EVM Elon Musk : EVM मधून अतिवेगवान मतमोजणी एलन मस्क साठी अजुबा का ?

EVM Elon Musk : EVM मधून अतिवेगवान मतमोजणी एलन मस्क साठी अजुबा का ? महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून मतमोजणीनंतर निकाल लागले आहे. यात भाजप आणि महायुतीला मिळालेले बहुमत,आणि महाविकास आघाडीला महायुतीने मोठी मात देऊन लँड स्लाईड विक्टरी संपादन केल्याने अनेक प्रश्न आणि संशय निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर अख्ख्या देशात ईव्हीएम मध्ये मतदान,मतमोजणी आणि यातून आलेले निकाल यावर संशयकल्लोळ माजलेला असतानाच यात आता विश्वविख्यात उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी ईव्हीएम हॅकिंग बद्दल आणि आता नुकतेच भारतात काही तासातच 64 कोटी मतमोजणीवर केलेले भाष्य सध्या माध्यम आणि सोशल माध्यमवर गाजत आहे.

64 कोटी मते मोजणाऱ्या भारतीय ईव्हीएम वर अमेरिकन उद्योगपती यांनी का केले प्रश्नचिन्ह निर्माण ?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम आणि मतमोजणीवर संशय निर्माण होत असताना भारतात अवघ्या 24 तासांत 64 कोटी मते कशी मोजली जातात यावर प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांना आता  प्रश्न’ पडला आहे. यास एलन मस्क यांनी महाराष्ट्रातील सहा कोटी मतांच्या मोजणीवरही आश्चर्य व्यक्त केला आहे.मात्र गेल्या अनेक वर्षापासून भारतातील नागरिक,सामाजिक आणि राजकीय स्तरावर देशात निवडणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीवर आता पर्यंत अनेक प्रश्न निर्माण केल्या जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी यावर शेकडो प्रश्न आहेत ज्यांच्यावर अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत त्यामुळे ईव्हीएम मधून मतदान,यानंतर मतगणना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.आता तर तांत्रिक विश्वात मानाचे स्थान असलेले आणि या क्षेत्रात अग्रणी असलेले अमेरिकन उद्योगपती टेस्ला आणि स्पेस एक्स सारख्या तांत्रिक उद्योगांचे प्रमुख असलेले एलन मस्क यांच्या प्रश्नांवर अख्या जगाचे लक्ष लागले आहे. एक्स वरून ट्विट करताना एलन मस्क यांना भारतात लोकशाही प्रणालीने निवडणुकीमध्ये ईव्हीएम हाताळणी आणि या मशीनच्या प्रणालीबद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आहे. भारतात ईव्हीएम हाताळणी करणाऱ्या यंत्रणेकडून फक्त एकाच दिवसात 64 कोटी मते मोजल्या गेली आणि दुसरीकडे  अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी नुकतेच झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत आपल्या पोस्ट मधून आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका प्रकारे त्यांनी भारतीय ईव्हीएमच्या मतमोजणीच्या वेगावरून अचंबित असल्याची भावना व्यक्त केली आहे.मात्र यात भारतात काही लोकांना मस्क यांची पोस्ट आणि भाष्यहे त्यांच्यासाठी अप्रूप आहे असे दिसते.जणू ईव्हीएमच्या सत्यतेचे प्रमाणपत्र मस्क यांनी दिल्याचे काही लोक मानत आहे,मात्र सहा महिन्यांपूर्वी मस्क यांनी भारतीय ईव्हीएम यंत्रणेवर आणि याच्या हॅकिंग वर जे प्रश्न उपस्थित केले होते, यातच मस्क यांनी नुकत्याच केलेल्या भाष्यसोबत थेट कनेक्शन आहे. ईव्हीएम हाताळणी आणि अतिवेगाने मतगणना यावर मस्क यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय मतदान व्यवस्थेचे कौतुक केले नसून भारतातील निवडणुकीमध्ये ईव्हीएम चे वापर आणि मतदान यावर त्यांची उपरोधिक टीका आहे. ईव्हीएम हॅकिंग नंतर आता मस्क यांनी अश्या याप्रकारे आपली प्रतिक्रिया दिल्याचे सामाजिक आणि राजकीय विश्लेषण आता भारतात होत आहे.

ईव्हीएम मतगणनेवर महाराष्ट्रात चर्चा सुरूच.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकीचे 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागताच राज्यात ने मतदान आणि मतगणना याच्यावर एकापेक्षा एक सोशल पोस्ट, मतगणना आणि मतमोजणी दरम्यान अनेक संशयास्पद घटना,या संबंधातील व्हिडिओ आणि ईव्हीएम मतमोजणीतून मतांचे ट्रान्सफर यावर अनेक तथ्य समोर आली आहे. यावर अख्या राज्यात आणि देशात चर्चा सुरू असतानाच अमेरिकन उद्योगपती मस्क यांनी भारतीय ईव्हीएमच्या अतिवेगवान मतमोजणीवर आश्चर्य व्यक्त केल्याने ईव्हीएम मतगणना यावर जोरदार वादविवाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विरोधी राजकीय पक्ष आणि जनतेमध्येही संभ्रम.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला भरपूर मते पडून सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या जागांपेक्षा खूप अधिक जागा महायुती मधील पक्षांना मिळाले आहे तर विरोधी पक्षाला मोठ्या प्रमाणात जागांचे नुकसान झाले आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन मधून मतमोजणीवर अख्या राज्यात त्यांचे व्यक्त केल्या जात असताना,सत्ताधारी पक्षासोबतच निवडणूक हाताळणारी यंत्रणा म्हणजेच निवडणूक आयोग आणि मतमोजणी करणारी यंत्रणा या संशयाच्या भोवऱ्यात  सापडली आहे.सत्तेविरोधी लाट असताना सुद्धा ईव्हीएममधून मतमोजणीत फक्त सत्ताधारी पक्षांना प्रचंड मते कशी पडली,यावर राज्यात प्रचंड असा आश्चर्य व्यक्त होत आहे.यात एलन मस्क यांचे वेगवान मतमोजणीवर नवीन आश्चर्यजनक विधानाने एका प्रकारे महाराष्ट्रातील मतमोजणीवरच नवीन आश्चर्य आणि चर्चेलाही सुरुवात केली आहे. अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रात लोकशाहीत प्रमुख असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतमोजणीची संथगती का असते आणि भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात नुकतेच लागलेल्या निवडणूक निकालात सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमचे  योगदान कसे मिळाले यावर आता मोठ्या प्रमाणात देशात चर्चा,,विरोधी सत्ताधरिमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.

काय होते मस्क यांचे पूर्वीचे आक्षेप.

यापूर्वी अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (‘एआय’)किंवा माणसांकडून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा स्पष्ट आक्षेप मस्क यांनी सहा महिन्यांपूर्वी घेतला होता.त्यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता.यानंतर आता मस्क यांनी भारतीय ईव्हीएम यंत्रांमधून फक्त एकाच दिवसात 64 कोटी मते कशी मोजली जात असेल यावर आपला आश्चर्य व्यक्त केला आहे.तर दुसरीकडे मस्कच नव्हे तर भारतातील विरोधी पक्ष आणि लाखो नागरिक ही गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मतदान आणि मतमोजणीवर अचंबित आहेत. गेल्या दहा वर्षांत देशात विविध निवडणुकांत ईव्हीएम यंत्रणेची अजब किमया वेळोवेळी दिसली.याला आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुक  निकालाने आश्चर्याचा नवा शिखर दिला आहे.

काय मोदी नव्हे ईव्हीएम है तो मुमकिन है ?

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांनी कोट्यावधी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे त्यामुळे देशात निवडणुकी पूर्वी आणि नंतर येणाऱ्या निकालांमध्ये मोदी है तो मुमकीन है असा नारा दिल्या जाते,आता हरियाणा महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर मोदी नव्हे ईव्हीएम है तो मुमकिन है असा एक ट्रेण्ड चर्चेत येताना दिसत आहे. सोबतच माध्यमे आणि सोशल माध्यमांवर महाराष्ट्रातील मतमोजणीनंतर होणारी चर्चा आणि व्हायरल होत असलेले मतमोजणीचे पोस्ट हे देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये चर्चेचा विषय आहे.कारण विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्याच्या सहकारी दोन पक्षांच्या पारड्यात प्रचंड असे मत’दान’ कसे झाले? विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 230 जागांचा एकट्या भाजपला कोणत्या आधारावर मिळाल्या,याचे विश्लेषण आणि उत्तरे मिळविण्यासाठी विरोधी राजकीय पक्ष आणि जनता सध्या संभ्रमात आहे.

गुजरात मधून ईव्हीएम मशीन आयात आणि त्याचे कनेक्शन ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा महाराष्ट्रात ईव्हीएम गुजरात आणि राजस्थान मधून आयात करण्यात आल्या होत्या त्यामुळे या दोन राज्यातूनच ईव्हीएम आयात का करण्यात आल्या.गुजरात आणि येथील कनेक्शन काय आहे,मतदान यंत्रे आणि त्यांच्या बॅटरी चार्जिंग याबाबत गूढही सध्या कायम आहे. महाराष्ट्रात निवडणूक निकालादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष झालेले मतदान आणि यानंतर ईव्हीएममधून बाहेर आलेल्या मतांची बेरीज यामध्ये तफावती मोठ्या प्रमाणात समोर आल्या. महाराष्ट्रात तब्बल 95 मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मधून निघालेल्या मतांचा आकडा सर्वांसाठी सध्या रहस्य बनलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.