Petrol Diesel Prices : कच्च्या इंधन तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर, आता Petrol व Diesel च्या किमती कमी होणार ?

Petrol Diesel Prices : कच्च्या इंधन तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर, आता Petrol व Diesel च्या किमती कमी होणार ?

Petrol Diesel Prices : कच्च्या इंधन तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर, आता Petrol व Diesel च्या किमती कमी होणार ?

भारत सरकारने विदेशातून तसेच देशात कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लावण्यात येणारा विंडफॉल टॅक्स आपल्या प्रयत्नातून शून्यावर आणला आहे. हा टॅक्स कमी झाल्याने केंद्र शासनाने 18 सप्टेंबर पासून या टॅक्स संबंधात निर्णय लागू केला आहे.त्यामुळे आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होईल अशी अपेक्षा बळावली आहे.पण केंद्र सरकारच्या या निर्णयाने पेट्रोलियम कंपन्यांना होणार आहे.विशेष म्हणजे देशात पेट्रोलियम इंधन दर आवाक्यात ठेवण्यासाठी वर्ष 2022 मध्ये जुलै महिन्यात केंद्र शासनाने हा टॅक्स लागू केला होता.

विंड फॉल टॅक्स कमी होण्याचा सामान्य ग्राहकांना फायदा नाही.

केंद्र सरकारने सदर कर कमी केल्याने देशात पेट्रोल पदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याच्या फायदा मिळणार नाही तर दुसरीकडे देशातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रतिष्ठान कच्च्या तेलावर 850 रुपयांचा फायदा पोहोचणार आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये चढ-उतार पाहता आणि कंपन्यांना मिळणाररा फायदा लक्षात घेऊन सरकारने विंड फोल टॅक्स यापूर्वी लागू केला होता. केंद्र सरकार कडून महिन्यातून एका पंधरवड्यात पेट्रोलियम कंपन्यांना होणाऱ्या फायद्याचा अवलोकन केल्या जात होता.. दरम्यान फरवरी 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली,यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना खूप फायदा होत असताना कंपन्यांवर टॅक्स लावला होता.

एटीएफ निर्यातीवर विशेष उत्पादन शुल्क शून्यावर पोहोचला.

देशात खपणाऱ्या डिझेल, पेट्रोल तसेच विमान इंधन (ATF) याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने जो अतिरिक्त उत्पादन शुल्क लावला होता या निर्णयामुळे आता शून्यावर पोहोचला आहे. सोबतच जेट इंधन डीजल पेट्रोल किंवा एटीएम च्या इंधन निर्यात वरील लागणारा एसएइडी टॅक्स सुद्धा शून्य कायम राहणार आहे.सरकारच्या निर्णयानंतर विंड फोर टॅक्स चे नवीन दर 18 सप्टेंबर पासून देशात लागू करण्यात आले आहे यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे.

पेट्रोलियम कंपन्या यापुढे अचानक फायदा घेऊ शकणार नाही.

केंद्र शासनाच्या 2022 जुलै महिन्यात घेतलेल्या निर्णयामुळे देशात विंडफॉल टॅक्स 96 हजार पर्यंत गेला होता यादरम्यान केंद्र सरकार दर पंधरा दिवसांनी या टॅक्स मध्ये बदल करीत होती. गेल्या मे महिन्यात विंड फॉर टॅक्स 96 हजार रुपये प्रति टन करण्यात. यानंतर केंद्र सरकारने मागील 16 मे रोजी या टॅक्स संदर्भात संशोधन केल्याने हा टॅक्स 57 हजार रुपये प्रति टन वर आला होता.आता हाच टॅक्स शून्यावर पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता घसरल्या आहेत.त्यामुळे कोणतीही पेट्रोलियम कंपनी आता अचानकपणे कोणताही फायदा कमवू शकणार नाही,सोबतच या निर्णयाने देशातील इंधनाचे दरसुद्धा वाढणार नाही,असा दावा केंद्र सरकारने या निर्णयातून केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 6 =