*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला*
अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा जेणे करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कमाई च्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शिक्षणाचा खर्च व त्याचा दर्जा जोपासता जोपासता पालकांची मेहनत करून सुद्धा एवढा पैसा जुळवू शकत नाहीतत्यामुळे अर्ध्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोडून पालकांना शासकीय प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.
त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्याची शैक्षणिक अवस्था बिकट होते. नुकतेच आर.टी. ई. च्या नियमांमध्ये बदल करून तर अगदी मोफत शिक्षणाचा पायगंडा मोडला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांनी आपले स्वप्न भंगले असल्याचा उल्लेख केला आहे. परंतु या सर्व व्यवस्थे पेक्षा जर शासन मान्य प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला तर पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल व दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी घडून आपल्या परिवारा बरोबर देशाचे भवितव्य घडवण्या साठि सक्षम बनू शकतो.
करिता नवीन योजना राबवून त्यामध्ये गोर-गरीब व सर्वसामान्य यांना प्रथम प्राधान्य देऊन येणाऱ्या काळात या शैक्षणिक व्यवस्थेत सुधार करून यावर उपयुक्त ठरेल व सर्व जनसामान्यां साठी पोषक ठरेल अशी उपाय योजना आणून जिल्ह्याचा आदर्श शिक्षणाचा पाया निर्माण व्हावा. करिता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे नाही तर खाजगी शिकवणीचा व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून शासकीय शिक्षण प्रणाली बंद झाल्यास सर्वसामान्य पालकांना आपले मुले शिकवावे की नाही ही परिस्थिती यायला नको. त्याकरिता दर्जेदार शिक्षण पद्धती हि आताची महत्त्वकांशी गरज आहे यावर लक्ष देणे हि काळाची गरज असून राष्ट्र हितासाठी नवीन धोरण आखावे.
– आकाश गुलाबराव हिवराळे जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी परिषद, अकोला