Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

पक्षप्रवेशानंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया:

“आमदार झाल्यापासून मी माझ्या अंतकरणातून देशात सर्वात जास्त योजना राबवणारा मतदारसंघ म्हणून मी काम केले आहे. नवनवे उपक्रम तर शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. राजकारणाच्या पलीकडे विकास देखील करावा, ही भावना आता राजकारणात लोक पावत चाललेली आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येईल असे भाषणात बोलले जाते मात्र कुठेतरी ते कृतीत उतरत नाही.

मला आनंद वाटतो की ज्या काही समस्या ग्रामीण भागातल्या, तरुणाईच्या आणि इतर प्रश्नांना वाचा फोडत पक्षाने मला लोकसभेची उमेदवारी दिली. खर तर मी पक्षाकडे कोणतीही उमेदवारी मागितली नव्हती. आताच्या ज्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत त्यावर माझा आक्षेप नव्हताच, मी एका कार्यकर्त्याप्रमाणे आधीपासूनच काम करत होतो.” सोबतच शिवसेना पक्षप्रमुख आणि इतर नेत्यांचे आभार व्यक्त केले.

आता जळगावात भाजपकडून उमेदवारी कोणाला?

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. जळगावात तिकीट कुणाला यावरून वेगवेगळे तर्क लावले जात असताना भाजप कार्यकर्त्या स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली आहे. 2019 मध्ये सुद्धा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र ऐन वेळेवर त्यांचा पत्ता कट करून उन्मेष पाटलांना तिकीट मिळाले होते आणि ते 7 लाख मतांनी लोकसभेवर निवडून देखील आले होते.

तर कोण आहेत स्मिता वाघ?

स्मिता वाघ यांनी मिनी मंत्रालयात कामगिरी केली आहे. विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य म्हणून पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्मिता वाघ या त्यांचे पती उदय वाघ यांच्यासोबत आधीपासूनच राजकारणात सक्रिय राहिल्या आहेत. उदय वाघ हे बाजार समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम बजावले होते. उदय वाघ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर ही स्मिता वाघ यांनी भाजपसोबत नाळ जुळवून ठेवली होती.

स्मिता वाघ विरुद्ध उन्मेष पाटील रिंगणात?

जळगाव लोकसभा मतदारसंघातून आता स्मिता वाघ यांच्या विरुद्ध उन्मेष पाटील लढणार याची हुडहुड लागलेली असतानाच ठाकरे गटाने डाव खेळत भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना जळगाव मधून ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत कारण पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहे, आणि आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. करण पवार यांचा एरंडोल, पारोळा, भडगाव या तालुक्यात चांगलाच पगडा असल्याचे मानले जाते. सोबतच भाजपमधील कार्यकर्त्यांची मदत आणि विशेष म्हणजे उन्मेष पाटलांची साथ यामुळे जळगावातील निवडणुकीची खेळी अधिकच रंगणार असे स्पष्ट होत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मिळालेल्या दणक्यामुळे आता शिवसेनेचे करण पवार आघाडी घेतील की भाजपशी एकनिष्ठ असलेल्या स्मिता वाघ या डाव पलटवतील हे चित्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − nine =