चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे.

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे.

खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, बाभुळगांव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभुळगांव या केंद्रांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ जिल्ह्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि.28 मार्च पासून करण्यात येत असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 28 मार्च ते 25 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा व बँके पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून चणा खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.