UPI Online Payments : Google Pay , PhonePe आणि Paytm व्यवहारात चुकीने पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका ,हे टिप्स फॉलो करा, पैसे परत मिळवा.

UPI Online Payments : Google Pay , PhonePe आणि Paytm व्यवहारात चुकीने पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका ,हे टिप्स फॉलो करा, पैसे परत मिळवा.

आजकाल दैनंदिन जीवनात बँकेचे व्यवहार हातात असलेल्या स्मार्टफोनवरून ऑनलाइन पद्धतीने करणे सोपे झाले आहे. पैशांची आर्थिक देवाण-घेवाण करताना आरबीआय कडून अधिकृत असलेल्या GPay (गूगल पे) PhonePe (फोन पे)किंवा Paytm (पे-टीएम) वरून ऑनलाईन पैसे पाठविल्या जातात. मात्र कधी कधी चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले? तर ते परत मिळण्यासाठी बँकिंग ग्राहकांना बँकेत जाऊन तक्रारी आणि भागदौड करावी लागते. मात्र यासाठी ऑनलाइन अशा अनेक टिप्स आहेत यांना फॉलो करून आपण आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाचू शकतो. त्यामुळे कोणत्या ह्या टिप्स याबाबत आपण जाणून घेऊया…..

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

असे मिळवा चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे परत.

कधी कधी आपल्या हातातून स्मार्टफोनमध्ये ऑनलाइन बँकिंग करताना PhonePe, Google Pay वा Paytm द्वारे चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर होवून जातात. अशावेळी हे पैसे परत कसं मिळावी हे प्रश्न असतो तर यासाठी पर्याय आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या या ॲप मध्ये असतात. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आजकाल मोठ्या प्रमाणात वापर होतो,पण कधी तरी चुकून,अनवधानाने चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर होऊन जातात. अशावेळी न घाबरता हे करायला हवे….

# सर्वप्रथम सबंधित पेमेंट प्लॅटफॉर्मवर ज्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झालंय त्या संबंधी माहिती रिपोर्ट द्यावी लागते.विशेष म्हणजे यासाठी PhonePe, GPay, Paytm ya Apps प्लॅटफॉर्ममध्ये मदत (Help )किंवा सपोर्ट (Sapport)विभाग असतो. तेथे आपला व्यवहार आयडी, आणि प्राप्तकर्त्याचा UPI आयडी आणि रक्कम यासारखे तपशील घेऊ शकता.अधिकांश प्लॅटफॉर्मवर अशा समस्या दूर होतात.

# जर वापरण्यात येत असलेल्या अश्या ॲपवर समस्या सुटली नाही तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या वेबसाइट वर ऑनलाईन भेट द्या. या पोर्टल वर विवाद निवारण यंत्रणा सेक्शन मध्ये नेव्हिगेट करून, व्यवहार आयडी, व्हर्च्युअल पेमेंटचा पत्ता, एकूण रक्कम आणि डेट (दिनांक)या तपशीलांसह तेथे फॉर्म भरावे लागेल.सोबतच कॅश डेबिट झाल्याचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंटची प्रत जोडावी लागते.

सर्व्हिस प्रोव्हायडर (PSP) शी संपर्क साधू शकता.

यूपीआय वरून पैसे ट्रान्सफर करताना चुकीने दुसऱ्या कळे पैसे जात असल्यास आणि यासाठी तक्रार NPCI पोर्टलवर केल्यावरही तक्रार दूर झाली नसल्यास, आपल्या बँकेशी किंवा आपल्या फोन किंवा कॉम्प्युटर मध्ये ॲप सोबत लिंक केलेल्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (PSP) सोबत संपर्क साधू शकता.यावर चुकीच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे तपशील शेअर केल्यावर ते पुढील तपास करतील.उल्लेखनीय बाब म्हणजे बँका आणि पीएसपी ला आपल्या ॲप्स,अधिकृत कम्युनिकेशन चॅनेलद्वारे अश्या तक्रारीच्या स्थितीबद्दल संबंधित तक्रारकर्त्याना नियमित अपडेट द्यावे लागते.

तक्रारीचे निरसन न झाल्यास RBI लोकपालाकडे करता येते तक्रार.

डिजिटल ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना झालेली चूक आणि त्यानंतर संबंधित मार्गाने तक्रार करूनही त्याचे निरसन होत नसल्यास आरबीआय कडे तुमचे समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. अशा व्यवहारांसाठी आरबीआयचे “लोकपाल”हे पोर्टल आणि यासाठी ऑनलाईन,ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे.आधी केलेली तक्रार आणि समस्यांवर जर 30 दिवसापर्यंत कारवाई न झाल्यास किंवा समस्या न सुटल्यास, आरबीआयच्या हा महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी आपल्या बँकेच्या शाखा किंवा ज्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर तुम्ही आर्थिक देवाण-घेवाण केली त्या प्लॅटफॉर्मच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात अशी तक्रार दाखल केल्या जाऊ शकते. यासाठी आपल्याकडे संबंधित प्लॅटफॉर्मचा आणि स्वतःचा ईमेल आयडी, आर्थिक देवाणघेवाणीचा बँकेच्या स्टेटमेंट आणि NPCI प्रतिसादांसह सर्व आवश्यक कागदपत्रे लागतील.

असे अनावधान किंवा चूक टाळण्यासाठी हे करा?.

डिजिटल ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि बँकिंग व्यवहार ऑनलाइन करताना चुकीने किंवा अनावधानाने आर्थिक नुकसान होतो हे टाळण्यासाठी आपल्या डिजिटल ऑनलाइन आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण करणे पूर्वी सर्व व्यवहारांची पुष्टी करणे जरुरी असते. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी आपले (UPI) आयडी नीट तपासा. यादरम्यान मॅन्युअल चुका टाळण्यासाठी वापरलेले संपर्क सेव्ह करून ठेवा. याव्यतिरिक्त रिक्वेस्ट मनी या विकल्पाचा वापर केल्यास, आर्थिक व्यवहाराच्या जोखीम कमी होऊ शकतो.यासाठी प्राप्तकर्त्यांचे यूपीआय तपशील बरोबर असल्याची खात्री करा. हे लक्षात घ्या की एखाद्या वेळी चुकीच्या आयडीवर चुकून पैसे ट्रान्सफर झाले,तर ते परत मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला थोडा वेळ लागतोच. त्यामुळे मानसिकरित्या खचून न जाता यासाठी जे पर्याय आहे त्यांच्या शांतपणे वापर करून तक्रार आणि समस्याचे निराकरण होऊ शकते.डिजिटल व्यवहार करताना अशा चुका झाल्यास प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले पैसे परत बँक खात्यात येण्यासाठी पर्याय आहे, याची माहिती आपल्याला असणे जरुरी तर आहेच, मात्र डिजिटल ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना यासाठी जागरूक राहणेही तेवढे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.