BJP Maharashtra Elections Strategy : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा एक्शन प्लान तयार.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडीना वेग आला असून भाजपने या निवडणुकीसाठी आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना घेऊन मोठे एक्शन प्लान आखले आहे.या निवडणुकीत महायुती सोबत राहून निवडणूक लढाईची किंवा आधी एकटे लढून नंतर महायुतीमधील इतर घटक पक्षांना पुन्हा सोबत घ्यायचा,याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.यातूनच मग येणारी निवडणुक भाजप एकटी लढू शकते का? याबाबत विचार मंथन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले होते.नंतर त्यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात भाजप नेत्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष निवडणुकांसाठी विविध प्लॅन आणि समीकरण तयार करीत आहेत.यात महायुतीचा मोठा घटक पक्ष असलेल्या भाजप कडून जो निवडणूक ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे त्यात महायुतीच्या इतर पक्षांसाठी जागा तसेच निवडणूक व्यवस्थापनासाठी काय प्लान आहे यावर महायुतीकडून संयुक्तपणे कोणतेही विधान करण्यात आले नाही.
भाजपची की निवडणूक व्यवस्थापन समिती महायुतीसाठी?
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात येणाऱ्या निवडणुकीसाठी कशी तयारी आहे,तसेच निवडणुकीसाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता पूर्वतयारी आणि राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता निर्माण व्हावी यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. अशी माहिती ही या पत्र परिषदेत देण्यात आली,मात्र यासाठी भाजप नेत्यांकडून जी समिती नेमण्यात आली आहे.त्यात भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.ही समिती भाजपच्या बूथ यंत्रणांचा व्यवस्थापन करेल की,महायुतीसाठी? यावर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती राजकीय सूत्र देत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी एकट्या भाजपकडून हा मोठा ॲक्शन प्लॅन असल्याची चर्चा आहे.
भाजपनेते समिती अध्यक्ष.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप द्वारे निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन आली आहे,याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे अध्यक्ष राहणार आहे.दानवे यांच्यानुसार बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश,जिल्हा,तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.या समिती मध्ये भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ. श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच विविध समित्यांचे प्रमुख म्हणून जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,विशेष संपर्क- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,सामाजिक संपर्क- राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क- राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,युवा संपर्क- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे,प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,सहकार क्षेत्र संपर्क- विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर,मीडिया- आ. अतुल भातखळकर,ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,अनुसूचित जाती संपर्क- माजी आमदार भाई गिरकर,अनुसूचित जमाती संपर्क- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित,सोशल मीडिया- आ. निरंजन डावखरे,निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या,महायुती निवडणूक अभियान समन्वयक- ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन या समितीमध्ये आहेत.तर विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.
महायुतीमध्ये जागा वाटपावर जोर नाही.
महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत हवी तशी चर्चा होत नाहीये तर दुसरीकडे भाजप यावर बोलणे टाळताना दिसत आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,मुख्यमंत्री असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्याकडून आपल्या पक्षाकडून प्रचार करीत या योजनेसाठी श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.आता या निवडणुक व्यवस्थापन समितीमध्ये महायुतीच्या इतर घटक पक्ष नेत्यांना घेण्यात आले नसल्याने भाजप ही निवडणूक एकटी लढणार किंवा महायुतीमध्ये लढणार यावर संभ्रम दिसत आहे.