Tech Companies Hiring : देशातील टॉप IT Company’s मध्ये जॉब्स झाले कमी! जाणून घ्या नेमके कारण?

Tech Companies Hiring : मागील दोन दशकात भारतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या पॅकेजचे जॉब ऑफर होत होते.देशातील हैदराबाद, बंगळूरू,दिल्ली,पुणे मुंबई येथे असलेल्या आयटी IT कंपन्यांमध्ये जॉब मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा होती.

देशात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आणि या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निघाल्या. देशात आयटी सेक्टर मध्ये आजही मोठ्या प्रमाणात खाजगी आयटीआय कंपन्यांमध्ये जॉब्स आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

वर्तमान काळात भारतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये तब्बल 54 लाख कर्मचारी सक्रियपणे काम करण्यासाठी गुंतलेले आहे.मात्र या दरम्यान देशातील टॉप आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एआय.(AI)टेक्नॉलॉजीचाही वापर वाढलेला आहे.

यामुळे टॉप आयटी कंपन्यामध्ये नोकर भरती मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

टेक महिंद्रा विप्रो टीसीएस, इतर प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये नोकर भरती नाही.

भारतातील टॉप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये सामिल असलेल्या टेक महिंद्रा विप्रो टीसीएस आणि इतर प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये मागील दीर्घ कालावधीपासून नोकर भरती झालेली नाही.

सोबतच या टॉप आयटी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचे कपात सुद्धा करण्यात येत आहेत. त्यामुळे आयटी सेक्टर मध्ये जॉब शोधणाऱ्या सुशिक्षित युवकांसमोर नवे आव्हान दिसत आहे.

देशात टॉप आयटी सेक्टरमध्ये सक्रिय या कंपन्यांमध्ये नेमके जॉब्स का कमी होत आहेत,यामागे काय कारण आहेत हे आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…..

AI टेक्नॉलॉजीचा वापर वाढला.

भारतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी Information Technology (IT).क्षेत्रात सध्या 50 लाखांपेक्षा जास्त तरुण जॉब करीत आहे. मात्र मागील काही काळात देशातील टॉप आयटी कंपन्यांमध्ये आणि इतर तांत्रिक कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स Artificial Intelligence (AI). टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे.

देशात एआय. तांत्रिक कार्यप्रणालीमुळे आयटी क्षेत्रासह अनेक उद्योग आणि व्यवसायात मोठे बदल होताना दिसत आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे सध्या तांत्रिक क्षेत्रातील सर्व कामे ऑटोमॅटिक होत आहेत.

याचा मोठा परिणाम हा देशातील आयटी कंपन्यांमध्ये जॉब्स वर पडत आहे. कारण आयटी सेक्टर मध्ये एआय चा वापर वाढल्याने आयटी कंपनी आपल्या कंपन्यांमधून नोकर भरती वर मर्यादा आणून दुसरीकडे ते AI च्या वापराने तांत्रिक कामे पूर्ण करीत आहेत.

यासाठी IT मध्ये मानविय जॉब्स मध्ये कपात करण्यात येत आहे.

भारतात आयटी सेक्टरमध्ये प्रमुख 5 आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात.

नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2024 दरम्यान मागील तिमाही मध्ये भारतात आयटी सेक्टरमध्ये प्रमुख असलेल्या 5 आयटी कंपन्यांमध्ये 2 हजार 87 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

यापूर्वी सप्टेंबर,ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिमाहीत कर्मचाऱ्यांची ही संख्या 15033 ने वाढलेली होती. एकूणच नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 दरम्यान आयटी कंपन्यांमध्ये जॉब ची संख्या घटताना दिसत आहे.

काय म्हणतात आयटी क्षेत्रातील तज्ञ.

देशात टॉप आयटी कंपन्यामध्ये जॉब्स संदर्भात थेट असा आकलन अद्यापही झालेला नाही.आयटी कंपन्यांमध्ये जॉब संदर्भात या क्षेत्रातील वरिष्ठ कंपनी असलेली एव्हरेस्ट ग्रुपचे संस्थापक आणि एक्झिक्यूटिव्ह चेअरमन पीटर बेंडर सॅम्युअल यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे.सॅम्युअल यांच्या मते कोविड महामारी दरम्यान आय टी क्षेत्रात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची भरती झालेली होती.

मात्र मागील काही काळापासून आयटी सेक्टर मध्ये कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया कमालीची घटली आहे.या संदर्भात एससीएल टेकचे (HCL TECH Company) सीईओ सी.विजयकुमार यांच्या मते देशात आयटी कंपनी व्यवस्थापनद्वारे आपल्या कंपन्यांमध्ये कमी कर्मचाऱ्यांची संख्या ठेवून आपल्या महसूल आणि उत्पादकतेत वाढ केलेली आहे,याचा अर्थ असा निघतो की आयटी सेक्टर मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तरच महसूल वाढेल असे नाही.

आयटी कंपन्यांमध्ये नोकरी नियुक्ती,कपातीची आकडेवारी समोर

आयटी कंपन्यांमध्ये नोकरी संबंधित आकडेवारी समोर आलेली आहे.एका खाजगी अहवालानुसार सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान देशात टॉप आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस Infosys आणि एचसीएल HCL IT Company ने मागील तिमाहीत 7 हजार 725 आय टी क्षेत्रातील विशेषज्ञ कर्मचाऱ्यांना जॉब्स ऑफर करून त्यांना कामावर सामावून घेतले.

तर याच दरम्यान दुसरीकडे भारतात सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस TCS,टेक महिंद्रा Tech Mahindra आणि विप्रो Wipro या कंपन्यांमध्ये यादरम्यान कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.देशातील या 5 टॉप आयटी कंपन्यांनी फायनान्शिअल इयर 2024 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आपल्या कंपनीमध्ये कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांपैकी 12,132 कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे.

यापूर्वी या टॉप कंपन्यांमध्ये याच आर्थिक वर्षात मार्च 2024 पर्यंत तिमाहीत 12 हजार 600 कर्मचारी कमी झाले. सध्या टॉप आयटी कंपन्यांसाठी फायनान्शिअल इयर 2025 ची सुरुवात झालेली आहे. मात्र आयटी सेक्टर मध्ये सक्रिय असलेले विशेषज्ञ असा तर्क देत आहे की समोरील तिमाहित देशात आयटी सेक्टर मध्ये टॉप कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्तीची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत एक चतुर्थांश कमी झालेली दिसेल.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात सक्रिय लोकांच्या मतांप्रमाणे या क्षेत्रात तीव्र गतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर वाढत आहे.मात्र सध्या टॉप कंपन्या वगळता आयटी कंपन्यांमध्ये मानव संसाधनचा वापर होत आहे.मात्र भविष्यात AI चा शिरकाव आय टी सेक्टर मध्ये वाढला,तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात झपाट्याने नोकऱ्यांची कमी होऊ शकते,मात्र सध्या या शक्यतेबाबत कुणीही थेट आकलन करताना दिसत नाहीये.

NASSCOM (नेसकॉम) ने आयटी सेक्टर मध्ये Jobs संदर्भात सध्या तपशील दिला नाही.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये मानवी संसाधन आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीयांवर लक्ष ठेवून यावर आधारित रिपोर्ट तयार करण्यासाठी अनेक एजन्सीज आणि संस्था आहेत. यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री बॉडी मध्ये नेस्कॉम NASSCOM हा महत्त्वाचा प्राधिकरण आहे.

समाधानाची बाब ही आहे की, सध्या नेसकॉम कडून आयटी सेक्टर मध्ये जॉब्स वाढत आहेत किंवा कमी होत आहेत,या संदर्भात तपशील देण्यात आलेला नाही.मात्र टॉप आयटी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेता,आता असे मानले जात आहे की,या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची भरती ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (Global Capacity Center’s) मुळे होते.

IT मध्ये जीसीसी मुळे 2024 नंतर आता 2025 दरम्यान दुसऱ्या वर्षीही आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याची अपेक्षा आहे.त्यामुळे एकंदरच आयटी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी आणि या क्षेत्रात जॉब्स शोधणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी सध्या ही समाधानाची बाब आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 + 17 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.