PM Narendra Modi : कुणी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी ? अन् कोण आहे ती महिला?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्या साठी षडयंत्र रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आल्यानंतर संपूर्ण मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आली होती. बुधवारी रात्री ही माहिती फोन कॉल वरून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली, यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची हालचाली आणि माहिती काढून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.फोन करणारी ती व्यक्ती महिला असल्याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली आहे.
काय दिली होती माहिती?
बुधवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीकडून फोन करण्यात आला होता. यात थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना मारण्यासाठी कट सुरू असल्याची यासाठी शस्त्राची तयारी सुद्धा झाल्याची माहिती फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षात दिली होती. त्यामुळे लगेच मुंबई पोलिस सतर्क झाले होते.पोलिसांनी गंभीरतेने या घटनेची दखल घेत फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती आणि शोध सुरू केला. मुख्य म्हणजे पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव घेतले असल्याने आणि त्या कॉल वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची आणि त्यासाठी शस्त्राची तयारी करण्यात आली अशी धमकी दिली होती.बुधवारी रात्री 9 वाजे दरम्यान नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला.
या फोन कॉल ची मुंबई पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत फोन करणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची सुरुवात केली. या तपासादरम्यान मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणारी एक महिला असल्याचा दावा करण्यात आला.यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई नजिक आंबोली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या एका भागातून शितल चव्हाण नामक महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी तिच्या विरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेली शितल चव्हाण ही महिला मानसिक रोगी असल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली आहे.
देशाचे पंतप्रधानांना धमकी देणाऱ्या या फोन कॉल नंतर या संपूर्ण प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी स्टँडर्ड प्रोसिजरनुसार तपास सुरु केला आहे.यादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शितल चव्हाण या महिलेचे वय 34 वर्ष असून तिच्या संबंधात अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.उल्लेखनीय म्हणजे मागील आठवड्याचा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत पार पाडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना ही घटना आणि यात थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी देत पोलिसांना कॉल आल्याने मुंबई पोलिसांनी गंभीरतेने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.