त रिमार्क मुळे सरासरी किंवा अंदाजानुसार युनिट वीज बिल पाठविणे
हे सर्व प्रकार बंद होणार आहे.त्यामुळे चुकीच्या वीज बिलांमुळे वीज ग्राहकांना नेहमी होणारा मनस्ताप ही टळेल. या सर्व फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी गैरसमज न ठेवता आणि कोणतीही प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञान वर आधारित टीओडी मीटर आपल्या घरात बसविण्यासाठी महावितरण ला सहकार्य करावा, असे आवाहन य कंपनीने केले आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पुणे वीज परिमंडळात 35 हजार 436 ट्रान्सफॉर्मर आणि विज केंद्रात 863 उच्चदाब वीज वाहिन्यांसोबत जुळलेल्या ठीकाणात या नव्या तंत्रज्ञानाचे डिजिटल मीटर लावण्याचे काम सध्या पूर्ण होत आहे.
यामुळे वीज यंत्रणेत वीज वापराचा हिशोब आणखी अचूक होईल.यामुळे कोणत्या ठिकाणी ट्रांसफार्मर किंवा डीपी मध्ये टेक्निकल बिघाड झाला तर यातून त्या विभागातील संबंधित इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लगेचच याची माहिती मिळणार आहे.
परिणामस्वरूपी भविष्यात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी फार कमी होईल.या डिजिटल टीओडी मीटर मुळे विजेची नेमकी मागणी किती होत आहे, याचा एक निश्चित अंदाज येईल.