Indian Railway : रेल्वेच्या जनरल बोगी मध्ये प्रवास करता का? मग मिळणार ही खास सुविधा.
Indian Railway : रेल्वेच्या जनरल बोगी मध्ये प्रवास करता का? मग मिळणार ही खास सुविधा.
इंडियन रेल्वे मध्ये प्रवासासाठी जनरल कोच मधून प्रवास करताना आता सर्वांना खास सुविधा मिळणार आहे.रेल्वेच्या डब्यांमधून दररोज देशात लाखो प्रवासी प्रवास करतात.पण त्यांना जनरल कोचमध्ये रेल्वे प्रवास करताना गर्दीत कुचंबणा सहन करावी लागते.तसेच त्यांना जनरल बोगीत विशेष सुविधासुद्धा मिळत नाहीत.पण आता सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना उपाय मिळाला आहे. हा उपाय म्हणजे रेल प्रवाशांना आनंदाची वार्ता आहे.’
नेमकं काय केलं भारतीय रेल्वेने.
नुकतीच इंडियन रेल्वे कडून सर्वसामान्य रेल प्रवाशांसाठी खास निर्णय घेण्यात आला आहे.जनरल डब्यातून रेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळू शकेल.यापूर्वी भारतीय रेल्वे विभागाच्या रेल गाड्यांमध्ये जनरल कोच स्थिती बिकट असल्याने प्रवाशांना यात सुविधा मिळाव्या यावर विविध रेल प्रवासी आणि सामाजिक संघटना आवाज बुलंद करीत आले आहे. सर्वसामान्य प्रवासी लाखोंच्या संख्येने रेलवेमध्ये जनरल कोच मधून प्रवास करतात.ही संख्या आणि अशा बोग्यांमध्ये सुविधांवर होणारा खर्च पाहता रेल्वे विभाग आतापर्यंत मागेपुढे पाहत होता. आणि यात सुधारणा करणे रेल्वे समोर मोठे आव्हाने आहे.पण आता जनरल कोच मध्ये खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ट्रॉलीचा वापर करण्यात येणार आहे.या योजनेनुसार आता जनरल कोच मध्ये प्रवास करणारे प्रवाशांना रेल्वेच्या स्लीपर किंवा एअर कंडिशनर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसारखीच खाद्यसुविधा मिळणार आहे.
ह्या सुविधा ही गरजेच्या.
रेल्वेच्या सामान्य बोगीमध्ये साफसफाई ठेवणे,लांबच्या प्रवासादरम्यान यातील प्रवाशांना रेल गाडीत असलेल्या कॅन्टीन मधून ऑर्डर नुसार पौष्टिक आणि चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ पुरविणे, टॉयलेटची नेहमी सफाई सारख्या सुविधाही भविष्यात इंडियन रेल्वे पुरविणार आहे. रेल्वेच्या जनरल कोच मध्ये जनरल तिकीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथे कोणतीही खास सुविधा देण्यात येत नाहीत.याबाबत देशभरात लाखो तक्रारी आहेत चांगल्या सुविधा देण्याची मागणी दीर्घअवधीपासून केल्या जात आहे. त्यामुळे इंडियन रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी विविध योजना अमलात आनण्याचा निर्णय घेतला आहे.
ह्या असतात प्रवाशांना अडचणी.
भारतीय रेल्वेच्या जनरल कोच मध्ये प्रवास करताना रेल गाडीच्या सर्वात जवळ आणि सर्वात मागे जनरल होत असतात जेव्हा कोणत्या स्टेशन रेल गाडी थांबली का या कोचमधील प्रवाशांना स्टेशनवर काही वस्तू किंवा पिण्याचे पाणी घेण्यासाठी दोन ते पाच मिनिटाच्या अवधीत खूप कसरत करावी लागते. स्टेशनवर गाडी थांबताच जनरल बोगीमधील प्रवाशांना अगदी कमी मिनिटात वस्तू,पाणी घेऊन लगेच आपल्या डब्याकडे धाव घ्यावी लागते, त्यामुळे अनेकदा अपघात घडतात आणि प्रवाशांचे जीव जातात.अशा परिस्थितीत जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जर प्रवासी स्टेशनवर जेवण किंवा काही वस्तू घेण्यासाठी उतरला तर त्याला मोठा धोका आहे.हे इंडीयन रेल्वेच्या आता लक्षात आले आहे.त्यामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल कोच मध्ये खाद्यपदार्थांच्या ट्रॉलीची व्यवस्था करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.