चालु वर्षात तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे एकुण ०७ इसमांवर कलम १४२ मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई.
*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन*
अकोला जिल्हयातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्व सामान्य जनतेला त्यांचे दैनंदिन जीवन भयमुक्त वातावरणात जगता यावे याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील हद्दार इसम नामे.
१) जयराज सतिष पांडे वय २४ वर्ष रा. रतनलाल प्लॉट, अकोला २) ऋषभ रायबोले वय २० वर्ष रा. आंबेडकर नगर, नविन बस स्थानक मागे, अकोला ३) रामा पाटील उर्फ प्रसाद साहेबराव सुलतान वय २४ वर्ष रा. लोहारा ता. बाळापुर, अकोला ४) गजानन वासुदेव कोगदे वय ३० वर्ष रा. सुकळी ता. बार्शिटाकळी, जि. अकोला.
५) सतिष उर्फ टग्या अशोक तायडे वय २८ वर्ष रा. कान्हेरी सरप ता. बार्शिटाकळी, जि. अकोला ६) दिनेश शिवशंकर उपाध्याय वय ३६ वर्ष रा. शिवर, ता.जि. अकोला ७) पियुष राजेश मोरे वय २१ वर्ष रा. अशोक नगर, अकोट फाईल, अकोला तडीपार इसमांना अकोला जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले होते. सदर हद्दपार इसमांना हद्दपार करून सुध्दा अकोला जिल्हयात राहत असल्याने आणि त्यांनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधीनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
“अकोला जिल्हयात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.