आता BSNL Broadband कनेक्शन साठी मोफत Wi-Fi इन्स्टॉलेशन.
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या या जगात इंटरनेट द्वारे डाटा उपलब्ध असणे ही सर्वांची दैनंदिन गरज बनली आहे. इंटरनेट आणि वायफाय सेवेसाठी विविध टेलिकॉम कंपन्या विविध रिचार्ज प्लान बाजारात आणतात. यात सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएल द्वारे मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट वाय-फाय सेवेसाठी विविध आकर्षक प्लान आणल्या जात आहे. इंटरनेटसाठी ब्रॉडबँड सेवेतून बीएसएनएल ने आता नवा प्लॅन आणला आहे. हे सर्वसामान्य बीएसएनएल ग्राहकांना आर्थिक रूपाने परवडणारे आहे. फक्त एक हजार रुपयांच्या आत आता बीएसएनएल कडून ब्रॉड बँड प्लान लॉन्च करण्यात आला असून या प्लॅन सोबत मोफत वाय-फाय इन्स्टॉलेशन होणार आहे.
काय आहे नवा प्लान ?
मोबाईल स्मार्टफोन कॉम्प्युटर लॅपटॉप, आणि टेलिव्हिजन पाहण्यासाठी भरपूर असा इंटरनेट डाटाची आज प्रत्येकाला गरज आहे. यासाठी ग्राहक अविरत इंटरनेट सेवा मिळविण्यासाठी ब्रॉडबँड कनेक्शन घेतात. आता यासाठी बीएसएनएल नवा ब्रॉडबँड प्लॅन आणला असून, हा सर्वांच्या आर्थिक बजेटमध्ये असणार आहे.बीएसएनएल द्वारे आता फक्त 999 मध्ये तीन महिन्यांसाठी आणि तेही 25mbps फायबर ब्रॉडबँड वायफाय सेवा मिळणार असून हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा स्वस्त प्लान आहे.
महिन्याला मिळणार 1200 जीबी डाटा.
BSNL द्वारे फक्त 999 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या ब्रॉडबँड प्लॅनची खास विशेषता ही आहे की यातून ग्राहकांना दरमहा 1200GB FUP internet data मिळणार आहे.कुणीही या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1800-4444 या क्रमांकावर संपर्क करून किंवा WhatsApp वर मेसेज पाठवून माहिती घेवू शकते.BSNL द्वारे आता इतर टेलिकॉम कंपन्यांना स्पर्धा देत असताना आपल्या ग्राहकांना अनेक आकर्षक प्लान ऑफर करीत आहे बीएसएनएलच्या वेबसाईटवर विविध प्लान्सची माहिती उपलब्ध आहे.
उत्तम फायबर ब्रॉडबँड डील.
BSNL टेलिकॉम कंपनी आता आपल्या सर्व ग्राहकांना उत्तम अशी फायबर ब्रॉडबँड सेवा देत आहे.याच्या फायबर ब्रॉडबँड सेवा देशात अनेक शहरी,ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेत.या ऑफरबद्दल माहिती घेतल्यास सर्वांना फायदा मिळेल.सांगणार आहोत.
BSNL कंपनीच्या या नव्या ऑफर मुळे फक्त 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी 25Mbps चा प्लॅन मिळतो,मात्र यापेक्षा जास्त डाटा घेतला तर शेवटच्या बिलावर अतिरिक्त कर देखील भरावा लागणार आहे.पण या प्लॅनमध्ये प्रत्येक ग्राहकाला दर महिन्याला 1200GB (FUP) डाटा मिळणार आहे.
असा मिळवा प्लानचा फायदा.
BSNL चा हा प्लॅन घ्यावयाचा असेल तर WhatsApp वरून मेसेज करावा लागेल.यासाठी दिलेला 1800-4444 क्रमांकावर मेसेज पाठवल्यानंतर प्लानसाठी रिप्लाय मिळेल. या ऑफरसोबत सर्व ग्राहकांना दर महिन्याला 333 रुपयांचा ब्रॉड बँड प्लान मिळेल.यामध्ये युजर्सला भरपूर डाटा दिला जातो.
इतर प्लॅनही निवडू शकतात.
BSNL फायबर ग्राहक वायफाय इंटरनेट सेवेसाठी कंपनीच्या वेबसाईट आणि इतर माध्यमातून bsnl चे आणखी काही प्लॅनही निवडू शकतात. त्यासाठी कंपनीच्या साईटवर माहिती मिले.येथे सर्वांना आपल्या सुविधा नुसार प्लॅन शोधणं सोपं होते.मुख्य म्हणजे BSNL telecom ही भारतात तिसरी सर्वात मोठी ब्रॉडबँड सेवा देणारी कंपनी बनली आहे.आता इतर कंपण्यांपेक्षा BSNL व्दारे खूप स्पीड देणारे स्वस्त प्लॅन दिले जात आहे. यातून bsnl सेवा घेणाऱ्या ग्राहकांना भरपूर डेटा मिळतो.