Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली.
तसेच लोकांची गर्दीही दिसत नव्हती,दुसरीकडे मतदारांनीही गोविंदा यांच्या रोड शो ला प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे सुरुवातीलाच महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना प्रचारात आघाडी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,त्यांचा सामना बलाढ्य असे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख यांच्यासोबत होत आहे.
ते मागील एक वर्षापासून दोन्ही जिल्ह्यात पूर्ण ताकदीने सक्रिय होते,तर महायुतीने ऐनवेळी यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी यांची तिकीट कापून हिंगोली येथील राजश्री पाटील यांना शिवसेना शिंदे गटासाठी महायुतीची उमेदवारी दिल्या गेली,यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या पहिल्या फेरीत मतदारांमध्ये आकर्षण निर्माण करण्यासाठी महायुती कडून स्टार प्रचारक आणले जात आहे.
या दरम्यान शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक सिने अभिनेते गोविंदा यांचा यवतमाळ शहरात रोड शो झाला,मात्र या रोड शो ला मतदारांकडून हवे तेवढं प्रतिसाद मिळाला नाही,संध्याकाळी उशिरा गोविंदा यवतमाळात पोहोचले,त्यांची वाट पाहत असलेल्या नागरिकांमध्ये त्यांना पाहण्यासाठी आकर्षण होता,मात्र या दरम्यान रस्त्यांवर गोविंदा ल घेवून फिरणाऱ्या या रोड शो लां हवी तेवढी गर्दी नव्हती,त्यामुळे काही निवडक रस्त्यांवर फिरून अवघ्या काही वेळेतच हा रोड शो आयोजकाना आटोपता घ्यावा लागला.