Jio Coin : भारतात सर्वात श्रीमंत आणि जगातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिओ कंपनीने Jio Company आता क्रिप्टो करन्सी Crypto Currency क्षेत्रात पदार्पण करण्याची तयारी केलेली आहे. मुकेश अंबानी यांच्या या क्रिप्टो करेंसी चे Jio Coin हे डिजिटल राहणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात सुरू असणारी जिओ प्लॅटफॉर्मने नुकतेच इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनी पॉलीगोन लेब्स् Polygon Labs सोबत या क्षेत्रात महत्त्वाची भागीदारी केलेली आहे.या कंपनीकडून याची घोषणा सध्या झालेली नाही,मात्र यामुळे भारतात Crypto Currency आणि Bitcoin मध्ये आता डिजिटल टोकन स्वरूपात या क्षेत्रामध्ये Jio कडून नवी क्रांती घडणार असल्याची शक्यता आहे.
जिओ प्लॅटफॉर्म ने क्रिप्टो करेंसी मध्ये जिओ कॉइन Jio Coin नावाचे डिजिटल टोकाने भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी सुरू केलेली आहे.याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.सध्या जिओ कॉइन ची इंटरनेटवर तुफान अशी चर्चा सुरू आहे.अनेक युजर्स सोशल मीडियावर येणारे जिओ कॉइन चे स्क्रीन शॉट Screenshots सुद्धा एकमेकांमध्ये शेअर करताना दिसत आहेत.
दरम्यान जिओ कंपनीकडून या डिजिटल टोकनच्या कार्यप्रणाली बाबत सध्या अधिकृत माहिती सार्वजनिकरित्या शेअर केलेली नाही,तरीही क्रिप्टो करेंसी मध्ये लोकप्रिय असलेल्या बी टिनिंग कंपनीचे Bitinning Company चे चीफ एक्झिक्युटीव ऑफिसर काशीफ रजा यांनी नुकतेच याबद्दल माहिती सोशल मीडियावर शेअर केलेली आहे, यानंतर मार्केटमध्ये लॉन्च होण्यापूर्वीच जिओ कॉइन ची लोकप्रियता आतापासूनच वाढतांना दिसत आहे.
How can you expect Reliance Jio to launch a crypto coin available for trading on exchanges straightaway?
As Mukesh Ambani, why will you upset RBI, and SEBI from day 1?
Consider it a first baby step; many things will unfold with time.
But do celebrate the fact that:
-> It is…
— Kashif Raza (@simplykashif) January 17, 2025
जिओ कॉइन Jio Coin Users साठी ॲप राहणार.
जिओ कंपनीकडून जर भारतीय बाजारात बिटकॉइन सारखा जिओ डिजिटल कॉइन लॉन्च झाल्यास,त्याचा सार्वजनिकरित्या वापर होणार आहे.यातून रिलायन्स गॅस स्टेशनवर सीएनजी, एलपीजी गॅस भरण्यासाठी आणि मोबाईल रिचार्ज साठी तसेच इतर अनेक कंपनीच्या सेवांसाठी उपयोग होऊ शकणार आहे.
Jio Coin चा वापर करून युजर्स यात वेब-3 वॉलेटमध्ये आपले कमावलेले टोकन साठवून ठेवू शकणार आहेत.यातून युजर्सना विविध ऑफर्स लाभ मिळू शकतो. Jio Coin च्या यूजर साठी एक ॲप राहणार असून कामानुसार Jio Coin ची कमाई होऊ शकणार आहे.यामुळे वापरकर्त्यांना Jio Coin खूप फायदा मिळणार आहे.
Jio Coin मध्ये वेब-3 टेक्निक चा समावेश.
रिलायन्स जिओ आणि पॉलीगोन या कंपनीच्या एकमेकांच्या सहयोगातून जिओ कॉइन लॉन्च होण्यापूर्वी याच्या प्रोग्रामिंग ची माहिती समोर आलेली आहे.जिओ डिजिटल कॉइन मध्ये वेब थ्री तंत्रज्ञानाचा Web-3 Technic समावेश करण्यात आलेला आहे.
यामुळे क्रीप्टो करन्सी, ब्लॉक चेन आणि डिजिटल वॉलेट्स तंत्रज्ञानाचा भारतात वापर वाढणार असल्याची शक्यता आहे,मात्र या सर्व घडामोडीत अद्यापही रिलायन्स किंवा जिओ कंपनीकडून आपल्या जिओ कॉइन बाबत अधिकृत तांत्रिक माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे Jio Coin हा डिजिटल टोकन कसा वापरात येईल याबाबत सध्या विविध चर्चा आणि काही शंका ही आहेत.
Jio Coin डिजिटल क्षेत्रामध्ये नवे टोकन.
महत्त्वाचे म्हणजे भारतात सध्या इतर देशांसारखी क्रिप्टो करेंसी वापरात येतो.बीट कॉइन ही वापरल्या जातात.यावर भारतात सरकारने नियमही लादून दिलेले आहेत.आता सरकार पुन्हा क्रिप्टो करन्सी बाबत आणखी कडक नियम करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. सध्या Jio Coin हा बाजारात लॉन्च झाला नाही, मात्र यापूर्वी भारतात क्रिप्टो करंसी वापरण्याच्या प्रणालीवर लावला जाणार टॅक्स मध्ये वाढ होत आहे.
मात्र भारतात जिओ कॉइन हे भारतीय बाजारपेठेतील युजर साठी एक नवे असे डिजिटल टोकन असू शकतो.यामुळे युजरचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात 450 दशलक्ष पेक्षा जास्त रिलायन्स आणि जिओ युजर्स आहे त्यामुळे जिओ प्लॅटफॉर्मच्या नेटवर्कचा फायदा Jio Coin वापरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.