आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजने साठी आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Agri Stack Scheme एग्रीस्टेक योजनेतून शेतकऱ्यांची आधार जोडणी आणि यातून शेतकऱ्यांना नवीन ओळख क्रमांक देण्यात येणार आहे.
यामुळे आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पुढील 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.एकूणच शेतकरी आधार ओळख क्रमांक आता या योजनेत बंधनकारक करण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही अट जानेवारी अखेरपर्यंत ठेवण्यात आली आहे.यापर्यंत आपला आधार कार्ड अपडेट करून या योजनेसोबत आधार कार्ड जोडावा लागणार आहे. मात्र जानेवारीच्या अखेर देण्यात येणारा 19 व्या हप्त्यासाठी ही अट लागू राहणार नाही.
यापूर्वी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेले आणि नवीन नोंदणी करीत असलेले शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील 18 वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी या योजनेसोबत करणे अनिवार्य करण्यात आलेली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने या योजनेतून एक शेतकरी कुटुंबात एक पात्र लाभार्थी लाभ देण्याच्या उद्देशाने नवी अट लागू करून आता अंमलबजावणी सुरुवात केलेली आहे.
महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान योजनेत पात्र शेतकरी लाभार्थ्यांची संख्या 96 लाख 67 हजार इतके आहे.त्यात भूमि अभिलेख नोंदणी प्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95 लाख 95 हजार इतकीच आहे.95 लाख 95 हजार लाभार्थ्यांनी अध्याप ही भूमि अभिलेख नोंदणी अपडेट केलेल्या नाहीत.तर दुसरीकडे 95 लाख 16 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेसाठी केवायसी प्रामाणिकरण केलेले आहे.
मात्र महाराष्ट्रात अजूनही 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी E-KYC पूर्ण केलेली नाही. या संदर्भात सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधीच सूचना जारी केलेल्या आहे.
आतापर्यंत 94 लाख 55 हजार शेतकऱ्यांनी आधार बँक खात्यासोबत जोडला.
महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 94 लाख 55 हजार शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आपल्या संबंधित बँक खात्यासोबत जोडल, असून दुसरीकडे एक लाख 98 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
याव्यतिरिक्त महाराष्ट्रात सुमारे 36 हजार शेतकऱ्यांनी अर्जाला स्वमान्यताच दिलेली नाही, त्यामुळे पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी आता महाराष्ट्रातील 92 लाख 42 हजार शेतकरी पात्र ठरले आहे.या लाभार्थी शेतकऱ्यांना येणाऱ्या 25 जानेवारी नंतर पुढील हप्त्याची रक्कम बँक खात्यात टाकली जाणार असल्याची शक्यता आहे.
काय आहे ( Agri Stack Scheme ) ॲग्रीस्टेक योजना ?
महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2024 दरम्यान पीएम किसान योजनेची निगडित महाराष्ट्रात ॲग्रीस्टेक योजना घोषित केली होती.या योजनेत शेतकऱ्यांना आता स्वतंत्र ओळख क्रमांक दिले जाणार आहे.सोबतच पात्र लाभार्थी हा शेतकरी असल्याचा सरकार पुरावा देऊन त्याची जोडणी भूमी अधिकार अभिलेखात करण्यात येणार आहे. यासाठी संबंध शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक अपडेट होऊन ते या योजनेशी जोडले जाणार आहेत.
कर्मचारी संघटनांच्या बहिष्काराने योजना काहीशी रखडली.
महाराष्ट्रात ॲग्री इस्टेट योजनाही जिल्हा आणि तालुकास्तरावर कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी यांच्या समन्वयातून कृषी विभागाकडून राबविली जाणार आहे. मात्र या योजनेवर महाराष्ट्रात सध्या कृषी विभागातील तीन विभागातील कर्मचारी संघटनांनी बहिष्कार टाकल्याने ही योजना काहीशी रखडलेली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात या योजनेला सध्या प्रत्यक्षात अंमल सुरू झालेला नाही. मात्र सरकारने यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक शिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही अशी घोषणा केली आहे तर 19 व्या हप्त्यासाठी मात्र ही अट लागू राहणार नाही.