Russia Cancer Vaccine : संपूर्ण जगात कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्याच्यावर उपचारासाठी मोठा दिलासा देणारी बातमी रशियातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात आधी रशियाने प्रभावी आणि सर्वात पहिली कॅन्सर उपचारावर निधानासाठी लस तयार केली आहे. (Russia Cancer Vaccine) रशियाने तयार केलेल्या कॅन्सर उपचारावरील या लसीमुळे आता कॅन्सर रुग्णांना (Cancer Disease) घातक अशी केमोथेरेपीची कोणतीच गरज राहणार नसल्याचा दावा रशियामध्ये ही लस तयार करणाऱ्या वैज्ञानिक डॉक्टरांनी केला आहे.
जगात कॅन्सरवर ही पहिली लस रशियाने तयार केली आहे.त्यामुळे आता कॅन्सर निदान आणि उपचारावर होणारा मोठ्या प्रमाणावर खर्चही वाचणार आणि कॅन्सर पीडित रुग्ण लवकर बरा होईल, असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जगभरातील कॅन्सर रुग्ण आणि आरोग्य क्षेत्रासाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. रशियामध्ये कॅन्सर उपचारासाठी तयार करण्यात आलेली प्रभावी ठरेल का यामुळे त्यांचा रुग्ण बरा होण्याची खात्री मिळेल का आणि ही लस बनविणे रस्त्यासाठी शक्य आहे का याबाबत आता विविध माहिती समोर येत आहे.
हिमप्रदेश असलेले आणि युक्रेन सोबत युद्धात भिडलेल्या रशियाने डिसेंबर महिन्याच्या या आठवड्यातच पहिल्यांदा रशियामध्ये कॅन्सरची लस तयार झाल्याचा दावा केलेला आहे. रशियामधील आरोग्य मंत्रालयाशी जुळलेल्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर आंद्रेई कॅप्रीन यांनी रेडिओ रशियामध्ये संबोधित करताना कॅन्सर आजारावर रशियामध्ये जगात सर्वात पहिली लस तयार करण्यात आल्याची माहिती दिली.
या संदेशात आंद्रेई यांनी म्हटले की आपला देश कर्करोगावर मात देण्यासाठी लस तयार करण्यामध्ये यशस्वी झाला आहे. नवीन वर्षापासून ही लस रशिया मधील नागरिकांना मोफत स्वरूपात दिल्या जाणार असून MRNA ही लस पूर्णपणे रशियामध्येच विकसित करण्यात आली आहे.लस तयार करताना झालेल्या विविध चाचण्यांमध्ये दिसून आले की,ही लस दिल्यानंतर कॅन्सरच्या टियुमर्स (Cancer Tumor) वाढ रोखण्यासाठी मदत मिळते.
Also Read : WhatsApp Storage टेन्शन आहे,मग हे ट्रिक फॉलो करा !
Russia Cancer Vaccine : रशियन दाव्यानंतर जीवघेण्या कॅन्सर रोगावर नियंत्रण मिळेल?
रशिया येथील आरोग्य मंत्रालय रेडिओलॉजी विभागाचे डायरेक्टर आणि स्वास्थ्य मंत्रालयाने केलेल्या या दहाव्या नंतर जगात कॅन्सर सारख्या जीव घेणे आजारावर ही लस दिल्याने नियंत्रण मिळविता येणार का हे आता सर्वांना आणि विशेषकर चिकित्सा क्षेत्राला जाणून घेणे महत्त्वाचे झाले आहे. जगात अनेक दशकांपासून पसरलेला कॅन्सर हा जीवघेणा रोग आहे. यावर विविध पद्धतीने उपचार करण्यात येतो यात कीमोथेरेपी हा महत्त्वाचा उपचाराचा एक भाग आहे.
मात्र कॅन्सर सारख्या घातक रोगावर मात करण्यासाठी एकूणच पूर्ण प्रभावी लस आतापर्यंत कोणत्याही देशाने बनविण्यात यश प्राप्त केले नाही ही सत्यता आहे.विशेष म्हणजे यापूर्वी अशीच एक लस फेब्रुवारी 2024 मध्ये ब्रिटनमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा करून ती लस तेथील रुग्णांना आता ही दिली जात आहे.
खरंच केमोथेरेपी ची गरज भासणार नाही का?
काय म्हणाले डॉ.अंशूमन कुमार.
आता रशियाच्या या दाव्यानंतर भारतातील धर्मशिला नारायण रुग्णालय येथील सर्जिकल एंकोलॉजी विभागाचे संचालक डॉक्टर अंशुमन कुमार यांनी माध्यमांना याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.रशियाने कॅन्सरवर निदान करणारी लस तयार करण्याच्या डाव्या संदर्भात आणि किमोथेरेपी बाबत बोलताना डॉ.कुमार म्हणाले की, रशियाने या संदर्भात केलेल्या घोषणेतील खास बाब म्हणजे ते पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून रशियामध्ये नागरिकांना देण्याची सुरुवात करणार आहे.
याचा अर्थ हा आहे की रशियामध्ये वैज्ञानिकांनी कॅन्सरवर काढलेल्या या लस चे तेथे क्लीनिकली ट्रायल केलेले आहेत. तेथे आता ही लस कॅन्सर रुग्णांना उपलब्ध करण्यात येईल. डॉक्टर कुमार यांच्या मते रशियामध्ये या संदर्भात झालेली घोषणा एका अर्थाने राजकीय दृष्ट्या केलेली आहे. रशियाने यासंदर्भात सध्या अधिकृत माहिती दिली नाही. जर कॅन्सरवरील खरोखरच प्रभावी असेल तर नक्कीच उपचारादरम्यान त्यांचा रुग्णांना पुढे किमोथेरपीची गरज राहणार नाही.
अशी काम करणार रशियाची ही लस?किमतीही राहतील कमी?
कॅन्सर रोगावर उपचार करणारे वैद्यकीय विशेष अध्यानुसार रशियामध्ये तयार करण्यात आलेली कॅन्सरवरील ही लस जर यशस्वी झाली तर त्यामुळे कॅन्सर रुग्णाच्या शरीराची कॅन्सरसोबत लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित होईल आणि कॅन्सर सोबत लढण्याचे काम करेल.यामुळे कॅन्सर रोगाचा प्रभाव ही लस शरीरामधून नष्ट करेल.
याबाबत सध्या अमेरिका आणि युरोपमध्येही अशा प्रकारच्या चाचण्या सुरू आहे.मात्र या देशांनी अद्याप पर्यंत या बाबींचा खुलासा केला नाही. रशियाने तयार केलेले किंवा यानंतर अमेरिका आणि युरोपच्या देशांनी जर कॅन्सरवरील लसी तयार केले असतील, तर ते बाजारात आल्यानंतर त्यांची किंमत फार जास्त राहणार नाही.ही बाब कॅन्सरने पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासादायक राहणार आहे.
भारतात एकूण आरोग्य बजेट मध्ये 1.2% निधी होतो संशोधनावर खर्च.
विशेष म्हणजे रशियाने कॅन्सर रोगावर प्रभावी लस तयार करण्याचा दावा केल्यानंतर भारतात यावरील संशोधना संदर्भात ही चर्चा सुरू झालेले आहे. भारत देशात केंद्रीय आरोग्य बजेट च्या जीडीपी 1.9 % इतका आहे. आणि एकूण बजेट मधील 1.2% निधी हा कॅन्सर आणि विविध रोगांवर निदान आणि उपचार संशोधन बाबींवर खर्च होतो. आरोग्य बजेटमध्ये भारताने जर संशोधनावर आपला बजेट वाढविला तर भारत नक्कीच कॅन्सरवर प्रभावी उपचार लस तयार करू शकतो.
जर भारतात अशी लस तयार झाली तर कॅन्सर रुग्णांना याचा फार मोठा फायदा मिळेल. कारण अलीकडच्या काळात भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढली आहे.आयसीएमआर.च्या एका रिपोर्टनुसार येणाऱ्या पाच वर्षात भारतात 12 टक्के दराने कॅन्सर रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.यात फार चिंतेची बाब ही आहे की यादरम्यान देशातील तरुण वर्ग हा कॅन्सर रोगाचा तीव्रतेने बळी पडू शकते.