Cricketer Pratika Rawal World Record : टीम इंडियाची सलामी वीर Pratika Rawal ने रचला विश्वविक्रम.444 धावांचा रेकॉर्ड केला कायम

Cricketer Pratika Rawal World Record : आंतरराष्ट्रीय भारतीय महिला क्रिकेट टीम मध्ये नुकतेच पदार्पण केलेल्या प्रतिका रावलने भारत विरुद्ध आयर्लंड आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मालिकेत सलामीवीर फलंदाजीची भूमिका आपल्या आक्रमक फलंदाजीतून प्रदर्शित केली आहे. टीम इंडिया मध्ये सलामी वीर फलंदाज म्हणून प्रतिका रावलने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 154 धावांची खेळी करून आपला पहिला शतक नोंदविला आहे.

15 जानेवारी रोजी भारत विरुद्ध आयर्लंड एक दिवसीय क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रतिकाने आपला पहिला शतक झळकावतानाच टीम इंडिया साठी 154 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.भारत विरुद्ध आयर्लंड मध्ये खेळल्या गेलेल्या तीन वन डे क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामना मालिकेमध्ये भारताने आयर्लंडचा 3-0 ने पराभव करून ही मालिका जिंकली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Cricketer Pratika Rawal World Record : एकूण 444 धावा उभारून नवा विश्वविक्रम.

आतापर्यंत प्रतिकाने सलामीवीर फलंदाज म्हणून 6 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण 444 धावा उभारून नवा विश्वविक्रम रचला आहे.टीम इंडिया महिला क्रिकेट मध्ये पदार्पण झाल्यानंतर नवी सलामी वीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताची सुरुवात करणाऱ्या प्रतिका रावलने आपल्या सुरुवातीच्या 6 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या 6 डावांमध्ये भक्कम धावा उभारल्या असताना राजकोट येथील भारत विरुद्ध आयर्लंड मध्ये शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदा शतक झळकावून 154 धावांची मोठी खेळताना आतापर्यंतचा सर्वाधिक धावांचा नवा रेकॉर्डही नोंदविला आहे.

टीम इंडिया महिला क्रिकेटची सलामी फलंदाज प्रतिका रावल हिने एक दिवसीय क्रिकेटमध्ये आज नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे.यापूर्वी एक दिवशी क्रिकेटमध्ये पावले ठेवल्यानंतर प्रत्येक सामन्यात तिने आपल्या खेळीने अख्या जगाचे लक्ष वेधले आहे. सोबतच टीम मध्ये उत्कृष्ट सलामी फलंदाजाची भूमिका काय असते ही बाब क्रिकेट जगताला आणि क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा कळवून दिले आहे.

शेवटच्या सामन्यात 154 धावांची खेळी,पहिला शतक झळकावला.

टीम इंडिया महिला क्रिकेट टीमची सलामी वीर फलंदाज प्रतिका रावलने भारत विरुद्ध आयर्लंड आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतासाठी 154 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत आपला पहिला शतक झळकावला.

या सामन्यात सलामीवीर म्हणून आपल्या उत्कृष्ट फलंदाजी सोबत प्रतिका रावलने नवा रेकॉर्ड कायम केला.विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 6 वनडे सामन्यामध्ये त्याने विक्रमी अशा धावा ठोकल्या आहेत.

भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेत आयर्लंडचा 3-0 ने पराभव.

भारत विरुद्ध आयर्लंड मध्ये भारतातील गुजरात मधील राजकोट येथील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट सामना जिंकून भारताने या मालिकेत आयर्लंडचा 3-0 ने पराभव केला.

या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा 410 चा मोठा टप्पा पार केला आहे.यापूर्वीच्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार स्मृती मंधानाने ही शतक झळकावले आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात स्मृतिचे हे दहावे शतक होते.

तर आज 15 जानेवारी रोजी राजकोट मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात टीम इंडिया महिला क्रिकेटची सलामी फलंदाज प्रतिका रावल हिने आपला पहिला आंतरराष्ट्रीय शतक झळकावून टीम इंडिया साठी 154 धावांची मोठी खेळी केली.

टीम इंडियाची प्रतिका रावल याला आयर्लंड -भारत सामना मालिकेत उत्कृष्ट फलंदाजीसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळेसाठी खेळी खेळणारी प्रतीका ही तिसरी फलंदाज ठरली आहे.

6 वनडे सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा उभारण्याचा  विश्वविक्रम

यापूर्वी टीम इंडियाची फलंदाज दीप्ती शर्मा ने यापूर्वी टीम इंडिया साठी सर्वात मोठी एकदिवसीय खेळी खेळली होती. 2017 मध्ये आयर्लंड विरुद्ध दीप्तीने 188 धावा केल्या होत्या. तर याच वर्षी 2017 मध्ये महिला क्रिकेट फलंदाज हरमनप्रीत कौर ने नाबाद 111 धावांची खेळी केली होती.

यानंतर आता प्रतिकाने टीम इंडिया साठी १५४ धावांची सलामी फलंदाज म्हणून तिसऱ्यांदा धावांच्या मोठा डोंगर रचला आहे. आतापर्यंत प्रतिकाने 6 वनडे सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा उभारण्याचा हा विश्वविक्रम रचला असून भारत आयर्लंड क्रिकेट मालिकेत तिने 6 डावांमध्ये एकूण 444 धावा उभारल्या आहेत.आतापर्यंत आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट जगात कोणत्याही सलामीवीर फलंदाजाने किंवा इतर फलंदाजांनी असा विक्रम केलेला नाही हे विशेष उल्लेखनीय.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 + seventeen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.