WhatsApp Storage Problem Solved : दैनंदिन जीवनात स्मार्टफोन आणि त्यात व्हाट्सअप हे प्रत्येकाची गरज बनली आहे. आणि व्हाट्सअप वापरताना त्यात आलेले व्हिडिओ मेसेज, महत्त्वाचे आर्टिकल्स आणि इतर बाबी स्टोअर करायचा आहे,तर ते सर्वांसाठी एक मोठा टेन्शन असते. व्हाट्सअप चे स्टोरेज फुल झाल्याने नवीन आलेले व्हिडिओ फोटोज आणि कामांच्या फाईल उघडून पाहणे कधी कधी कठीण होऊन जाते.
अधिकांश लोक व्हाट्सअप च्या स्टोरेज मुळे अगदी त्रस्त होऊन जातात. मात्र व्हाट्सअप स्टेटस साठी जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी काही टिप्स आहेत.ते फॉलो केल्याने स्टोरेज समस्या दूर होते.यासाठी एक्सेस स्टोरेज घेण्याची गरज सुद्धा नसते ते कसे आपण या लेखात पाहूया.
आजकल इन्स्टंट मेसेजिंग ॲप सर्वांचे फोन मध्ये उपलब्ध असतो. दररोज कोट्यावधी लोक व्हाट्सअप वापरतात आणि यासाठी मेसेजिंग ॲप सुद्धा वापरले जाते.चॅटिंग सोबत व्हाट्सअप व्हाईस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाईन पेमेंटची सुद्धा सुविधा आहे.यातून आता ऑफिस असो की शाळा यातून सर्व कामे अगदी सेकंदात पूर्ण होऊन जातात.तर दुसरीकडे व्हाट्सअप म्हणजे गप्पा गोष्टींचा एक मजबूत माध्यम झाला आहे.
या दरम्यान व्हाट्सअप मध्ये येणाऱ्या व्हिडिओ आणि चॅट बॉक्स मधील अनेक कंटेंट आपल्याला स्टोरेज करण्याची गरज असते, मात्र व्हाट्सअप ची स्टोरेज क्षमता संपली तर पुढे आलेला कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ आणि इतर फाइल्स उघडता येत नाही, यात मग पुढे काय करायचे हे कुणाला सुझत नाही. मात्र व्हाट्सअप मध्येच असलेल्या काही ट्रिक्स एका मागे एक फॉलो केल्याने व्हाट्सअप ची स्टोरेज समस्या दूर होते.
हे स्टेटस फॉलो करा आणि मिळवा स्टोरेज.
व्हाट्सअप वरील स्टोरी समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स आहे यासाठी आपल्याला या गोष्टी फॉलो करावा लागेल.
स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप ओपन करा.(अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी ही एकच प्रक्रिया असते)दोन्ही फोनमधील स्टोरेज क्लिअर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- व्हॉट्सॲप सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा
- यानंतर स्टोरेज आणि डाटावर क्लिक करा.
- मॅनेज स्टोरेज पर्यायावर क्लिक करा.
- डाटा सॉर्ट करा,फिल्टर करा आणि कंटेंट डिलीट करा.
चॅट किंवा चॅनेल निवडा. यानंतर डिलीट आयटमवर जावून क्लिक करा.
त्यात एखाद्या फोटो-व्हिडिओच्या अनेक कॉपी असतील तर storage साठी जागा तयार करण्याकरिता सर्व content कॉपी डिलीट करा.
व्हॉट्सॲपवर अनावश्यक फाईल्स डिलीट करा.
आपल्या स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये हा पर्याय मिळतो. याव्यतिरिक्त आपल्या ते गॅलरी मधून कायमचे डिलीट करण्याचे ऑप्शन असते त्यातून कंटेंट डिलीट करू शकता. यामुळे फोनमधील स्टोरेज डिलीट केल्याने स्पेस क्लियर होऊन जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअप स्टेटस ची समस्या आली की लगेच या स्टेप फॉलो करून ती दूर करता येऊ शकते.
व्हाट्सअप मधील चॅट हिस्टरी डिलीट करून मिळते स्टोरीज.
व्हाट्सअप मध्ये व्यक्तिगत आणि ग्रुपमध्ये खूप सारे मेसेज व्हिडिओ ऑडिओ आणि इतर फाइल्स असल्याने कधी कधी मोबाईल हँग होण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे व्हाट्सअप मध्ये स्टोरेज निर्माण केल्यास व्हाट्सअप रिफ्रेश होऊन जाते. यासाठी व्हाट्सअप मध्ये असलेला स्टोरीज क्लिअर करण्यासाठी चॅट हिस्ट्रीला डिलीट केले जाऊ शकते. याकरिता काही ऑप्शन आहे.
संबंधित चॅट ओपन करा.
- तीन ठिपके किंवा चॅटमधील सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा.
- नंतर मोअर ऑप्शनवर क्लिक करा.
- ‘क्लिअर चॅट हिस्ट्री’चा पर्यायावर क्लिक करा,आणि चॅट हिस्ट्री डिलीट करा.
विशेष म्हणजे व्हाट्सअप मध्ये सर्वाधिक जागा ही ग्रुप चॅट घेते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या व्हाट्सअप मध्ये असलेल्या ग्रुपमधील चॅट कन्टेन्ट डिलीट केल्याने व्हाट्सअप स्टेटस क्लिअर होते.कधी वेळ मिळाला तर किंवा आठवड्यातील शेवटच्या दिवशी निवांत वेळी व्हाट्सअप वर हे पर्याय वापरून आपण स्टोरेज समस्या दूर करू शकतो.