Nagpur Solar Panel Project : नागपुरात येणारा 18 हजार कोटींचा कोणता प्रकल्प गेला आता गुजरातला?

Nagpur Solar Panel Project : नागपुरात येणारा 18 हजार कोटींचा कोणता प्रकल्प गेला आता गुजरातला?

Nagpur Solar Panel Project : नागपुरात येणारा 18 हजार कोटींचा कोणता प्रकल्प गेला आता गुजरातला?

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर. आणि विदर्भासाठी वाईट माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रात नागपूर येथे येणारा हजारो कोटीं गुंतवणुकीचा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला डायव्हर्ट कसा झाला आहे. यावर विरोधी राजकीय पक्षांची भूमिका उग्र होते की काय अन् विदर्भातील स्थानिक बेरोजगार युवकांवर हा अन्याय नाही का असे या निमित्ताने प्रश्न समोर आले आहे.

अठरा हजार कोटीची गुंतवणूक असलेला होता प्रकल्प.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथे मिहानमध्ये ,येणारा अन विदर्भ तसेच  महाराष्ट्रासाठी फायदेशीर असलेला 18 हजार कोटींचा गुंतवणूकीचा सोलर प्रकल्प येणार होता. मात्र महाराष्ट्रातून गुजरात कडे हा प्रकल्प जाण्यापासून रोखण्यासाठी सरकार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.उपराजधानी नागपूर येथे इंडस्ट्रियल हब म्हणून मिहान अख्या जगात प्रसिद्ध होत आहे त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक असलेला ग्रीन रीन्यूएबल एनर्जी कंपनीचा हा सोलर प्रकल्प मिहान मध्ये स्थापित होणार होता.पण हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातील सरकारात असलेल्या राजकीय नेत्यांमुळे आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न न केल्याने गुजरातला गेला आहे. हजारो कोटीं गुंतवणुकीचा हा प्रकल्प मिहान मधील अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात 300 एकर जागेवर उभारण्यात येणार होता. यातुन स्थानिक स्तरावर 3000 बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा अशी या कंपनीने योजना आखली होती पण गुजरातकडे दिल्याने स्थानिकांना मिळणारी रोजगाराची संधी हिरावली आहे.

औद्योगिक वीजदर मोठा अडथळा.

विशेष उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात उद्योगांसाठी अधिक वीजदर असे मोठे प्रकल्प प्रांतात जाण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसत आहे.महाराष्ट्रात उद्योगांकडून वीज विभागाचे विज दर अधिक आकारले जात आहे.त्या तुलनेत वीज दर कमी आहेत,त्यामुळे अनेक प्रकल्प गुजरात आणि इतर राज्य ज्या ठिकाणी वीज दर कमी आहे तेथे जात आहे. यापूर्वी अनेक प्रकार गुजरातकडे गेल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या विज दराबाबत आवश्यक निर्णय घेतला नाही.हे सुद्धा एक कारण असल्याची या निमित्ताने माहिती समोर आली आहे.

वेदांता फॉक्सकॉन टाटा एअर बस नंतर ग्रीन एनर्जी सोलर गेला गुजरातकडे.

विशेष म्हणजे यापूर्वी अनेक प्रकल्प गुजरातकडे गेले किंवा स्थानिक समस्यामुळे डायव्हर्ट झाले आहे.महाराष्ट्र हा देशाला खूप महसूल  मिळवून देणारा राज्य आहे,मुंबईमुळे राज्याला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.त्यामुळे जगातील अनेक गुंतवणूकदार मोठ्या प्रकल्प स्थापित करण्यासाठी महाराष्ट्राकडे पाहतात.मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरचे  वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना गुजरात कडे वळविण्यात आले. यानंतर आता हा सोलर एनर्जी प्रकल्प सुद्धा तिकडे गेला आहे.

मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा जबाबदार- शिवसेना युबीटी.

अनेक प्रकल्प येथे येऊनही नंतर गुजरातकडे जात असताना राज्यात विरोधी राजकीय पक्षांनी महायुती आणि एकनाथ शिंदे सरकार विरुद्ध आपला आवाज बुलंद केला .पण येणारे प्रकल्प इतर राज्यात जाणे बंद होत नाही.आता नागपूर मधील मध्ये येणारा एनर्जी प्रकल्प गुजरातला गेल्याने या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये उत्तर-प्रतिउत्तर पाहायला मिळू शकतात. दरम्यान शिवसेना यूबीटी पक्षाने सदर प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावर, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =