Unique Farmer ID : आता सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि अनुदान लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना आपला ओळखपत्र अनिवार्य केलेला आहे. Formers ID. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे, ॲग्री स्टेक प्रोग्राम अंतर्गत शेतकऱ्यांना आता आपल्या शेतजमिनी आधार कार्ड सोबत जोडणे बंधनकारक करण्यात आली आहे.
यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी संदर्भात विशेष ओळखपत्र सरकारकडून बनवून देण्यात येणार आहे. सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांना “फॉर्मर युनिक आयडी” अर्थातच एग्री स्टेक Agri-stack ओळख बनविणे गरजेचे राहणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यात, कृषीचे आधुनिकीकरण आणि शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय,निमशासकीय सेवा व्यवस्थित करण्याच्या उद्देशातून ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टल सुरू केले आहे.Agri Stack Maharashtra Portal या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्देश्य शेतकरी आणि त्यांची जमीन कृषी कार्य प्रणालीचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करणे आहे.
Farmers Land And Farming System Database यात प्रमुख घटक हा शेतकरी असल्याने त्याला नोंदणीकृत करण्यात येईल.यात प्रत्येक शेतकऱ्यास ओळपत्र Former Unique ID देण्यात येईल.आता आपण ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टलवर शेतकरी आयडीसाठी नोंदणी कशी करावी याची तपशीलवार माहिती जाणून घेवू या.
का महत्वाचे आहे शेतकरी ओळखपत्र Unique Farmer ID ?
सरकारने सुरू केलेली ऍग्री स्टेक महाराष्ट्र योजनेतून शेतकऱ्यांना जे युनिक आयडेंटिटी कार्ड बनवून देण्यात येणार आहे त्याचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्व आणि तो फायदेशीर आहे हा ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी अनेक उद्देशांसाठी कामी येणार आहे.
शेतकरी आयडी ( Unique Farmer ID ) या उद्देशांसाठी कामी येईल.
- शेतकऱ्यांना शासकीय अनुदान योजनांमधून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) bank खात्यात जमा होईल.
- शेतकऱ्यांना सरकारी सबसिडी आणि इतर सर्व शेतकरी कल्याणकारी योजनांची वेळेवर आणि अचूक वितरण माहिती सुनिश्चित आणि वेळेवर मिळेल.
- पीक विमा लाभ
- शेतकरी पीक विमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ होईल.
- क्रेडिट ऍक्सेस,पीक कर्ज
- शेतकऱ्यांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून पीक आणि इतर कृषी साहित्य कर्ज सुरक्षित करण्यात मदत होते.
- शेतकरी बाजारपेठ सोबत थेट जुळणार.मार्केट लिंकेज.
- शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादन खरेदी विक्री संदर्भात संभाव्य खरेदीदार आणि बाजारपेठांशी जोडते.
- इनपुट सबसिडी.
- खते आणि बियाणे यासारख्या कृषी निविष्ठांचे शासकीय वितरणाचा शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळण्यास मदत.
ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टलवर शेतकरी ओळखपत्रासाठी अशी करा नोंदणी.
ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टलला भेट द्या.
यासाठी खालील लिंक वर click करा
https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
आपल्या पसंतीचा वेब ब्राउझर उघडा आणि अधिकृत ऍग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टल वेबसाइटवर नेव्हिगेट करा.
पोर्टलचा वापरकर्ता User 🆔
अनुकूल इंटरफेस तुम्हाला नोंदणी प्रक्रियेत मार्गदर्शन करेल.
येथे “शेतकरी नोंदणी” वर क्लिक करा:
होमपेजवर, “शेतकरी नोंदणी” बटण शोधा आणि त्यावर क्लिक करा.
मागितलेली माहिती नमूद करा:
नोंदणी फॉर्ममध्ये, तुम्हाला खालील माहिती प्रदान करण्यास सांगितले जाईल.
वैयक्तिक तपशील
पूर्ण नाव.
जन्मतारीख.
लिंग.
मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक.
जमिनीचे तपशील
सर्वेक्षण क्रमांक,
भूखंड क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्रफळ.
बँक खाते तपशील.
बँक खाते क्रमांक.
IFSC कोड आणि बँकेचे नाव.
इतर कृषी संबंधित माहिती.
शेतात उगवलेले पीक, सिंचनाचे साधन.
शेती पद्धती.
दस्तऐवज पडताळणी.
Unique Former ID बनविताना खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.
आधार कार्ड
जमिनीच्या नोंदी
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
आता फॉर्म सबमिट करा.
शेतकरीकडून सर्व आवश्यक माहिती पोर्टल वर भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तपशीलांचे काळजीपूर्वक पुन्हा अवलोकन करा आणि आपला फॉर्म सबमिट करा.
यानंतर होईल पडताळणी प्रक्रिया.
शेतकऱ्यांकडून ऍग्री स्टॅक आयडी कार्ड बनविण्यासाठी शासकीय पोर्टलवर सादर केलेल्या माहितीची संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल.
(या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात.)
यानंतर शेतकरी आयडी मिळेल.
शासकीय स्तरावर याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जदार शेतकऱ्याची एक Unique ID तयार केला जाईल.हे अग्रिस्टेक ओळखपत्र देण्यात येईल.हे एक स्मार्ट कार्ड असेल ज्यात शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आणि शासकीय योजनांचा मिळणारा लाभ आणि कालावधी अनुदान निश्चिती आणि अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळणार.
या पोर्टलवर लॉग इन करा agristack.gov.in आणि ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी शेतकरी आयडी आणि पासवर्ड वापरा.
शेतकरी ओळखपत्र नोंदणीचे हे आहेत फायदे.
पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा.
शेतकरी आयडी ही सरकारी सेवांमध्ये संबंधित शेतकऱ्याचा प्रवेश निश्चित करते.
कागदपत्रे आणि वेळेचा विलंब कमी होते.
सरकारकडून सरकारी योजना शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तयार केल्या जाऊ शकतात.
शेतकऱ्यांचे माहिती आणि संसाधनांमध्ये प्रवेश प्रदान करून, शेतकरी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.यातून त्यांचे जीवनमान सुधारू शकतात.
शेतकरी ओळखपत्र नोंदणीद्वारे गोळा केलेला डेटा हे शासकीय कृषी धोरणकर्ते आणि कृषीतज्ञांना प्रभावी धोरणे तयार करण्यात मदत करू शकतो.