Worlds Richest Industrialist : जगात 3 रे अब्जाधीश असलेले Gautam Adani आता टॉप-20 अब्जाधीश यादीतून बाहेर ? संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स आणि अब्जाधीशांचा यादीत 19 क्रमांकावर घसरण.
जगात आणि भारतात मोठ्या उद्योग समूहापैकी एक असलेले अदानी ग्रुप चे चेअरमन असलेले मागील दोन वर्षात जगात तिसरे सर्वाधिक अब्जाधीश उद्योगपती होते मात्र आता ते जगातील अब्जाधीश असलेल्या टॉप-20 च्या यादीत बाहेर पडताना दिसत आहे. गौतम अदानी हे 15 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या जगातील अब्जाधीश आणि श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते, मात्र भारतात दुसऱ्या सर्वात बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेले अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी आता श्रीमंत आणि अब्जाधीशांच्या रँकिंगमध्ये खूप खाली घसरले आहेत.
15 डिसेंबर 2022 रोजी फोर्ब्स नुसार 133.2 अब्ज डॉलर्सची होती संपत्ती.
अदानी समूह हे ऑइल, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल इंजीनियरिंग यांच्यासह विविध उद्योगातील मोठे समूह आहे. आणि याचे चेअरमन गौतम अदानी हे आहेत. आपल्या उद्योग विश्वातून ते जगात अब्जाधीशांच्या टॉप रँकिंगमध्ये होते.जगात विविध क्षेत्रात रँकिंग देणारी संस्था म्हणजेच फोर्ब्स.आणि फोर्ब्सनुसार, गौतम यांची एकूण संपत्ती 15 डिसेंबर 2022 रोजी 133.2अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.
यावर्षी जगात सर्वात अब्जाधीश उद्योगपती म्हणून फ्रान्स उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत होते. त्यांची संपत्ती 184.3 अब्ज डॉलरची होती, तर त्यापाठोपाठ प्रख्यात अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांची संपत्ती174.8 अब्ज डॉलर होती आणि ते जगात अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते.
यावर्षी गौतम अदानी हे जगात तिसरे अध्यादेश तर भारतातील सर्वात मोठा उद्योग विश्व असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती एकूण 91 अब्ज डॉलर होती.ते फोर्ब्सच्या या यादीत आठव्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या दोन वर्षात गौतम अदानी हे अब्जाधीशांच्या यादीत माघारले आहे आणि जगातील अब्जाधीशांची यादी मध्ये रँकिंग बदलला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट मुळे अदानी माघारले.
उल्लेखनीय म्हणजे वर्ष 2024 च्या सुरुवातीला जगात आर्थिक घडामोडी दरम्यान अमेरिकेच्या शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग (HindenBirg)ने आपला रिसर्च रिपोर्ट समोर आणला होता यात अदानी उद्योग समूहावर मोठे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहाच्या उद्योग विश्वावर आणि विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
अमेरिकन हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंग कंपनीने अदानी समूहावर शेअर्सच्या किमतीत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. मात्र अदानी समूहाने पूर्ण आरोप फेटाळून लावले असतानाही अदानी समूहाच्या शेअरची मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या वेळेपासूनच अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे जगातील अब्जाधिशांच्या रँकिंग मध्ये तिसऱ्या क्रमांकावरून दहाव्या क्रमांकावर घसरले होते.
गौतम अदानीं यांच्या संपत्तीत 50,अब्ज डॉलर्सची घसरण.
हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहांच्या कंपनीवर शेअर मार्केटमध्ये शेअर्स सोबत छेडछाड करण्यात घेऊन यासाठी लाचखोरी आल्याचा आरोप करतात या कंपनीचे शेअर्समध्ये खूप घसरण झाली होती.त्यांच्या संपत्तीत यानंतर 50 अब्ज डॉलरची घसरण पाहायला मिळाली.
फोर्ब्सच्या व्यतिरिक्त अब्जाधीशांची आर्थिक स्थिती समोर आणणाऱ्या ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार सध्या जगातील तिसरे सर्वात श्रीमंत असलेले गौतम अदानी हे सध्या 19 व्या स्थानावर आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 82.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2024,या वर्षी त्यांच्या संपत्तीत एकूण 2.21अब्ज डॉलरची घट झाली आहे. तर मागील दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत तब्बल 50 अब्ज डॉलरची घट झाली आहे.