Mumbai High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये 129 नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालय मुंबई साठी रिक्त पदांच्या जागांसाठी सुशिक्षित पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
या पद भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला पात्रता निकष पूर्ण करून लवकरात लवकर अर्ज सादर करावेत अशा सूचना या पद भरती जाहिरातीत देण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात 129 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात रजिस्टर जनरल उच्च न्यायालय बॉम्बे द्वारे अधिकृतरित्या प्रकाशित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी जाहिरात अर्ज करण्यापूर्वी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी,यात रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती आणि सविस्तर जाहिरात खाली देण्यात येत आहे.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा
खालील लिंक वर क्लिक करून इच्छुक उमेदवार या पद भरतीत सामील हीण्यासाठी आवश्यक निर्देश आणि गाईडलाईन पाहून अर्ज साठी पुढील प्रक्रिया करू शकतात : https://bhc.gov.in/bhcclerk2024/home.php
इच्छुक उमेदवार खालील लिंक वर क्लिक करून या पद भरतीची माहिती घेऊ शकतात.
Maharashtra/Bombay-High-Court-Clerk-Recruitment-2025 : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
भरती विभाग.
उच्च न्यायालय बॉम्बे द्वारा मुंबई उच्च न्यायालयासाठी 129 नवीन रिक्त पदांची ही भरती जाहिरात प्रकाश करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव.
लिपिक
एकूण पदे.
0129
भरतीचे प्रकार.
मुंबई उच्च न्यायालयात सरकारी विभागात नोकरी मिळविण्यासाठी सुशिक्षित इच्छुक उमेदवारांसाठी चांगली संधी मिळाली आहे.
भरतीची श्रेणी.
राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे.
एकूण 129 लिपिक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे
नोकरीचे ठिकाण हे मुंबई राहणार आहे
या भरतीत सामील होणाऱ्या अर्जदार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही लिपिक पदांसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकते नुसार राहणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन
या पदभरतीत नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
पद भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या पदभरतीत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन राहणार असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले आहे.
या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू.
22 जानेवारी 2000 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन रिक्त पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रता.
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्यापीठ पदवी, कायद्यातील पदवीधारकांना या पदभरतीत प्रधान्य देण्यात येईल. - शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळ द्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC), किंवा ITI मध्ये सरकारी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किमान 50wp.m. टायपिंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (अंग्रेजी 50 शब्द प्रती मिनिट).
- एम एस ऑफिस (MS-Office ), याव्यतिरिक्त windows आणि Linux वर्ड प्रोसेसर चालविण्यासंबंधात संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
दिलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येवर आणि त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्रता तसेच शैक्षणिक उत्कृष्टेच्या आधारावर आणि उमेदवारांच्या निवडीसाठी कट ऑफ प्रणाली निश्चित करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
- निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर स्क्रीनिंग टेस्ट टायपिंग टेस्ट आणि व्हिवा- व्होस साठी पात्र उमेदवारांची असेल.
- केवळ पात्रता निकष किंवा वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकार करण्यात येईल.
- उमेदवारांना चाचणी,व्हिवा- व्होस किंवा नियुक्तीसाठी बोलावण्याचा अधिकार देत नाही.
- वरील पदांसाठी अपूर्ण तसेच चुकीच्या माहिती असलेला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्जदार उमेदवाराने दिलेला कोणताही तपशील खोटा आढळून आल्यास,किंवा चुकीची माहिती असल्याचे आढळून आल्यास अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.तसेच नियुक्ती झाल्यास असा उमेदवार Dismiss होईल.
- वरील पदांसाठी नियुक्ती सुरुवातीच्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी प्रोबेशन पिरीयड असेल.परिविक्षा कालावधी दरम्यान उमेदवाराने समाधानकारक कार्य पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईपर्यंत.नियुक्तीच्या सेवा कोणत्याही वेळी कोणतीही नोटीस न देता किंवा कोणतेही कारण न देता समाप्त केले जातील.
- उमेदवाराचे नाव कोणत्याही सूचने शिवाय निवड प्रतीक्षा यादीतून काढून टाकले जाईल जर असे उघड झाले की,त्यांनी ऑनलाईन अर्ज दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची आहे.
- या निवड प्रक्रियेत निवड समितीचा निर्णय अंतिम असेल
अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक
5 फेब्रुवारी 2025 पर्यंत इच्छुक उमेदवार या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा