Bank Holidays in October 2024 : “अबब ऑक्टोबर महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या*
Bank Holidays in October 2024 : “अबब ऑक्टोबर महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या*
राष्ट्रीयकृत बँके मधील कर्मचारी अधिकारी वर्गाची ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांमुळे बल्ले बल्ले होणार आहे. ऑक्टोबर 2024 या महिन्यात नवरात्र, दसरा, सुरुवातीला गांधी जयंती आणि महिन्याचे शेवटी दिवाळीच्या सुट्ट्या असतील तर ऑक्टोबर महिन्यातील रविवारी शनिवारी हॉलिडे यामुळेही बँकां बंद राहतील.त्यामुळे या महिन्यात बँकांना खूप सुट्ट्या मिळणार आहे. पुढच्या महिन्यात बँकांची सुट्टी पाहता सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्ग आणि सर्वच प्रकारच्या वित्तीय संस्थांना वेळोवेळी बँकेची सुट्टी पाहूनच आर्थिक व्यवहार करावा लागेल.
बँकांना ऑक्टोबर महिन्यात एकूण इतक्या सुट्ट्या.
आता सप्टेंबर 2024 हा महिना संपण्याच्या मार्गावर आहे पुढच्या महिन्यात शासकीय आणि सण, त्योहाराच्या सुट्ट्या राहणार आहेत. नवरात्र ते दिवाळीपर्यंत बँकांना वेळोवेळी सुट्टी असल्याने नागरिकांना सुट्टीची तारीख पाहूनच आपला व्यवहार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच बँकेतून करावा लागेल.
विशेष म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून एका वर्षात किती बँक हॉलिडे राहणार आहेत ते कॅलेंडरनुसार जाहीर जाहीर करण्यात येते. सोबतच आरबीआय बँकिंग कामकाज आणि येथे आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक महिना होण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादीसुद्धा जाहीर करीत असते.आरबीआयच्या माहितीनुसार येणाऱ्या ऑक्टोबर 2024मध्ये बँकांना 31 दिवसांपैकी 15 दिवस सुट्ट्या राहणार आहेत.यात शनिवार आणि रविवारच्या बँक हॉलिडे व्यतिरिक्त विविध सणांच्या सुट्ट्यांचा सुद्धा समावेश आहे.जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळे ऑक्टोबरमध्ये बँक एक दिवस बंद राहणार आहे. त्याचबरोबर गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, काटीबिहू आणि दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या दिवशी बँकां बंद असतील.
ऑक्टोबर महिन्यात या दिवशी राहणार बँका बंद.
1 ऑक्टोबर 2024- विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद राहतील.2 ऑक्टोबर 2024- गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.3 ऑक्टोबर 2024- जयपूरमध्ये नवरात्रीच्या स्थापनेची बँकांना सुट्टी असेल.तर 6 ऑक्टोबर 2024- रविवारी सुट्टी असेल.यानंतर 10 ऑक्टोबर 2024- अगरतला, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद राहतील.11 ऑक्टोबर 2024- अगरतला, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची येथील बँकांना दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमी मुळे शिलाँगला सुट्टी असेल.12 ऑक्टोबर 2024- दसरा, विजयादशमी, दुर्गापूजेमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.13 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.14 ऑक्टोबर 2024- गंगटोकमध्ये दुर्गा पूजा किंवा इतर सणामुळे बँकांना सुट्टी असेल.16 ऑक्टोबर 2024- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अगरतला आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.
17 ऑक्टोबर 2024- महर्षि वाल्मिकी आणि कांति बिहू निमित्त बेंगळुरू आणि गुवाहाटी येथील बँकांना सुट्टी असेल.20 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.26 ऑक्टोबर 2024- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.27 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
31 ऑक्टोबर 2024 नंतर दिवाळीमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.