Vande Bharat Train On Bullet Track : आता जपानच्या बुलेट ट्रेनच्या धर्तीवर भारतात स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जाणार आहे.देशात तयार होत असलेल्या हायस्पीड रेल्वे ट्रॅक वर ही स्वदेशी बुलेट ट्रेन धावेल.
भारतात जपानी बनावट आणि डिझाईन च्या बुलेट ट्रेन येण्यापूर्वीच आता स्वदेशी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची हालचाली इंडियन रेल्वे कडून सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
देशात मुंबई ते गुजरात बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या सुरू आहे यात जपान कडून आर्थिक सहाय्य घेऊन आणि तेथील टेक्नॉलॉजीच्या आधारावर हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू असताना जपानी बुलेट ट्रेन खरेदी प्रक्रियेला विलंब होत आहे.
Japan Bullet Train Technologyत्यामुळे आता,स्वदेशी बुलेट ट्रेन वंदे भारत धावतील. यासाठी भारतीय रेल्वे आणि केंद्र सरकारकडून कशी तयारी करण्यात येत आहे,याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..
बुलेट ट्रेन साठी हायस्पीड ट्रॅक,आधुनिक सिग्नल यंत्रणा, पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू.
भारताचे पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प सदैव चर्चेत आहे.या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांत वेग आहे.पण भारतात प्रत्यक्षात पहिली बुलेट ट्रेन धावण्यासाठी आणखी अनेक वर्षांची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.कारण या बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता स्वतंत्र बुलेट ट्रेन ट्रॅक,आधुनिक सिग्नल यंत्रणा, बुलेटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
मात्र महाराष्ट्र आणि गुजरातला तीव्र गतीने जोडणाऱ्या या प्रकल्पाला खूप विलंब लागतो आहे.यात आता जपानी बुलेट ट्रेनच्या धर्तीवर आता भारतात निर्मित वंदे भारत बुलेट ट्रेन सुरत बिल्लिमोरा रेल विभागात चालवण्याची योजना भारतीय रेल्वेकडून बनविली गेली आहे.पण केंद्र सरकार किंवा रेल्वे मंत्रालयाद्वारे याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
रेल्वेचे सूत्र जी माहिती देत आहेत,त्यानुसार मुंबई गुजरात ही जपानी बुलेट ट्रेन धावण्यापूर्वी भारतात निर्मित 280 किमी.प्रतीतास वेगाची हाय स्पीड बुलेट ट्रेन बनवून यासाठी आधारभूत सुविधा उभारून याला 2030 पूर्वी सुरू करण्याचा संकल्प भारतीय रेल्वे प्रशासनाने केला आहे. यासाठी देशात सेमी बुलेट ट्रेन वंदे भारत आणि हाय स्पीड कॉरिडोर ही उभारण्यात येणार आहे.
जपानच्या बुलेट ट्रेन खरेदी करारात विलंब.आता वंदे भारत बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी.
भारतासाठी जपानकडून आधुनिक बनावटीची बुलेट ट्रेन खरेदीसाठी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जपान सोबत खरेदी करार सुरू करण्यात आला होता.
Japan India Bullet Train मात्र या खरेदी करायला विलंब होत आहे. यामुळे देशात जपानी बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात आलेल्या हाय स्पीड ट्रेन कॉरिडरवर आता देशात निर्मित वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन धावेल,अशी योजना तयार करून यावर प्रशासनिक स्तरावर काम सुरू झाल्याचे विश्वासनीय सूत्र माहिती देत आहेत.
असे झाल्यास भारतात तयार बुलेट ट्रेन प्राथमिक स्तरावर 280 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहेत. यासाठी भारतात आधुनिक टेक्नॉलॉजी वर आधारितच बुलेट ट्रेन निर्मिती होणार आहे.जपान सोबत खरेदी करार पूर्ण होईपर्यंत यापूर्वी वंदे भारत ट्रेन धावणारा असा विश्वास सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
2026 ला सुरू होणारी जापानी बुलेट आता 2030 ला ट्रेक वर येईल….
दरम्यान रेल मंत्रालयाने जपानची बुलेट ट्रेन खरेदी करार करताना यापूर्वी गुजरात मध्ये बुलेट ट्रेनसाठी कॉरिडोर तयार करण्याचे काम सुरू केले होते.या योजनेनुसार गुजरात मध्ये सुरत ते बिलीमोरा या मार्गासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्यात करिता टाईम लाईन बनविण्यात आली होती.
वर्ष 2017 दरम्यान या बुलेट ट्रॅक साठी पायाभरणी चे काम सुरू झाले होते.यानुसार 2026 या वर्षात सुरत बिल्लीमोरा विभागात बुलेट ट्रेन सुरू होईल असा विश्वास होता,पण सध्या या बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली कामाची गती पाहता या हायस्पिड कॉरिडॉर तयार करण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता 2026 ला धावणारी बुलेट ट्रेन या विभागात 2030 या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.मात्र या कॉरिडॉर वर आता भारतातील स्वदेशी हाय-स्पीड ट्रेन 280 km. वेगाने धावण्यास सक्षम होईल अश्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
High Speed Train Corridor त्यामुळे आता वंदे भारत बुलेट ही गुजरातेत सुरत बिलिमोरा विभागात Surat Bilimora Train Division जपानी बुलेट ट्रेन पूर्वीच धावताना दिसेल.अर्थातच भारतीय रेल्वेने येथे जपानी बनावटीच्या बुलेट ट्रेन सुरू होईपर्यंत अंतरिम उपाय म्हणून येथे बुलेट्सारखी वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.
जपानी बुलेट ट्रेन ट्रॅकवर येईपर्यंत प्रवाशांचे गरजा पूर्ण होतील.
सध्या भारत जपानमध्ये बुलेट ट्रेन खरेदी करण्याचा त्रास आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 2030 पर्यंत भारतात जपानी बनवण्याची बुलेट ट्रेन येईल,अशी भारतीय रेल प्रशासनातील अधिकाऱ्यांना आशा आहे,Indian Railway Administration.तोपर्यंत सुरत बिल्लीमोरा रेल्वे भागात वंदे भारत ट्रेनचा वापर सुरू करून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
यासाठी रेल्वे मंत्रालयाने या हायस्पीड कॉररिडोरसाठी आता आधुनिक सिग्नलिंग व्यवस्थेसाठी तयारी केली आहे.या ट्रेक वर वंदे भारत सेमी बुलेटसाठी युरोपियन डिझाईनचे सिग्नल सिस्टम बसविण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे.