Jobs in Chandrapur Ordnance Factory : देशाच्या फौजेसाठी शस्त्र उत्पादित करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांच्या जागा निघाल्या असून, यासाठी जागा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज बोलावण्यात आले आहे.
31 जानेवारी 2025 पर्यंत हे अर्ज करता येणार आहे.एकूण 207 जागांसाठी पदांची ही भरती होईल. या भरती जाहिरातीनुसार रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि नियम राहणार आहे. ते आपण पाहूया.
ही आहेत 207 रिक्त पदे.
चंद्रपूर ऑर्डीनस फॅक्टरी मध्ये जी 207 पदे निघाली आहे यापैकी सर्व पदे ही “डेंजर बिल्डिंग वर्कर्स”या वर्गातील पदे आहेत.यासाठी फॅक्टरी प्रशासनाकडून योग्य शैक्षणिक पात्रता आणि अनुभवधारक उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज बोलाविण्यात आले आहे.
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW).
या पदासाठी शैक्षणिक पात्रता-अर्जदार उमेदवार हा एनसीटीव्हीटी NCVT द्वारे AOPC ट्रेंडमध्ये जारी करण्यात येणारे एन ए सी/एनटीसी (NAC/NTC) प्रमाणपत्र धारक उमेदवार,जो यापूर्वीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड अंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड MIL अंतर्गत ऑर्डीनस फॅक्टरी मधून प्रशिक्षित आहेत ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करण्याचा आणि त्यांना हाताळण्याचा यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे.
किंवा सरकारसोबत जुळलेल्या सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून एओसीपी AOCP ट्रेड मध्ये NCVT द्वारे जारी करण्यात आलेले NAC/NTC सर्टिफिकेट असलेले उमेदवार आणि शासकीय आयटीआय ITI मधून AOCP पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचा या पदांसाठी विचार करण्यात येईल.
वयोमर्यादा.
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष (SC/ST/ वर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट,आणि OBC प्रवर्गातील अर्जदार उमेदवारांना 3 वर्षांची सूट असेल).
विशेष म्हणजे चंद्रपूर ऑर्डीनल फॅक्टरी साठी निघालेल्या या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणताही परीक्षा शूल्क द्यावा लागणार नाही.
या वर्गातील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 19 हजार 900 अधिक दैनिक भत्ता देण्यात येईल. नोकरीचे ठिकाण हे चंद्रपूर असेल उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रणाली ऑफलाईन ठेवण्यात आली असून इच्छुक उमेदवार खालील पत्त्यावर 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
The Chief Genral Manager, Ordnance Factory,Chanda, Dist. chandrapur (MS),Pincode 442501.
या पदांच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट ddpdoo.gov.in वर माहिती पाहू शकतात.