Corona New Variant 2024 : सावधान! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट ? जाणून घ्या, काय आहेत लक्षणे ?
Corona New Variant 2024 : सावधान! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
चार वर्षांपूर्वी अख्या जगात थैमान घालून हाहाकार माजविणाऱ्या कोरोना चा नवा व्हेरिएंट अख्या जगात अतिशय वेगात पसरतोय. येणाऱ्या काळात हा नवा व्हेरीएंट जगाचा मोठा भाग संसर्गजन्य करू शकतो.
मागील कोरोना व्हेरियंट पेक्षा अधिक प्रभावी होऊ शकतो अशी शक्यता नुकतेच वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. कोविड 19, नंतर कोरोना संसर्गाचा हा नवा प्रकार जगातील जर्मनी या देशांमध्ये मागील जून महिन्यात वैज्ञानिकांच्या विश्लेषणादरम्यान सापडला आहे.हा व्हेरियंट मिळाल्यानंतर युके डेन्मार्क आणि अमेरिका या देशात एक्सइसी व्हेरिएंट केसेस वाढले आहेत.
कोरोनाच्या या नव्या विषाणूमध्ये मागील काही अवधीत म्यूटेशन्स परिवर्तन झाल्याने सप्टेंबर 2024 आणि पुढच्या ऑक्टोबर महिन्यात जगात या व्हेरिएंट पसरण्याचा धोका आहे मात्र कोरोना नंतर जगात तयार झालेल्या वरून लसीमुळे आतापर्यंत याचे गंभीर केसेस कमी आहे. असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
काय नाव आहे या नवीन व्हेरीएंटचा.
कोरोनाचा हा नवीन प्रकाराला एक्सईसी हा नाव देण्यात आला आहे.ज्या ठिकाणी असे केसेस मिळत आहेत आणि तेथे जे नागरिक कोविड मुळे गंभीर आजारी आहेत त्यांना राष्ट्रीय आरोग्य सेवा तर्फे एक्स ई सी पासून बचावासाठी त्या देशांमध्ये निशुल्क कोरोना बूस्टर शॉट देण्यात येत आहे.जगात कोरोनाचा नवीन प्रकार आणि याच्या म्यूटेशन मध्ये परिवर्तन पाहता वैश्विक आरोग्य संघटना ही अलर्ट मोडवर आहे सोबतच या व्हेरिएंटवर लसीकरण प्रभावी ठरू शकेल अशी प्रणाली अपडेट करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि डॉक्टरांचे निष्कर्षानुसार जर्मनीतून पुढील देशात पसरत असलेला हा एक्स इ सी व्हेरिएंट आधीच्या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांतून निर्माण झाला आहे.
काय म्हणताहेत कोरोणा विश्लेषक आणि वैज्ञानिक.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. फ्रान्सिस बॉलॉक्स यांच्या मते ( “XEC) संसर्ग आधीच्या कोविड-19 व्हेरिएंटच्या तुलनेत सहज आणि वेगाने पसरत असला तरीही कोविड लसीकरणातून याच्यापासून संरक्षण मिळू शकते.हा व्हेरिएंट येणाऱ्या हिवाळ्यात खूप प्रभावशाली ठरेल.तर
कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक एरिक टोपोल याबाबत म्हणाले की, ‘XEC ची जगात जर्मनीत फक्त सुरुवात आहे.या व्हेरिएंटचं लाटेत रूपांतर होण्यासाठी अनेक आठवडे किंवा आणखी काही महिनेही लागू शकतील.सध्या“XEC वेगाने पसरत आहे,पण याच्या तुलनेत किंबहुना यानंतर वाढणारा यापुढचा नवा व्हेरिएंट सुद्धा असू शकतो. आणि त्याची तीव्रता वाढण्यासाठी काही महिने लागतील.UKSHA च्या उपसंचालक डॉ. गायत्री अमिर्थलिंगम यांच्या मते “वेळेनुसार या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल होते.UKSHA या संस्थेद्वारे कोव्हिडच्या नवीन व्हेरिएंटबद्दल यूके आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व माहिती घेवून ही लवकरच प्रकाशित केली जाईल. “लसीकरणामुळे कोव्हिड 19 पासून उत्तम संरक्षण मिळाले आहे.त्यामुळेज्यांना NHS (नॅशनल हेल्थ सर्विस) ने संपर्क केला त्यांनी ही लस घ्यावी असं डॉक्टर गायत्री अमिर्थलिंगम यांनी आवाहन केले आहे.
काय आहेत लक्षणे.
या नव्या व्हेरीएंट मुळे होणारे करुणा संसर्गाचे लक्षणंसुद्धा सर्दी, आणि फ्लू म्हणजे आधीच्या कोरोनासारखीच आहेत. या नव्या प्रकारात ताप,शरीर वेदना,थकवा,खोकला किंवा घसा दुखणं राहते.बहुतांश लोकांना काही आठवड्याच्या आतच यातून बरं वाटतं तर काही लोकांना बरं होण्यासाठी काही अधिक दिवसांची वेळ लागू शकते.दरम्यान आता डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये हा XEC चांगलाच पसरला आहे, अशी माहिती कोव्हिडसंदर्भात अपडेट माहिती ठेवून याचे विश्लेषन करणारे वैज्ञानिक माईक हनी यांनी आपल्या एक्स हॅण्डल वरून दिली आहे.विशेष म्हणजे जगात आणि भारतात कोरोनाच्या नियमित चाचण्या खूप कमी झाले आहेत,त्यामुळे सध्या कोविड-19 चा प्रभाव किती आहे याचा अनुमान लागणे कठीण आहे. सोबतच हा नवीन म्यूटेशन वेगाने जरी पसरत असला तरी घाबरण्याचे कारण नाही.युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या मते या व्हायरसचं म्युटेशन होणं आणि त्यात बदल होणं अगदीच सामान्य आणि नियमित बाब झाली आहे.सध्या ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे अशा लोकांना मोफत बूस्टर डोस दिल्या जात आहेत त्यात 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक,वृद्धाश्रमात राहणारे व्यक्ती, क्लिनिकल रिस्क गटात सहा महिन्यांपासून आहे असे लोक,एनएचएसचे फ्रंट लाईन, केअर होम आणि सोशल केअर वर्कर्स यांचा समावेश आहे.