Hanuman AI : भारतात येत्या मार्च मध्ये दाखल होईल हनुमान AI.
Hanuman AI : भारतात येत्या मार्च मध्ये दाखल होईल हनुमान AI.
आधुनिक जगाने डिजिटल युगातून आता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)) युगाकडे प्रवास सुरू केला आहे. ए आय मुळे जगात सर्व क्षेत्रात कामकाज आणि जीवनप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत सार्वजनिक जीवनापासून ते औद्योगिक क्षेत्रात आणि टेक्नॉलॉजी हब मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने शिरकाव केला आहे यामुळे मनुष्याचा काम कमी आणि ए आय टेक्नॉलॉजीचा वापर जास्त राहणार आहे. यामुळे विश्वात कामकाजात 70 टक्के मनुष्यबळाचा वापर कमी होणार आहे. जगातील अनेक देशाचा भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने डिजिटल माध्यमातून महत्त्वाची वाटचाल सुरू केली आहे आता भारतात रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी मध्ये नवी क्रांती घडविण्याचा निर्णय घेतला आहे येणाऱ्या मार्च 2024 मध्ये मुकेश अंबानी यांच्या सहकार्याने ए आय मॉडेल लॉन्च होईल याचा नाव हनुमान AI असे असेल.सर्व भारतीयांसाठी मुकेश अंबानी यांनी सदर AI प्रकल्प सुरू केला आहे.
कसा असेल हनुमान AI मॉडेल?
देशात सर्व भारतीयांसाठी हनुमान एआय. कार्य करणार आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील 8 टॉप मोस्ट IIT (आयआयटी),चे एक संघ तयार करण्यात आली आहे. या एकत्रित प्रयासातून भारतात “हनुमान” AI मॉडेल स्वरूपात मूळ ChatGPAT (चॅट जी पॅट) सेवा मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात येणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या या युगात भारतात हा महत्त्वाचा पाऊल असेल.जे भारतीय AI क्षेत्राला जगात एका नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण आयाम असेल जगाला आहे मॉडेल युगात नवी चालनाही देईल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील 8 आयआयटी समर्थित भारतजीपीटी (bharatgpt)समूहाने गेल्या मंगळवारी मुंबईतील तंत्रज्ञान परिषदेत या AI नवीन भाषेच्या मॉडेलची झलक दाखविण्यात आली.
असा असेल हनुमान एआय मॉडेल.
भारतातील या एआय मॉडेलचे नाव “हनुमान AI” असे ठेवण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात हे भारताकडून जगासाठी एक मोठे गेम-चेंजर ठरणार आहे. हा AI प्रकल्प यशस्वी झाला तर भारत या क्षेत्रात नवा शिखर गाठेल.
चार प्रमुख क्षेत्रात 11 स्थानिक भाषांमध्ये काम करणार.
भारतात ए आय टेक्नॉलॉजी मध्ये काम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत अंग्रेजी भाषेमध्ये काम करतो मेटा कंपनीकडून व्हाट्सअप मध्ये जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेनू आहे तो सुद्धा अंग्रेजी भाषेमध्ये सहाय्यक आहे. पण आता
देशात लाँच होणारा “हनुमान” AI हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नवा मॉडल लाँच होताच देशातील चार प्रमुख सेक्टरमध्ये स्थानिक भाषांमध्ये काम करेल.हे AIमॉडेल हेल्थ केअर, गव्हर्नन्स, आर्थिक सेवा आणि शिक्षण या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये देशातील 11 स्थानिक भाषांमध्ये काम करेल. आयआयटी मुंबईसह आयआयटीने हा मॉडेल विकसित करण्यासाठी अथक परिश्रम केले आहे.
आता पर्यंत हे भारतीय AI मॉडेल कार्यरत.
जगात आणि भारतात जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक डिजिटल क्षेत्रात काम करीत आहे, त्यात अनेक भारतीय मॉडेल आतापर्यंत कार्यरत आहेत. सोबतच देशात इतर स्टार्टअप्स आणि कंपन्या देखील भारतासाठी योग्य ओपन सोर्स एआय मॉडेल तयार करत आहेत. यामध्ये “सर्वम” आणि “आरती” या AI मॉडेल चा समावेश आहे,यांना विकसित करण्यासाठी देशात लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स आणि विनोद खोसला यांच्या निधीतून पाठबळ मिळाले आहे.
काय आहे हनुमान AI मॉडेलची वैशिष्ट्ये.
व्यावसायिक आणि सामाजिक वापरकर्त्यांसाठी (social platform handlers)वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी या “हनुमान” AI मॉडेलचे सुलभीकरण करण्यात आले आहे. याच्या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे हे नवीन AI मॉडेल स्पीच टू टेक्स्ट क्षमतांना पूर्ण सपोर्ट करेल. यासोबतच आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने वातावरण अनुकूल मॉडेल विकसित करण्याचीही घोषणा केली आहे.पण ही AI वायरलेस वाहक सेवा रिलायन्स जिओसाठी उपलब्ध असेल.