Narendra Modi in Pohradevi : पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार.

Narendra Modi in Pohradevi : पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ – बंजारा समाजाचे श्रद्धास्थान वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत आहेत.या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा महंत आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

स. 10 वा.पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे दाखल होणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. यावेळी बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल.विशेष म्हणजे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाच्या विरासत पाहण्यासाठी लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नाने पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे.

जागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय.

१६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असा हा नंगारा वास्तू संग्रहालय पाच मजली आहे. १३ विविध गॅलरी मधून बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. येथे फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे.नंगारावर भव्य अशी १६० फूट बाय ३० फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे.सोबतच १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.शनिवारी ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पणनंतर दुपारी २ वाजतापासून निमंत्रितांना हे संग्रहालय बघण्यासाठी प्रवेश खुले करण्यात देण्यात येईल.

फोटो – ०१ नंगारा म्युझियम
०२ पंतप्रधान यांच्या सभेची जय्यत तयारी
फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी

ना. संजय राठोड

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

four × 2 =