PM Modi in Wardha : विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्याऐवजी महाविकास आघाडी अन् काँग्रेसने त्यांना खाईत लोटले पहा पीएम मोदी नेमकं काय बोलले?

PM Modi in Wardha : विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्याऐवजी महाविकास आघाडी अन् काँग्रेसने त्यांना खाईत लोटले पहा पीएम मोदी नेमकं काय बोलले?

PM Modi in Wardha : विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्याऐवजी महाविकास आघाडी अन् काँग्रेसने त्यांना खाईत लोटले
पहा पीएम मोदी नेमकं काय बोलले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आणि टेक्स्टाईल उद्योगाबाबत वर्धा येथे बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी  महाविकास आघाडी आणि काँग्रेसने शेतकऱ्यांची ताकद वाढविण्याऐवजी येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खाईत लोटल्याचा आरोप सुद्धा केला आहे.
शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी विदर्भातील वर्धा येथे विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना महाविकास आघाडी आणि काँग्रेसवरही हल्लाबोल केला. सोबतच सध्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार कापूस उत्पादकांसाठी काय करत आहे यावरही भाष्य केले.विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.

वर्धा येथे काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी.

वर्धा येथे शुक्रवारी विश्वकर्मा योजनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,आमच्या सरकारचा लक्ष्य आहे की विश्वकर्माच्या लाभार्थ्यांनी मोठ्या उद्योग समूहाशी निगडीत व्हावे.यामुळे आर्थिक प्रगतीत मागासलेला हा वर्ग जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल.यासाठी सरकारची स्किल मिशन या वर्गाला सशक्त बनविण्याचे कार्य करीत आहे. केंद्रात आमच्या सरकार आल्यानंतर हे स्किल मिनिस्ट्री सुरू करण्यात आली आणि या माध्यमातून आता कौशल्य विकास अभियानाने भारताच्या कौशल्याला जगात ओळख निर्माण केली आहे. याच वर्षी फ्रान्समध्ये आयोजित वर्ल्ड स्कील कौन्सिलमध्ये विश्वकर्मा कारागिरांना पाठवलं होतं. यात भारताने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. ऑलिम्पिकची चर्चा आपण करतो. पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे असेही पीएम मोदी म्हणाले.

काय म्हणाले महाविकास आघाडी आणि काँग्रेस बाबत पीएम मोदी.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला महात्मा गांधी यांच्या कर्मभूमी असलेल्या वर्धा या भूमीतून बोलताना पीएम मोदी यांनी म्हटले की आजची काँग्रेस ती नव्हे ज्याच्यासोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी जुळले होते. आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीची आत्माने दम तोडले आहे.कापूस उत्पादकांना महाराष्ट्रात मोठी संधी आहे पण यापूर्वी महाराष्ट्रात असलेल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी शासनाने कापूस उत्पादकांची ताकद वाढविण्यास ऐवजी शेतकऱ्यांना त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे नावावर फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे.मात्र जेव्हा पासून महाराष्ट्रात भाजपची आणि महायुतीची सरकार आली, त्याने शेतकऱ्यांच्या समस्यांचा समाधान केलं. जेव्हा महाराष्ट्रात फडणवीस यांची सरकार होती यादरम्यान मराठवाडा क्षेत्रात टेक्स्टाईल क्षेत्राला गती मिळाली.नांदेडमध्ये टेक्सटाईल पार्क बनला,यापूर्वी येथे कोणतेच उद्योग येत नव्हते मात्र आता हा क्षेत्र महाराष्ट्रात एक मोठा औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.

देशभरात 7 पंतप्रधान मित्र पार्क स्थापित करणार.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की आमच्या सरकारने देशभरात 7 पंतप्रधान मित्र पार्क बनविण्याची योजना आखली आहे.यातून विदर्भात कापसावर आधारित टेक्सटाईल उद्योगांनाही चालना मिळेल.व्हिजन फार्म टू फायबर, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन असा आमच्या यामागे  विजन आहे. याचा विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळेल. येथील कापूस चांगल्या दर्जाचे असल्याने त्यापासून हाय क्वालिटी कापड आणि जगातील फॅशन नुसार कापड येथे तयार करू,या नंतर हे कापड प्रदेशात पाठवू.पीएम मित्र पार्क मुळे टेक्स्टाईल क्षेत्रात  तब्बल दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे यातून एक लाखापेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण होतील तसेच यासोबत जुळलेल्या इतर उद्योगांनाही चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six − four =