Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो तिसरा हप्ता घेण्यासाठी हे काम करा अन्यथा 4500 रूपये विसरून जा?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो तिसरा हप्ता घेण्यासाठी हे काम करा अन्यथा 4500 रूपये विसरून जा?
महायुती सरकारने महाराष्ट्रात लागू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये हप्ते देण्याची सुरुवात आगास महिन्यात करण्यात आली होती.पण ज्या लाडकी बहिनींनी योजनेसाठी अर्ज केला अन् तो मंजूर झाला तरी त्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम किंवा एकाच वेळी 4500 रुपये सहजासहजी येणार नाही.त्याच्यासाठी महिलांना काय करावे लागेल हे नियम सरकारने बनवून दिले आहे. हे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे असल्याने लवकरात महिलांना सुचविलेले काम करावे लागेल.
17 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमा होणार तिसरा हप्ता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारद्वारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तिसरा हप्ता 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमा करण्यात येणार आहे. पण हे पैसे खात्यात येण्यासाठी लाडक्या बहिणींना काही गोष्टींची दक्षता घेणे सरकारने आवश्यक केले आहे. हे केले नाही तर खात्यातून पैसे कमवावे लागेल.
मग आता काय करायचं.
या योजनेत तिसरा हप्ता घेण्यासाठी महिलांना आता काय दप्तरी कारवाई करावी लागेल ते पाहूया. ज्या लाडकी बहिणीने या योजनेत आज केला आहे आणि तो मंजूर सुद्धा झाले आहे पण फक्त फॉर्म भरून खात्यात पैसे येणार नाही कारण फॉर्म भरणे सोबतच बहिनींना काही गोष्टी कराव्या लागतील ज्यांना सरकारने महत्त्वपूर्ण म्हटले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळी अर्ज केला होता तेव्हा आधार कार्डशी जुळलेली माहिती अर्जात भरण्यात आली होती सोबतच संबंधित महिलांचा बँक खात्याचा तपशील सुद्धा जोडला होता आता यासाठी अतिरिक्त काही गोष्टी करावे लागतील. त्या म्हणजे आधार कार्ड ची मोबाईल नंबर जुळलेला आहे किंवा नाही, आधार कार्ड बँक खाते जुळलेले आहेत किंवा नाही याची माहिती घेणे गरजेचे असेल.
जर या योजनेच्या अर्जात भरलेला अकाउंट नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर अशा महिन्यांच्या खात्यात पैसे येणार नाही. यासाठी सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना सल्ला दिला आहे की जर तुमचा बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर आधी बँकेत जाऊन खात्याला आधारशी जोडून घ्या. यासाठी बँका दोन ते तीन दिवस घेणार पण ते अकाउंट आधार सोबत लिंक करणारच याची खात्री असते.सोबतच जर तुमचा जुना बँक अकाउंट आधारशी जुळलेला असेल तर ते देखील बँक लिंक काढून टाकणार अन महिलांना त्या बँक अकाउंट ऐवजी नवीन बँक अकाउंटसोबत आपला मोबाईल नंबर जोडता येईल. ह्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे.
बँक खात्यासोबत लवकर लिंक होते मोबाईल नंबर.
विशेष म्हणजे बँकेत जाऊन लाडक्या बहिणींना आपला बँक अकाउंट स्वतःच्या मोबाईल नंबरसोबत लवकर आधार कार्ड सोबत लिंक करता येतो. किंवा यासाठी कोणत्याही आधार सेंटरवर जावून सुद्धा मोबाईलनंबर आधार कार्ड सोबत लिंक करता येते,फक्त यासाठी येथे दोन दिवसाचा वेळ लागेल. हे दोन कामे झाली तर लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होईल.
अंगणवाडी सेविकाही करतात अर्ज मंजूर.
विशेष म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता आज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे वहिनींना आता 30 सप्टेंबर पर्यंत सदर योजनेचा अर्ज करता येईल मात्र एक सप्टेंबर नंतर लाडके बहीण योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी अर्ज करेल त्यांना पुढील महिन्यापासून हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.अशी माहिती कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. सोबतच नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत करण्यात येईल. आता अंगणवाडी सेविकाकडून आधी त्या अर्जाला मंजुरी घ्यावी लागेल. नंतर प्रशासकीय आणि शासकीय मंजुरीची पुढील प्रक्रिया होईल.