Income Tax Raid : देशात सर्वात मोठा इन्कम टॅक्स छापा 36 मशीन मधून 10 दिवस चालली नोटांची मोजणी.देशात आयकर विभागाकडून आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या छाप्यात मिळालेल्या नोटा मोजण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी आणि अनेक मशीन नोट counting साठी वापराव्या लागल्या.नोटांचा प्रचंड असा साठा आढल्याने सरकार आणि आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा चक्रावले गेले.आयकर विभागाला या छापेमारीत तपास करताना जमीनी खाली दाबून ठेवलेल्या कोट्यावधी किंमती ऐवज शोधण्यासाठी स्कॅनिंग व्हील,आणि ड्रिल मशीनचा वापर करावा लागला.तर आयकर विभागाला या ऑपरेशनमध्ये मिळालेल्या नोटा मोजण्यासाठी 36 नवीन मशीन खरेदी करून वापराव्या लागल्या.विशेष म्हणजे या रेड मध्ये इतकी प्रचंड कॅश मिळाल्याने इन्कम टॅक्स अधिकारींना विविध बँकेतील कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी नेमावे लागले.
विशेष म्हणजे आयकर विभागाकडून बेहिशोबी संपतीच्या शोधासाठी आपल्या गोपनीय नेटवर्क माध्यमातून माहिती गोळा करून छापेमारी करून कारवाई होते.मात्र ही पहिली वेळ होती,ज्यात या विभागाच्या कारवाईच्या रिकॉर्ड मधील हा सर्वात मोठा आयकर छापा होता. इन्कम टॅक्स विभागाची ही रेड ओडिशामध्ये पडली.यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली. एकूण दहा दिवस छापा कारवाई सुरु राहिली.10 दिवस नोटांची मोजणी साठी36 मशीनची मदत घेत सापडलेल्या नोटांचा साठा ट्रक मध्ये लादून नेण्यात आला.विशेष म्हणजे या ऐतिहासिक रेड नंतर केंद्र सरकारने छापा टाकणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव केला आहे.
352 कोटींची कॅश केली जप्त.
आयकर विभागाकडून ओडिशा राज्यात हा छापा टाकण्यात आला होता.बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड ही दारू उत्पादक कंपनी असून ती ओडिशा मधून कार्यरत आहे.या कंपनीचे ओडिशामध्ये मुख्यालय आहे.सोबतच याचे बीडीपीएल हा समूह राज्यभर कार्यरत आहे. त्याच्या इतर व्यवसाय विभागांमध्ये बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कडून फ्लाय ॲश ब्रिक्स ची निर्मिती केली जाते. तर क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून IMFL बॉटलिंग होते.याव्यतिरिक्त किशोर प्रसाद विजय प्रसाद बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड याचाही समूहात समावेश आहे.या कंपनीच्या ठिकाणी ओडिशा आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता.या दरम्यान खूप बारकाईने तपास करून छापेमारी मध्ये 352 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली होती.
ओडिशा आयकर विभागाकडून विभागाचे निदेशक एस.के.झा, अतिरिक्त निदेशक गुरुप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात आयकर टीमने बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या अनेक विभाग आणि कार्यालयांवर छापा टाकल्यावर तब्बल 10 दिवस कारवाई चालली.या छाप्यात 352 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली होती.विशेष म्हणजे आयकर विभागाकडून आतापर्यंतचा हा सर्वात मोठे ऑपरेशन मानला जातो. होते.या छाप्याची भारतात नव्हे तर विदेशात ही चर्चा झाली.
कडेकोट सिक्युरिटी मध्ये ट्रकमध्ये नोटा भरल्या.
ओडिषा आयकर विभागाकडून टाकण्यात आलेल्या या इन्कम टॅक्स रेड मध्ये प्रचंड प्रमाणात कॅश सापडली होती.आयकर विभागाला जमिनीखाली दाबून ठेवण्यात आलेले ऐवज शोधण्यासाठी स्कॅनिंग व्हील मशीन चा वापर करावा लागला. छाप्यात सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी 36 नवीन काउंटिंग मशीन वापरून दहा दिवस कारवाई सुरू होती.यासाठी आयकर विभागाचे शेकडो अधिकारी कर्मचारी कामावर लागले होते. मोठ्या प्रमाणात कॅश मिळाल्याने नोटा मोजण्यासाठी बँकिंग कर्मचाऱ्यांची गरज असल्याने या छापीमारीत ओडिसा मधील विविध बँकेच्या कर्मचाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी बोलाविण्यात आले होते.
या संपूर्ण छापा मार कारवाई दरम्यान आयकर विभागाकडून प्रत्येक ठिकाणी करेंकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला होता. कोट्यावधींची कॅश जप करून काउंटिंग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडलाचे ढिगारे असल्याने ते ट्रक मध्ये भरून कडे कोट सुरक्षा व्यवस्थेत आयकर विभागाच्या निर्धारित कार्यालयात पाठविण्यात आले.नंतर सरकारकडून नियमानुसार ही संपूर्ण कॅश जप्त करण्यात आली.या कारवाईनंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले ओडिशामधील आयकर विभागाच्या अधिकारांच्या टीम केंद्र सरकारने सन्मान केला आहे.
***