Indian National Congress आपल्या राज्यात नागरिकांना खटाखट पैसे बँकेत टाकणार ?
Indian National Congress आपल्या राज्यात नागरिकांना खटाखट पैसे बँकेत टाकणार ? भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार.
लोकसभेत विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या हिंदू विधानावर सुधांशू त्रिवेदी यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविताना राहुल गांधी यांना गंभीरपणे आणि सन्मानाने बोलण्याचा सल्ला पण दिला. सोबतच लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांच्या खटाखट पैसे बँकेत टाकण्याच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आता खटाखट पैसे वाटण्यावर काँग्रेसला चॅलेंज केले आहे. ते म्हणाले की काँग्रेस आता ही”अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहे,ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे लोकांना तुम्ही 8,500 रुपये द्या कारण आम्ही विरोधी पक्षात असताना हे करून दाखविले होते.हा गुजरात मॉडेल होता जो 2008-2009 नंतर बंद करण्यात आला.
भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या या चॅलेंजनंतर आता देशातही चर्चा सुरू झाली आहे की,काँग्रेस कर्नाटक तेलंगाना आणि अन्य राज्यात सत्तेत आहे.मग त्या राज्यात आता लोकांना प्रति महिना साडे आठ हजार रुपये बँकेत टाकणार का? लोकसभेत इंडिया अलायंस मध्ये 100 सीट जिंकून प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला हा वादा केला होता.त्यामुळे संपूर्ण देशात नव्हे तर ज्या राज्यातील सत्तेत आहे तेथे ते नागरिकांना बँकेत खटाखट पैसे टाकणार का असा सवाल आता काँग्रेस समोर आला आहे?अर्थातच काँग्रेस विरोधात हा भाजपचा एक नवा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्नही असू शकतो.पण काँग्रेस भाजपला आता कश्या पद्धतीने उत्तर देते किंवा या वचनावर लोकांना बँकेत पैसे टाकते का? या मुद्द्यावर देशाचे लक्ष लागू शकतो.
दरम्यान गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्याच्या राहुल गांधींच्या दाव्यालाही खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी प्रत्युत्तर दिले.विशेष म्हणजे लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राहुल गांधीं गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्याबाबत बोलले होते. याशिवाय अयोध्येतील भाजपच्या पराभवावर ही ते बोलले.भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधी जेव्हापासून विरोधी पक्षनेते बनले, तेव्हापासून त्यांच्या वागण्यात अस्वस्थता आणि अहंकार दिसून येतो.
अयोध्या प्रकरणावर सुधांशू त्रिवेदींचा हल्लाबोल.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर अयोध्येत विमानतळ बांधले, जमीन हिसकावून घेतली, पण लोकांना मोबदला मिळाला नाही, असा आरोप केला होता.यावर भाजपचे राज्यसभा खासदार म्हणाले, “ते अयोध्येबद्दल जे बोलतात त्यावरून असे दिसते की, प्रभू रामाचे मंदिर ज्या भव्य पद्धतीने बांधले गेले त्याची वेदना दिसून येते.”
गुजरातमध्ये काँग्रेसची मते निम्म्यावर.
गुजरातमध्ये भाजपचा पराभव केल्याच्या दाव्यावर राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “गुजरातमध्ये काँग्रेसचा मताधिक्य निम्मा झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशा जागा गमावल्या ज्या 1947 नंतर गमावल्या नव्हत्या आणि त्यामध्ये भारताची आघाडी आहे. त्याच्या मित्रपक्षांनी त्याचा मताचा वाटा खाल्ला आहे.”
सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींना दिला सल्ला.
राहुल गांधींच्या हिंदूंबाबत संसदेत केलेल्या वक्तव्यावर राज्यसभा खासदार म्हणाले, “तुम्ही स्वत:ला शिवभक्त म्हणत असाल, तर धार्मिक विषयांवर आदराने बोला. भगवान शंकरांनीही रामाचे गुणगान गायले आहे, होय, शिवाचे.” भक्तही रामाच्या विरोधात होते, अहंकार सोडा आणि नम्रतेने बोला.राहुल गांधींवर निशाणा साधत राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, “तुम्ही अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहात, ज्या राज्यांमध्ये तुमचे सरकार आहे, तेथे लोकांना 8,500 रुपये द्या. आम्ही विरोधी पक्षात असताना दाखवून दिले होते. गुजरात मॉडेल 2008-2009 नंतर बंद करण्यात आले होते.