Manoj Jarange Patil – MIM युती होणार?
Manoj Jarange Patil – MIM युती होणार?
यंदा विधानपरिषदेत कोणत्याही पक्षाने महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा एकही सदस्य वा उमेदवारी दिली नाही.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील वा मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या पक्षांसोबत एमआयएम युती करणार का? या मुद्यावर माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.मनोज जरांगे यांच्यासोबत एम आय एम पक्षाची युती होणार का यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी या मुद्द्यावर पक्ष सकारात्मक असल्याचे व काही बाबींवर आम्ही लक्ष देऊन निर्णय घेवू,मात्र युतीसाठी कुणाकडे जाणार नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही सकारात्मक पण जरांगे यांच्या रणनितीवर युती निर्भर- मा.खा.जलील
राज्यात ३० वर्षानंतर ही परीस्थिती आली आहे की, विधानपरिषदेत सध्या महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा एकही सदस्य किंवा खासदार नाही, हे सांगत असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एमआयएम भविष्यातील निवडणुकीत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना जलील म्हणाले की,मनोज जरांगे हे निवडणुकीत कशी व काय रणनीती ठरवणार आहेत? यावर अवलंबून आहे,पण यावर काही प्रस्ताव आला तर आम्ही एमआयएम च्या वतीने या युतीबाबत सकारात्मक विचार करू.मात्र आम्ही कुणासोबत पक्षाची युती व्हावी यासाठी स्वतः प्रस्ताव ठेवणार नाही किंवा यासाठी इतर पक्षांकडे जाणार नाही.दरम्यान एकाप्रकारे एमआयएम पक्षाकडून समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व करताना राज्यात सामाजिक न्याय व आरक्षण सारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिसायला लागले आहेत.