*प्रतिनिधी:- जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला*
अकोला- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे दिनांक 5 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय परिसर येथे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व तालुका न्यायालय परिसरामध्ये आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार सदर तारखे मध्ये बदल करण्यात आला असून आता राष्ट्रीय लोक अदालत ही दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 या वेळात घेण्यात येणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला चे सचिव योगेश पैठणकर यांनी कळविले आहे!