Monkey Pox Virus काय आहे? भारतात पाय पसरविणार का? काय असते लक्षणे.
Monkey Pox Virus काय आहे? भारतात पाय पसरविणार का? काय असते लक्षणे.
कोरोना महामारी नंतर जीवघेण्या मंकी पॉक्स अर्थातच माकड तापाने आफ्रिकन खंडात कहर माजविला आहे.आता भारतातही मंकी पॉक्स ने पाय पसरविणे सुरू केले आहे का?अशी भीती निर्माण झाली आहे.यातच जगभरात मंकीपॉक्सचे वाढले प्रमाण पाहता केंद्र सरकार आता सतर्क आहे.जानेवारी 2022 पासून ते आजतागायत भारतात मंकीपॉक्सची लागण झालेल्या 30 रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये नुकते एक प्रकरण समोर आले आहे.ही परिस्थितीत पाहता सरकारने या पासून बचावासाठी दक्षता वाढवली आहे.
प्रसाराचा धोखा कमी.
विशेष म्हणजे या आजाराचा भारतात प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.पण विश्व आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्सला जागतिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारत सरकार खबरदारी घेण्याच्या तयारीत आहे.
उष्णकटीबंध वातावरणात आढळतो विषाणू.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या आफ्रिका खंडातल्या उष्णकटीबंध देशांच्या जंगलात असलेल्या दुर्गम गावांत हा विषाणू सर्रास आढळतो.याची विश्व आरोग्य संघटनेने पृष्टी केली आहे.या भागांमध्ये या विषाणू संसर्गाच्या हजारो केसेस आढळतात.त्यामुळे दरवर्षी मंकी पॉक्समुळे शेकडो मृत्यूही होतात.15 वर्षांखालच्या मुलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.1970 मध्ये आफ्रिका खंडात पहिल्यांदा मंकीपॉक्स आढळला होता. आफ्रिकेबाहेर पहिल्यांदाच मंकीपॉक्स पसरला 2003मध्ये. अमेरिकेत तेव्हा याचे रुग्ण आढळले होते.2024 च्या सुरुवातीपासून जुलै 2024 अखेरपर्यंत Mpox चे 14,500 पेक्षा अधिक संसर्गग्रस्त रुग्ण आढळले असून 450 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असल्याचं आफ्रिका CDC ने म्हटलंय.2023 वर्षाच्या याच कालावधीशी तुलना केल्यास रुग्णसंख्या 160% जास्त आहे तर मृत्यूंची संख्या 19% नी वाढलेली आहे.
मंकीपॉक्स विषाणूजन्य “झुनोटिक”, रोग,अशी असते लक्षणे.
डब्ल्यूएचओच्या माहिती नुसार मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे, प्राण्यांपासून हा रोग मानवांमध्ये पसरतो. त्याची लक्षणे चेचक सारखी असतात, पण ती तितकी गंभीर नसते.मंकीपॉक्स असल्यास मानवी शरीरात सामान्यतः ताप,तसेच शरीरावर पुरळ दिसणे,लिम्फ नोड्स सुजणे सारखी लक्षणे दिसतात.यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात.सहसा दोन ते चार आठवडे याचे लक्षण राहतात,हा स्वयं-मर्यादित असा आजार आहे. 2022 मध्ये केंद्राने जारी केलेल्या ‘मंकीपॉक्स रोगासाठी व्यवस्थापन गाईडलाईन मध्ये म्हटले आहे की, मानव-ते-मानवी संसर्ग प्रामुख्याने अनेक माध्यमांद्वारे होऊ शकतो. यासाठी सहसा दीर्घ कालावधीसाठी जवळचा संपर्क आवश्यक असतो. शरीरातील जखमांशी थेट संपर्क साधून आणि संक्रमित व्यक्तीचे दूषित कपडे किंवा तागाचे कापड सारख्या जखमेच्या साहित्यासोबत अप्रत्यक्ष संपर्कमुळेही याचा प्रसार होऊ शकतो.
मंकीपॉक्सबाबत सावधगिरी आवश्यक?
जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहे,त्यामुळे केंद्र सरकारने विमानतळ आणि बंदरांवर पाळत वाढविण्यावर भर दिला आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे आतापर्यंत मंकी पॉक्सची नोंदवलेले बहुतांश प्रकरणे देशांच्या प्रवासाशी संबंधित आहेत. सध्या मंकीपॉक्सची प्रकरणे भारतात कमी आहेत,पण याचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी सरकारने हा पाउल उचलला आहे.
सतर्क राहणे महत्त्वाचे.
भारत सरकार व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याचा प्रसार रोखण्यासाठी जरुरी पावले उचलली जात आहे,त्यामुळे भारतात मंकीपॉक्स ची प्रकरणे नियंत्रणात राहतील अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे सरकारने या आजारापासून बचावासाठी जनतेनेही जागरूक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.