16 Sept रोजी ईद ए मिलादची शासकीय सुट्टी रद्द, शासनाचा निर्णय,जाणून घ्या कारण.
ईद ए मिलाद : येत्या सोमवारी 16 सप्टेंबरला 12 रबी उल अव्वल ला ईद मिलादुन्नबी साजरी होणार आहे. इस्लामिक कॅलेंडर नुसार 12 रबिऊल अव्वल रोजी ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात येते.दरवर्षी या दिवशी शासनाकडून सार्वजनिक सुट्टी असते.यंदा शासकीय परिपत्रक काढून ईद मिलादुन्नबी निमित्त 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.12 रबी उल् अव्वल ईद मिलादुन्नबी येत्या सोमवारी राहणार आहे.अंग्रेजी कॅलेंडर प्रमाणे या दिवशी 16 सप्टेंबर ची तिथी आहे.त्यामुळे ईद मिलादुन्नबी एक दिवसआधी साजरी केली जाईल तर यानिमित्ताने मिळणारी सार्वजनिक सुट्टी यंदा एक दिवसानंतर म्हणजे 18 सप्टेंबरला घोषित करण्यात आली आहे.सोमवारी 16 सप्टेंबरला ईद मिलादुन्नबी आणि मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार आहे.सरकारने यंदा 16 सप्टेंबर रोजी येणाऱ्या शासकीय सुट्टीत बदल करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
सोमवारी शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय.
सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद मिलाद 12 रबी उल अव्वल रोजी साजरी होणार आहे. यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी 17 तारखेला आहे.दोन्ही सणमध्ये एक दिवसाचा फरक आहे.यानिमित्ताने दोन्ही समाजाकडून जुलूस आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येते.यादरम्यान समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने 16 सप्टेंबरच्या सार्वजनिक सुट्टीत शासनाने बदल करीत याविषयी शासकीय परिपत्रक काढले आहे.
16 रोजी ईद मिलाद, 17 ला अनंत चतुर्दशी.
इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद-मिलाद-उन-नबी हा दिवस पैंगबर हजरत मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी-उल-अवल महिन्याच्या 12 तारखेला ईद ए मिलादुन्नबी हा उत्सव आहे.इस्लाममध्ये हा महिना आणि 12 रबीऊल अव्वल अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.या दिवशी मुस्लीम बांधवाकडून जुलूस कार्यक्रमाचे आयोजन होते.मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.या हिंदू बांधव दिवशी लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.या दिवशी विसर्जन मिरवणुका निघतात. दोन्ही त्योहार पाहता सामाजिक सलोखा कामय राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत शासनाने यंदा बदल केला आहे.