BSNL ची टेलिकॉम क्षेत्रात जोरदार मुसंडी.3 महिन्यात 36 लाख युजर्स वाढले!

भारतीय दूरसंचार निगम अर्थातच BSNL ने टेलिकॉम क्षेत्रात तीन महिन्यात मोठी मुसंडी मारली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे आपले टेलिफोन आणि रिचार्ज रेट वाढविले असताना, रिचार्ज दरात मोठी स्पर्धा असताना यात बीएसएनएल कमी किमतीचे प्लान देऊन देशभरात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत स्पर्धेत बाजी मारली आहे.

टेलिकॉम क्षेत्रात कंपन्या आपले रिचार्ज प्लान चे रेट वाढवत असताना यादरम्यान बीएसएनएलने आपले रिचार्ज प्लान चे रेट आणखी कमी केले आहे त्यामुळे बीएसएनएल ला एक मोठा फायदा झाला आहे.ते म्हणजे फक्त तीन महिन्यात बीएसएनएलचे देशभरात 36 लाख युजर्स वाढले आहे.एकाप्रकारे टेलिकॉम क्षेत्रात बीएसएनएलची ही जोरदार मुसंडी मानल्या जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतात बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार निगम कंपनी असून त्याला दोन खाजगी टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धा द्यावी लागते. ते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज ची असलेली जियो टेलिकॉम आणि एअरटेल सोबतच आयडिया airtel मध्ये मर्ज झाल्यानंतर या खाजगी टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धा देण्याचे बीएसएनएल समोर एक आव्हान होते. हे कंपनी आपले रिचार्ज प्लान चे रेट वाढवत असताना आर्थिक संकटात असताना सुद्धा या सरकारी निगमने रिचार्ज प्लान चे रेट कमी केले.

त्यामुळे देशभरात सर्व युजर्स खाजगी टेलिकॉम कंपनीचा एक सिम वापरताना आता विशेष करून दुसरा सिम हा बीएसएनएल चा वापरत आहेत. युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये दोन-सिम असताना खाजगी टेलिकॉम कंपनीचे सिम साठी रिचार्ज महागडे पडत असल्याने आता युजर बीएसएनएलचे स्वस्त रिचार्ज करून घेणे पसंत करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात वाढविले होते खाजगी कंपन्यांनी रिचार्ज दर.

खाजगी टेलिकॉम् कंपन्यांमध्ये आर्थिक मुनाफा घेण्यासाठी रिचार्ज प्लान चे रेट वाढविण्याचे स्पर्धा वाढली होती. त्यामुळे देशात एअरटेल वोडाफोन आयडिया जिओ रिलायन्स या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान चे दर मोठ्या प्रमाणात वाढविले. हे रिचार्ज प्लान महाग असताना भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड BSNL ने
खाजगी कंपन्यांसोबत स्पर्धेत उतरताना अचानक आपले रिचार्ज प्लान कमी करून स्वस्त दरात बाजारात उपलब्ध केले. त्यामुळे देशभरात मोबाईल युजर्स बीएसएनएलच्या आकर्षक किमतीत आणि कमी दरात कॉलिंग,इंटरनेट चा जास्त डाटा देणाऱ्या स्वस्त रिचार्ज प्लान कडे स्वतःहून आकर्षित झाले.

यातून या सरकारी टेलिकॉम कंपनीने खाजगी कंपन्यांना मात देण्यास आता सुरुवात केली आहे. स्वस्त रिचार्ज प्लान आणि चांगली सेवा यामुळेच भारतात ऑगस्ट 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत अगदी तीन महिन्यात बीएसएनएलचे 36 लाख नवे सिम युजर्स वाढले आहे.

सर्वात कमी दराचे रिचार्ज BSNL चे.

देशात एकूण खाजगी टेलिफोन कंपन्यांपैकी सर्वात जास्त रिचार्ज प्लान दर हे भारत संचार निगम लिमिटेडचे(बीएसएनएल) आहेत. सध्या अधिकांश लोक स्मार्ट फोन मध्ये दोन सिम सुविधा असलेले मोबाईल वापरतात. आणि आजकाल प्रत्येकाकडे दोन सिम कार्ड आहेत. पण या दोन्ही सिम कार्ड मध्ये महागडे रिचार्ज सर्वांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे दोन पैकी एक सिम युजर्स बीएसएनएलचा वापरत आहेत.

कारण इतर कंपन्यांपेक्षा बीएसएनएल चे रिचार्ज रेट फार कमी आहे. यामुळेच आगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत देशात BSNL चे सर्वात जास्त म्हणजे 36 लाख नवे सिम युजर्स वाढले आहेत. यात एकट्या ऑगस्ट महिन्यात बीएसएनएलचे 25 लाखापेक्षा अधिक सिम युजर्स वाढले होते. तर सप्टेंबर मध्ये 38000 आणि ऑक्टोबर महिन्यात सात लाख 7 हजार नवीन ग्राहक बीएसएनएल सेवेशी जुडले.

तर दुसरीकडे इतर खाजगी टेलिफोन कंपनी पेक्षा बीएसएनएलची या तीन महिण्यात वाढलेली ग्राहक संख्या सर्वात जास्त आहे.तर बीएसएनएलच्या प्रीपेड कनेक्शनमध्ये जुलै 2024 मध्ये 8.84 कोटी ग्राहक होते, ते ऑक्टोबरमध्ये 9.2 कोटी ग्राहक बनले आहेत.

BSNL दूरसंचार सुविधेत केली वाढ.

खाजगी कंपन्यांना स्पर्धा देताना बीएसएनएल कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात आपल्या सुविधा वाढविल्याने ग्राहक याकडे आकर्षित झाले आहे नवीन सिम घेण्यासोबतच इतर टेलिकॉम कंपनीचे सिम कार्डधारक आपले सिम बीएसएनएल सिम मध्ये पोर्ट करीत आहेत ते स्वस्त रिचार्ज मुळे. मागील काही काळात बीएसएनएलने भारतात ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये फोरजी (4G) नेटवर्क जाळे विणले आहे.

आता लवकरच बीएसएनएलकडून भारतात 5G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ग्राहकांना सध्या फोरजी सेवेचा लाभ मिळत आहे आणि तेही रिचार्जची कमी किंमत आणि वेगवान इंटरनेट स्पीड यामुळे. बीएसएनएलच्या वाढत्या सुविधेमुळे या एकमात्र सरकारी दूरसंचार कंपनीकडे मोठ्या प्रमाणात नवे ग्राहक आणि सिम पोर्ट करणाऱ्या ग्राहकांची आवक वाढली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.